जिजाऊ आऊसाहेब म्हणजे परकीयांच्या टापाखाली तुडवलेल्या भारतवर्षाच्या स्वाभिमानाला फुटलेला अंकूर..!!
आपणही राज्यकर्ते होऊ शकतो अन् पातशाहीला आव्हान देऊ शकतो या विचाराला जन्म देणारी माऊली!🙏
#राजमाता#जिजाऊ#पुण्यतिथी
यंदा पाऊस कमी आहे असं ऐकायला मिळतंय.
विजेचा प्रश्न उद्भवत आहे, दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
सरकार म्हणून राज्य शासनाची काय पूर्वतयारी आहे. अन मीडिया हा विषय का इग्नोर करतेय.
#दुष्काळ
जरांगे पाटील उपोषणाला बसले कि नेहमीप्रमाणे मुळव्याध ठणकाला लागलंय त्याच लोकांचं जे सुरूवाती पासून विरोध करत आहेत. कोलून पुढे जाऊया अन् हक्काच्या #MarathaReservation साठी सोशल मीडिया वर वक्त होऊया..!! #Maonjjarangepatil
2014 पर्यंत भारतात जनतेच्या हिताच्या गोष्टी म्हणजे रोजगार , महागाई अशा विषयांवर बोलणं म्हणजे देशभक्तीचे प्रमाण होते , आज त्याच मुद्द्यांवर बोलणं देशविरोधी गोष्ट झालीय.😂😂
#देशहित
पोलीस बंदोबस्तात सोन्याचे दुकानं बंद केले पाहिजेत...
सीमेवर सैनिक जीवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करतात... देशासाठी ह्या सराफांना 1 वर्ष दुकाने बंद ठेवायला काय प्रॉब्लेम आहे ????
#देशद्रोही_साले
देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न विचारणे माझे कर्तव्य आहे, ते मी विचारणारच. त्यासाठी मला पक्षप्रेमी लोकांनी पक्षद्रोही ठरवले तरी फरक पडत नाही. कारण ते सरकारप्रेमी आहेत, देशप्रेमी नाहीत.
#लोकशाही
MSEB वाले दर गुरुवारी मेंटेनन्स साठी 6 तास लाईट बंद ठेवतात, अन परत वरून संध्याकाळ झाली कि 6 ते 10 परत लोड शेडींग साठी बंद ठेवतात .
सगळ्यात नियोजनशून्य विभाग .
#भारनियमन
कलिंगड मृत्यु प्रकरण
मुंबईत एका कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यु झाला. मृत्युच्या आदल्या रात्री त्यांनी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्याचे बातम्यांमधून समजले. त्यांचा मृत्यु हा फूड पोइजानिंग मुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण सर्रास कलिंगड खाल्याने चौघांचा मृत्यु अशा मथळ्याखाली बातम्या, सोशल मीडिया चर्चा सुरू झाल्या आहेत.
वास्तविकता मृत्युचे खरे कारण हे पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि त्यातही विषबाधा असल्याचा संशय असल्यास मृत्यूचे खरे कारण हे व्हीसेरा अहवालातूनच समजते.
वास्तविकता हे दुर्दैवी मृत्यु प्रथमदर्शनी संशयास्पद मृत्यु या सदरी मोडणारे वाटतात त्यामुळे त्याचा सर्व अंगाने तपास पोलिस करतीलच. पण असे थेट कलिंगडावर दोषारोप केल्याने कलिंगड खाण्याच्या बाबतीत विनाकारण संभ्रम, संशय निर्माण होतो आहे.
याचा परिणाम जर मागणीवर झाला तर त्याचा थेट फटका कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच हे मार्केट बेभरवशाचे आहे. कलिंगड शेतकरी अतिशय कष्टाने कलिंगड पिकवतो, उत्पादन खर्च भयानक वाढला आहे. त्यात लहरी निसर्गामुळे वेळोवेळी शेतकऱ्याला फटका बसतो. अत्यल्प मर्जीनवर शेतकरी हे पीक घेत असतो. अश्यात अशा चुकीच्या व सध्यातरी आधार वाटत नसलेल्या बातम्यांमुळे परत उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.
त्यामुळे या दुर्दैवी मृत्यूचे खरे कारण समजल्याशिवाय "कलिंगड खाल्ल्याने मृत्यु" अशा आशयाच्या कपोलकल्पित पोष्ट कोणीही टाकू नये असे मत आहे.
डॉ प्रशांत भामरे.
संतोष देशमुख यांची हत्या झाली होती अन् ती हत्या गावासाठी अन् गावकऱ्यांसाठी लढतांना झाली होती. एवढा विचार तरी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी करायला पाहिजे होता.
शेवटी निवडणुकीमध्ये हार-जीत होतच असते
#मस्साजोग#SantoshDeshamukh
लक्ष दिन भुवरी अवतरले, शिवबा ते साक्षात! देशाचा अभिमान जागला, स्वराज्याच्या या मातीत!
सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत, गर्जना झाली भारी, जिजाऊंचा लाडका शिवबा, आला या भूवरी !!
सादर होत आहे, राजा शिवाजी अँथम🚩
जवळपास महिना झाला, रोज 4 तास भारनियमन सुरूय.
ज्यांचे जनावरांचे मोठे गोठे आहेत त्यांना जनरेटर अन डिझेल चा मोक्कार खर्च वाढलाय , कोणाचे काही कार्यक्रम असतात त्यांना सुद्धा भाड्याने जनरेटर आणावे लागत आहेत . सगळ्यांचं बजेट हालतंय.
शाळा कॉलेजच्या परीक्षांचा काळ आहे, अवघडे सगळं.
"राजा शिवाजी" चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरने १०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून टीझरला मिळालेल्या अफाट प्रतिसादावरून चित्रपटाची ओपनिंगही भव्यदिव्य असेल, यात कोणतीही शंका नाही.
@Riteishd@jiostudios@NikhilSane_ #RajaShivaji