#MIDC ची जाहिरात 13 ऑगस्ट 2023 रोजी आली होती, आज 9 ऑगस्ट 2024 आहे. उद्योगात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात एक वर्ष होऊन देखील वेळापत्रक पडत नाही हे खरंच दुर्भाग्य आहे.@samant_uday साहेब लवकरात लवकर राहिलेल्या पदांचे वेळापत्रक जाहीर करावे नम्र विनंती@CMOMaharashtra#MIDC
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC)
📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध
📌4जून 2023 पूर्व परिक्षा
📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा
जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office@BaliramDoleyINC
गेल्या 10 वर्षात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला ???????
मा. @mieknathshinde साहेब
स्पर्धा परीक्षा उमेदवार "लाडके" नाहीत काय??
1.राज्यसेवा जाहिरात 2024
🔶 जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेतून महत्वाचे संवर्ग जाणूनबुजून वगळण्यात आले आहेत. आंदोलने करून 2 attempt मिळवले म्हणून ते वाया कसे जातील यावरच 2023 ला भर दिला व 2024 ला देखील पुनरावृत्ती होत आहे.
🔷 उपसंचालक ( आदिवासी विभाग) हा संवर्ग फक्त show piece म्हणून राज्यसेवेत आला आहे काय? गेल्या कित्येक वर्षात एकदाही हे जाहिरातीत दिसले नाही.2024 मध्ये तरी येणार का?
🔶 काँग्रेस सरकारने 10 वर्षांपूर्वी काढलेल्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :-44 पदे
पोलीस उपाधीक्षक:- 40
तहसीलदार:-34
ना.तहसीलदार:- 227
सहा.गटविकास अधिकारी:-100
असे आकडे दिसायचे
🔶आता तब्बल एक दशकानंतर हे आकडे "शून्य शून्य" /ZERO/भोपळा का झाले????????????
यासोबतच
मुख्याधिकारी गट:- अ व ब
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी इत्यादीसह सर्व महत्वाचे संवर्ग या जाहिरातीतून का गायब झाले ?????
🔶 @RVikhePatil साहेब लक्षात आहे ना काँग्रेस मध्ये असताना कसे दणक्यात जाहिरात यायच्या.
आपण महसूलमंत्री म्हणून राज्यसेवेत उमेदवारांच्या हाती आपल्या विभागाच्या प्रत्येक संवर्गाच्या "शून्य शून्य " जागा काढून "भोपळे" देत आहात तरी आमच्याकडून आपणास "महसूल दिनाच्या " तीन अंकी शुभेच्छा.
🔷1,50,000 पदभरतीचा गाजवाजा केला ना मग त्यातील फक्त 1% सामान्य राज्यसेवा ला द्यायला काय अडचण आहे???????????
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
2. संयुक्त अराजपत्रित गट-ब व क जाहिरात 2024
🔶 फेब्रुवारीत नियोजित असणारी जाहिरात 6 महिन्यानंतर देखील प्रसिद्ध करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.
जाहिरात तर दूरच साधी परीक्षेची तारीख जाहीर होत नाहीये.
हेच का आपले अच्छे दिन???
🔷 काँग्रेस सरकार ज्याप्रमाणे
PSI :- 1869 पदे
STI :- 1090 पदे
असे दणक्यात जाहिरात प्रसिद्ध करत होते तसे आकडे या 2024 जाहिरातीत दिसणार आहेत काय??
तसेच इतर सर्व गट- ब व क संवर्गाची जास्तीत जास्त पदांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी सर्व उमेदवारांतर्फे विनंती करतो.
3. #MPSC कृषी जाहिरात 2024
🔶 दोन वर्षापासून ही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे कृषी पदवीधर अत्यंत तणावात आहेत.
पूर्ण जुलै महिना हे विद्यार्थी सरकारकडे यासाठी विनंती,आर्जव करत आहेत.पण सरकारला बेरोजगारांचे काहीही देणंघेणं उरलेलं नाही.
258 जागांचे मागणीपत्रक पाठवण्यासाठी इतकी चालढकल व टोलवाटोलवी कशासाठी सुरु आहे???
🔶 पाठपुरावा केला असता अधिकारी वर्ग वेगळीच अडचण सांगतात, मंत्री महोदय उमेदवारांना वेगळंच बोलतात.
हे कमी की काय म्हणून
20 दिवसापूर्वी आपले आमदार Tweet करून सांगतात की,
' मुख्यमंत्री महोदय सकारात्मकआहेत,त्यांनी GAD ला तात्काळ मागणीपत्रक #MPSC कडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत "
एक महिन्यात खेळ मांडून ठेवला आहे कृषी पदवीधरांचा.
काय ठरवलं आहे नेमकं ह्यांचं????
तात्काळ याची स्पष्टता द्यावी.
विनाकारण त्यांना ताटकळत ठेवून
त्यांची दिशाभूल करणे बंद करावे.
24 दिवसावर परीक्षा आली आहे.
4. जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी कोणता मुहूर्त शोधला आहे?? सेवाप्रवेश नियम बदलण्याची कार्यवाही इतकी का लांबत आहे?
जाहिरातीची वाट बघणाऱ्या अभियंतांना या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार आहेत?
5. @mybmc चे
कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता तसेच इतर पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांकडून देण्यात आले होते.अद्याप त्याची अंमलबजावणी व कार्यवाही का केली नाही हे एक कोडंच आहे.
#BMC व जलसंपदाच्या या पदभरती जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहेत??
की मुद्दाम असा उशीर करून आचारसंहिता सुरु होईपर्यत लांबवण्याचा plan सुरु आहे?
6. 🙏🙏🙏🙏
सरकार येतील् ,जातील
पक्ष फुटतील ,वेगवगेळ्या आघाडी ,युती होतील.
परंतु आपल्या गर्जा महाराष्ट्रातील या युवक - युवतींना न्याय कोण देणार??
त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष
अक्षरशः वाया गेली आहेत व जात आहेत. आपण कसे भरून काढणार आहोत हे ???????
🔶मा.मुख्यमंत्री महोदय आपणास या सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
"जरा यांच्याकडे पण लक्ष द्या "
त्यांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते द्या.
नौकरीची संधी हा त्यांचा मूलभूत हक्क आहे याचा सरकारला विसर पडता कामा नये.
हा सर्व इतिहास आपल्याच नावावर लिहिला जाणार आहे.
धन्यवाद
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@ssaunik@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@atullondhe@maha_governor@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews @News18lokmat
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत.. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले होते.. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली काय?? असा प्रश्न पडतो आहे.
मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी @mybmc ला लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) तसेच दुय्यम अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवकांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
@mieknathshinde साहेब आता संयम सुटत चालयाय पोरांचा, रोज 25000 पोरं फोन करतात. खरं तर @IqbalSinghChah2 तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला असता तर पोरं जॉइन झाली असती पण असो @mybmc मा.गगराणी साहेब व सैनी साहेब आपण ज्या गतीने कामाला लावलं त्याबद्दल धन्यवाद. 🙏
@mybmc Sub Engineer आणि Junior Engineer या रिक्त पदांची भरती प्रक्रिया कधी सुरू करणार आहात? कोकण आणि पूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थी या भरतीची मागील 4 वर्ष झाल वाट बघत आहेत तरी कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी नम्र विनंती 🙏 @AbhiPawarBJP@BaliramDoleyINC
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाच्या ६७१ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली आहे का? असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून @mybmc ने लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) या पदाची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. एकनाथजी शिंदे साहेब आपण द्यावे व बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.
@mieknathshinde@NANA_PATOLE@kanhaiyakumar@varunchoudhary2
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मा. आयुक्तांचे निवेदन त्यांच्या पश्चात उपायुक्त चंद्रशेखर चौरे साहेब यांनी स्वीकारले.@mybmc दोन वर्षे पोर जाहिरातीची वाट बघतायत @mieknathshinde साहेब इतर 20000 जागा रिक्त आहेत !
मा.@mieknathshinde साहेब,
👉फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेली मृदा व जलसंधारण भरती परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहारामुळे रद्द करण्यात आली होती.
रद्द होऊन आता दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे.
👉 आता लवकरात लवकर ही परीक्षा
कशी होईल याकडे तातडीने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
👉 विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे
( परीक्षा ,निकाल सर्वच )आवश्यक आहे.
संबंधित विभागास पुढील आवश्यक
कार्यवाही करण्याचे निर्देश आपण द्यावेत.
👉 मा.मंत्री महोदय @SanjayDRathods आपण तात्काळ यावर पुढील कार्यवाही कराल
याकडे हजारो उमेदवार आस लावून बसले आहेत. न्यायाची अपेक्षा
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
#WCD
मा. @maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@atullondhe
11 व 12 मार्च रोजी नियोजित
कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत.
अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे.
उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे.
👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
गेल्या 6 महिन्यापासून
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी करत आहेत.
केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा
विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा.
👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे
धन्यवाद
🙏🙏🙏
@RahulGandhi@kcvenugopalmp@chennithala@varunchoudhary2@kharge@INCIndia