देशातील ४,७५१ शहरांना मागे टाकत स्वच्छ सर्वेक्षणात (२०२५-२६) देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा बहुमान पटकावणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचे मनःपूर्वक अभिनंदन!
महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि या यशात योगदान देणाऱ्या नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाचे विशेष कौतुक! दशकभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेले हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
शाळा-महाविद्यालयांपासून नागरिकांपर्यंत सर्वांचा स्वच्छता अभियानातील सहभाग, कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ओल्या-सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्यानांसाठी पुनर्वापर, शहरातील भिंतींवर जैवविविधतेचे संदेश देणारी आकर्षक चित्रे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शिल्पांची निर्मिती आणि जुन्या कपड्यांवर प्रक्रिया करणारा देशातील पहिला प्रकल्प अशा अनेक अभिनव उपक्रमांतून नवी मुंबईने हे यश संपादन करत सलग ८ वेळा देशात अव्वल स्थान पटकावणाऱ्या इंदूर शहरालाही मागे टाकले आहे. राज्यातील इतर शहरांनीही नवी मुंबईच्या या मॉडेलचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी.
अव्वल स्थान मिळविण्याइतकीच ते सातत्याने टिकवून ठेवण्याची जबाबदारीही मोठी आहे. नवी मुंबईने हा स्वच्छतेचा आदर्श असाच कायम ठेवावा, हीच अपेक्षा.
#NaviMumbai #Cleanliness
#SwachhSurvekshanAwards
@NMMConline@navimumbaicv@NaviMumbaiCity@NaviMumbaiNet
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात नववी ओळख महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांची. त्यांनी आपल्या निर्णयक्षमतेतून, प्रशासकीय कौशल्यातून आणि कामाप्रतिच्या बांधिलकीतून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कामगार, गृह, ऊर्जा, नियोजन, पर्यावरण, वस्त्रोद्योग, आर्थिक सांख्यिकी आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करताना त्या राज्याच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देत आहेत. पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, कामातील शिस्त आणि नेतृत्वातील ठामपणा हेच त्यांच्या खऱ्या सौंदर्याचे पैलू आहेत. या अधिकारी आहेत - (बसलेल्या, डावीकडून) कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे तसेच (उभ्या, डावीकडून) नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त ज्योत्स्ना पडियार, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती म्हसे-पाटील, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव शैला ए., सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. निरुपमा जे. डांगे.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat@LokmatMumbai@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@vijayjdarda@RajendrajDarda@devendarda@rishidarda@karandarda
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात आठवी ओळख फिजिओथेरपिस्टची. रुग्णांना वेदनामुक्त जीवनाची दिशा देणे, अपघात व दुखापतींनंतर शरीराची हालचाल पूर्ववत करणे, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन करणे आणि व्यक्तींना पुन्हा स्वावलंबी बनविणे, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या फिजिओथेरपिस्ट पार पाडतात. राज्यात शासकीय आणि खासगी मिळून १२६ फिजिओथेरपी महाविद्यालये असून, दरवर्षी ७,४०५ विद्यार्थी या क्षेत्रात प्रवेश घेतात. महिला फिजिओथेरपिस्ट म्हणजे संवेदनशीलता, कौशल्य आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम. त्यांच्या कार्याला सलाम.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@thecsp@Pure_Physio@mieknathshinde@SunetraA_Pawar@LokmatMumbai
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात सातवी ओळख करून घेऊया पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणाऱ्या डॉक्टरांचे. रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करणाऱ्या पॅथॉलॉजी डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते त्यांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे पुढे आजाराची सगळी ट्रीटमेंट ठरत असते त्या महत्त्वाच्या या विभागात अनेक महिला डॉक्टर महत्त्वाचे काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat@LokmatMumbai
#pathology @vijayjdarda@RajendrajDarda@RajThackeray@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@Pathologists
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात चौथी ओळख करून घेऊ आजच्या तरुण पिढीची. जेन झी या नावाने ओळखली जाणारी ही तरुण पिढी खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहे. रंग रूपापेक्षा त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास आहे. दांडगी इच्छाशक्ती हे त्यांचे बळ आहे. उद्याचा भारत घडवण्यात याच पिढीचा मोठा वाटा असेल. यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat@LokmatMumbai@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात तिसरी ओळख करून घेऊ या मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, आणि आर्थिक घडामोडीत योगदान देणाऱ्या कोळी समाजातील भगिनींची. समुद्राशी नाते जोडून मत्स्य व्यवसायातून कुटुंबाचा आर्थिक गाडा सांभाळणाऱ्या या कोळी महिलांनी आपल्या अपार कष्टातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat@LokmatMumbai@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar #कोळीबांधव
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात दुसरी ओळख
या तरुण महिला कलाकारांची.
भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपण्याचा आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. सतार, तबला, बासरी, हार्मोनियम आणि गायन अशा विविध कलाप्रकारांतून या तरुणी वादनकौशल्याने रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@LokmatMumbai
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आजपासून सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या उपक्रमात पहिली ओळख मल्लखांबाच्या माध्यमातून स्वतःचे नाव राज्य आणि देशपातळीवर नेणाऱ्या कर्तबगार मुलींची.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे
@lokmat@vijayjdarda@RajendrajDarda@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@LokmatMumbai@devendarda@rishidarda@karandarda
IAS officer Tukaram Mundhe's bold, transparent and rule-based working style has become a strong example of what determined leadership can achieve. In this context, Lokmat Group Editorial Director Rishi Darda has written a powerful editorial that every administrator, public representative and citizen should read.
"One Officer, One Month, and the System Back on Track!" is not just about appreciating one officer. It raises an important question—if one committed officer can bring visible change within a month, why can't the entire system do the same?
The editorial highlights that India does not lack laws or rules. What is often missing is the will to implement them honestly and fearlessly. Real public trust is earned through action, not promises.
Tukaram Mundhe's decisive work and Rishi Darda's sharp analysis together send a strong message: Good governance begins with accountability, courage and commitment. 👏
#RishiDarda #TukaramMundhe #GoodGovernance #Leadership #Lokmat
@rishidarda@vijayjdarda@RajendrajDarda@devendarda
https://t.co/HWTGcKzAPK
https://t.co/b45x767Jwv
https://t.co/qyQ7IYnJFx
अत्यंत संयमित, स्पष्ट शब्दात लिहिलेला लेख आणि घेतलेली ठाम भूमिका अत्यंत वाचनीय आहे. अशी स्वच्छ भूमिका घ्यायला हिम्मत लागते. अभिनंदन सर. @RajendrajDarda@lokmat