औरंगाबाद जिल्ह्यात #कुणबी_मराठे एकूण लोकसंख्येच्या ४०.६३ होते तर मुस्लिमांची संख्या 10.76% होती.
—#विश्वास_पाटील
ब्रिटिश सरकारने फेब्रुवारी 1881 मध्ये जो संपूर्ण हिंदुस्तानभर सेन्सस तथा जनगणना केली, त्यानुसार तेव्हाच्या औरंगाबाद जिल्ह्याची (आताचा जालना जिल्हा धरून) एकूण लोकसंख्या730,976 होती.त्यामध्ये ब्रिटिशांच्या अहवालानुसार प्रमुख जातींची लोकसंख्या खालील प्रमाणे होती.
#कुणबी_मराठा एकूण 288,825 पैकी147542 पुरुष आणि141283 स्त्रिया,/
मुसलमान एकूण 78,688 पैकी पुरुष 39819 व स्त्रिया 38869,/
माळी एकूण 28,403 पैकी पुरुष 14430 व स्त्रिया 13973/
महार एकूण 65529 पैकी पुरुष 32635 आणि स्त्रिया 32894/
धनगर एकूण31931 पैकी पुरुष16210 व स्त्रिया15721 अशी एकूण लोकसंख्या ब्रिटिशांनी 1884 मध्ये जे गॅझेट प्रसिद्ध केले त्यानुसार आढळते. याशिवाय इतर जातींची व व्यवसायिकांची लोकसंख्या खालील प्रमाणे
मांग 9685 पुरुष व9432 स्त्रिया/
बंजारा पुरुष 7258आणि6688 स्त्रिया/
सोनार 3829 पुरुष व स्त्रिया 3580/
सुतार 3347पुरुष व 3212
/ लोहार पुरुष1822 व1658 स्त्रिया/
शिंपी1273 पुरुष व1265 स्त्रिया /
कुंभार2802 पुरुष व 2797
स्त्रिया /
तेली 5853पुरुष व 5603 स्त्रिया/
साळी पुरुष1311 व स्त्रिया 1287/
बुरुड पुरुष115 व130/ढोर पुरुष 826 व 818 स्त्रिया/
चांभार 5496 पुरुष व स्त्रिया 5315/
भिल्ल पुरुष 3565 व3584 स्त्रिया/
वडार पुरुष 667 व स्त्रिया 588/
तसेच ब्राह्मण पुरुष 15027 व स्त्रिया 13464,
ख्रिश्चन पुरुष165 व 141स्त्रिया/ पारशी पुरुष 51 व 34 स्त्रिया.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1884 च्या आधी सुद्धा डॉक्टर ब्रॅडले आणि कंपनीने 1840 च्या दरम्यान एक सर्वे केला होता. ब्रिटिशांनी म्हटल्याप्रमाणे तो एका ब्रिटिश कंपनीने केलेला सर्वे सुद्धा सत्याच्या जवळपास जाणार होता. जुलै १८८४ मध्ये ब्रिटिशांनी हैदराबादहून #औरंगाबाद जिल्ह्याचे गॅझेटटियर प्रकाशित केले आहे त्यानुसार त्यांनी सुद्धा ब्रेडले साहेबांच्या कागदपत्रांचा चांगला उपयोग करून घेतलेला आहे. माझ्या मते या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे सेंसेसचे जे #दिल्ली येथे मुख्य कार्यालय आहे तेथे मिळायलाच हवीत.
1884 च्या ब्रिटिशांच्या ह्या गॅझेटमध्ये पान क्रमांक 265 वर असे म्हटलेले आहे की, the kunbis comprise about 40.63% of the whole inhabitants and are from the main body of the agriculture population. The term #kunbi has been sometimes applied to husbandmen (म्हणजे पशुपालक) in general but in reality it is a caste of #Marathas the members of which are by hereditary #farmers and tillars of the soil असे म्हटले आहे.
थोडक्यात ब्रिटिशांनी शास्त्रशुद्धरित्या संपूर्ण देशभर हिंदुस्तानभर जो सर्वे केला होता. जो सर्व जाती-जमातीचा धर्मांचा व व्यावसायिकांचा सुद्धा होता. त्यानुसार आजच्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील 40% हून अधिक लोक हे कुणबी होते. त्यामुळे त्यांचे तेवढे लोकसंख्येच्या प्रमाणात आजही प्रमाण आढळयलाच हवे.
#मराठवाडा विभागामध्ये औरंगाबाद सोडून इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच पद्धतीने थोडीफार जनसंख्या असायला हवी. मी अगदी हैदराबाद येथेच सुद्धा जाऊन तिथल्या दप्तरखान्यातून शोध घेतला. परंतु आता आंध्र प्रदेशाचे दोन तुकडे झालेले आहेत. पूर्वीचे रेकॉर्ड एका जागी नाही. त्यामुळे प्रयत्न करूनही मला मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांचे ब्रिटिश #गॅझेटियर मिळालेले नाहीत.
मात्र औरंगाबाद व जालन्याची परिस्थिती लक्षात घेता, ब्रिटिशांच्या नोंदीनुसार मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातून सुद्धा बहुसंख्येने कुणब्यांच्या नोंदी आढळयलाच हव्यात.
गेल्या दोन अडीचशे वर्षात मराठवाड्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलेले नाही. एखादा महायुद्धाचा हिरोशिमा नागासाकी सारखा प्रकारही इकडे घडलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच अद्यापी गाववार आढावा घेतल्यास कुणब्यांच्या अनेक नोंदी आढळतील असे माझे स्पष्ट मत आहे.
#KunbiInMaharashtra #kunbi #vishwaspatil #MarathaAandolan #maratha #kunbimaratha #shivajimaharaj #Maharashtra
@brizpatil प्रत्यक्षात हे पाहणे महत्त्वाचे आहे की ज्या ५७ लाख ४१ हजार लोकांच्या नोंदी सापडल्या, त्या शिंदे समिती स्थापन झाल्यावर सापडल्या आहेत का आणि या सर्व लोकांकडे शिंदे समिती स्थापन होण्यापूर्वी जात प्रमाणपत्र नव्हते का?
खर तर हा लढा त्या मराठ्यांसाठी होता ज्यांच्या नोंदीच नाहीत.
माझ्यामते सध्या सर्वात रास्त मागणी ही आहे की जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही तो पर्यंत EWS ला ओबीसींच्या सर्व सवलती राज्य सरकारने लागू करावेत
@YuvrajSambhaji@ss_suryawanshi@waglenikhil@vnpatilofficial
एकीकडे राज्य सरकार, ५४ लाख नव्याने नोंदी सापडल्या ज्यापैकी ३४ लाख प्रमाणपत्र वितरित केले असे सांगून उघडपणे फसवत आहे तर दुसरीकडे मराठा लोकप्रतिनिधीच असा विरोध करत आहेत जस की काल सर्व मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश केला आहे.
हे सर्व जाणूनबुजून चालू आहे.
Union minister & BJP Rajya Sabha MP Narayan Rane expresses disagreement over Maharashtra CM Eknath Shinde’s decisions & his govt draft of Maratha — Kunbi reservations — Sage Soyere. @NewIndianXpress
बरोबर आहे. मुळात सरकार जी आकडेवारी सांगत आहे की ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत ज्यापैकी ३४ लाख प्रमाणपत्र वितरित केले आहेत, ह्या बद्दल स्पष्टता नाही. ५७ लाख नोंदी नव्याने सापडल्या की आत्तापर्यंतच्या सर्व नोंदी (यापूर्वीच कुणबी प्रमाणपत्र आहेत असे) यात मोजल्या आहेत.
@vnpatilofficial
Actually this not new, As per present GR also, the person whose caste as mentioned Kunbi in revenue & education records whose blood relative always entitle to get same certificate as a Kunbi & this is applicable for seven generations of that particular family. Nothing new.
[Book Launch]
Senior Advocate and eminent jurist Fali Nariman and Chief Editor of The Print Shekhar Gupta will be in discussion with Vidhi Centre for Legal Policy's Arghya Sengupta on his recent book 'The Colonial Constitution'.
#TheColonialConstitution@Vidhi_India
Inspite of everything being crystal clear, Central Government and Punjab govt did nothing from past 8-9 months. For what were they waiting? Who wants Punjab to be disturbed purposefully?
@Swamy39@KapilSibal@ysathishreddy@pbhushan1@DrKumarVishwas
https://t.co/4mlH9xwEt7
#WATCH | Punjab: Supporters of 'Waris Punjab De' Chief Amritpal Singh break through police barricades with swords and guns outside Ajnala PS in Amritsar
They've gathered outside the PS in order to protest against the arrest of his (Amritpal Singh) close aide Lovepreet Toofan.
आय.एल.एस विधी महाविद्यालयात सभागृह असताना, प्रत्येक वर्षी सर्व विद्यार्थी वर्गणी जमा करुन बाहेर सभागृह भाड्याने घेऊन शिवजयंती साजरी करतात. या पेक्षा लाजिरवाणे अजुन काय असू शकते? महाविद्यालयाच्या प्रशासनाची हिम्मत होतेच कशी शिवजयंतीची परवानगी नाकारायची? धिक्कार असो...
आय.एल.एस विधी महाविद्यालयात सभागृह असताना, प्रत्येक वर्षी सर्व विद्यार्थी वर्गणी जमा करुन बाहेर सभागृह भाड्याने घेऊन शिवजयंती साजरी करतात. या पेक्षा लाजिरवाणे अजुन काय असू शकते? महाविद्यालयाच्या प्रशासनाची हिम्मत होतेच कशी शिवजयंतीची परवानगी नाकारायची? धिक्कार असो...