Heartiest congratulations to Karan Darda on being elected president of the Indian Newspaper Society, the apex body representing all newspapers, magazines and periodicals in India.
I am very glad that he is following in the footsteps of @vijayjdarda Bhaiyya who was the president of the INS in 1997-98.
This is a proud and significant moment, not just for Karan, but for the entire Lokmat family. His experience of serving as deputy president and vice-president of INS will be beneficial as he takes the reins of this prestigious body.
At Lokmat, Karan’s innovative initiatives across editorial, operations, circulation and marketing have made a significant impact. I am sure his vision, energy and forward-looking approach will bring the same dynamism to the INS and contribute to the growth and progress of the newspaper industry.
Wishing Karan great success in this new responsibility. I am confident that he will lead the INS with vision, conviction and distinction.
@devendarda@rishidarda@karandarda@lokmat
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने मंगळवारी संध्याकाळी मुंबईत झालेला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळा खूप रंगला.
सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रख्यात अभिनेते आमिर खान यांनी घेतलेली मुलाखत.
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला तेंव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रतिभाशाली अभिनेते विकी कौशल यांना 'छावा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला. आऊटस्टँडिंग पॉलिटिशियन म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना गौरविण्यात आले.
राजकारण, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय, लोकसेवा समाजसेवा, पोलीस, प्रशासन, कृषी, क्रीडा, स्टार्टअप अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गुणवंतांचा हा गौरव पुरस्कार खूप हृद्य झाला.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विश्वास नांगरे पाटील, सनदी अधिकारी अश्विनी भिडे, डॉ संजय मुखर्जी, मनीषा म्हैसकर, विजय सिंघल, इकबाल सिंग चहल, डॉ. अनिल गायकवाड, लोकमतचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ बंधू डॉ. विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, पुरस्कार सोहळ्याचे संकल्पक, आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रितांच्या साक्षीने झालेला हा सत्कार सोहळा अविस्मरणीय ठरला.
सर्व ज्युरी सदस्य, कार्यक्रमास उपस्थित मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित मान्यवर आपले खूप खूप आभार. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम करणाऱ्या लोकमत मधील माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Devendra_Office@mieknathshinde@Prof_RamShinde@rahulnarwekar@cbawankule@AKPPL_Official@vickykaushal09@vijayjdarda@devendarda@rishidarda@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@CIDCO_Ltd@AshwiniBhide
#LokmatAwards #LMOTY
#LokmatMaharashtrianoftheYear
आज लोकमत समूहासोबत काम करताना माझी 25 वर्षे पूर्ण झाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ट्रेनी इंजिनियर म्हणून सुरू झालेला माझा प्रवास आज क्लासिफाइड विभागाचा महाराष्ट्र व गोवा हेड या पदापर्यंत पोहोचला आहे.
#लोकमत#lokmat
लोकमत छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचा वर्धापन दिन माझ्यासाठी नेहमीच विशेष असतो. हर्ष, स्वप्नपूर्ती, कृतज्ञता, आणि भविष्याबद्दल प्रचंड आशावाद अशा अनेक भावना माझ्या मनात दाटून येतात. 'लोकमत'च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त लोकमत परिवारातल्या माझ्या सर्व सदस्यांशी हितगुज साधताना आज चार दशकांहून जास्तीचा हा सर्व प्रवास माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. १९८१ साली मी जेंव्हा इथे आलो तेंव्हा पैसे, मनुष्यबळ आणि संसाधनांचा अभाव आमच्या समोर होता. माझ्याकडे शिदोरी होती ती 'लोकमत'चे संस्थापक बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन, विजयभैय्यांची खंबीर साथ आणि लोकमत परिवारातले माझे जीवाला जीव देणारे सहकारी. १९८२ ला याच दिवशी 'लोकमत'चा पहिला अंक प्रकाशित झाला तेंव्हा माझी संपूर्ण टीम होती अवघ्या ३५ लोकांची. मी त्यांना संस्थापक सदस्य म्हणेन. बऱ्याच जणांना कामाचा अनुभव नव्हता, कारकिर्दीची नुकतीच सुरवात होती पण सर्वांमध्ये एक समान धागा होता - मेहनतीची तयारी आणि काहीतरी जगावेगळे करून दाखवयाची जिद्द. 'लोकमत'ची उत्तरोत्तर प्रगती झाली यात मग आश्चर्य वाटायला नको. पुढे अनेक नवीन, समर्पित सदस्य जोडले गेले. 'लोकमत'ने नेहमीच लोकांच्या प्रश्नाला महत्व दिले, नवीन तंत्रज्ञान स्वीकारले, कालानुरूप वृत्तपत्रात बदल केले. सर्वांच्या सांघिक मेहनतीचे फळ म्हणजे आज लोकमत महाराष्ट्रातील गावागावात पोहोचलेले आघाडीचे दैनिक आहे. मला एका गोष्टीचे विशेष समाधान आहे. पुढील पिढी म्हणजे देवेंद्र, ऋषी आणि करण हे 'लोकमत'चा झेंडा डौलाने फडकवत ठेवण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डिजिटल पत्रकारिता हे नवे बदल स्वीकारत ते प्रिंटच्या व्यवसायालाही बळकटी देत आहेत. लोकमत परिवारातील सदस्यांना माझे फक्त एक सांगणे आहे - तेचतेच काम करण्यावर विश्वास ठेऊ नका, काहीतरी 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करा. यश निश्चितच मिळेल.
मराठवाड्यातील चोखंदळ वाचक, जाहिरातदार, आणि स्नेह्यांचे खूप खूप आभार. मी खरंच आपला ऋणी आहे. 'लोकमत'ला आपण आपला मानले, 'लोकमत'चे सर्व प्रयोग स्वीकारले, टीकाही केली, अनेक सूचना केल्या पण भल्या पहाटे लोकमत वाचल्याशिवाय आमचा दिवस सुरु होत नाही असे सांगणारे असंख्य वाचक मला नेहमी भेटतात. खूप खूप धन्यवाद..
@vijayjdarda@devendarda@rishidarda@karandarda
#Lokmat #ChhatrapatiSambhajinagar
लोकमत संसदीय पुरस्कार (२०२४-२५) भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. काल नव्या महाराष्ट्र सदनात हा भव्य समारंभ आयोजित करण्यात आला. दिग्विजय सिंह (आजीवन योगदान पुरस्कार – राज्यसभा),
टी. आर. बालू (आजीवन योगदान पुरस्कार – लोकसभा), संजय सिंग (सर्वोत्तम संसदपटू पुरस्कार – राज्यसभा), जगदंबिका पाल (सर्वोत्तम संसदपटू पुरस्कार – लोकसभा), डोला सेन (सर्वोत्तम महिला संसदपटू पुरस्कार – राज्यसभा), संगीता कुमारी सिंग देव (सर्वोत्तम महिला संसदपटू पुरस्कार – लोकसभा), सुधा मूर्ती (सर्वोत्तम नवोदित संसदपटू पुरस्कार – राज्यसभा) आणि इकरा चौधरी (सर्वोत्तम नवोदित संसदपटू पुरस्कार – लोकसभा) या संसद सदस्यांचा गौरव करण्यात आला. अनेक जुन्याजाणत्या आणि तरुण नेत्यांशी यावेळी मी संवाद साधला. देशाच्या राजधानीत काम करणाऱ्या खासदारांचे व्हिजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्युरी मंडळाच्या सदस्या आणि ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त, लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा, मॅनेजिंग डायरेक्टर देवेंद्र दर्डा हे व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्रातील अनेक खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. खुमासदार पण विचारपूर्ण भाषणे, राजकीय जुगलबंदी यामुळे कार्यक्रम खूप रंगला.
@IqraMunawwar_@SmtSudhaMurty@digvijaya_28@Munilokesh@praful_patel@BDUTT@SanjayAzadSln
#LokmatParliamentaryAwards
#Lokmat #NewDelhi
उत्तम अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येत असताना डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सतत घसरत आहे. काल इतिहासात पहिल्यांदाच रुपया प्रतिडॉलर ९०च्या वर गेला. कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किंमती, भारत अमेरिका व्यापार कराराबाबतची अनिश्चितता, परदेशी संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेणे या कारणांमुळे रुपया घसरत आहे. रिझर्व्ह बँक डॉलर विकून हस्तक्षेप करू शकते पण त्यालाही मर्यादा आहेत कारण परकीय चलन साठा त्यामुळे खर्चला जातो.
घटत्या रुपयामुळे आयात, तेल, सोने, परदेशी शिक्षण महाग होणार आहे कारण त्याचे पेमेंट डॉलरमध्ये केले जाते. एकंदरीतच महागाई वाढेल ही सामान्य माणसाच्या दृष्टीने चिंतेची बाब. वित्तीय तूट वाढणे, परकीय गुंतवणूक कमी होणे हे धोके आहेतच.
मात्र, निर्यातदार पडत्या रुपयामुळे फायद्यात राहतील कारण त्यांना त्यांच्या सेवा, उत्पादनांसाठी जास्त रुपये मिळतील.
सरकारला अपेक्षा आहे की पुढील वर्षी रुपयाची स्थिती सुधारेल. मात्र, मजबूत अर्थाव्यवस्थेसाठी रुपयाची ही घसरण लवकर थांबून भारतीय चलन मजबूत आणि स्थिर राहो हीच सर्वांची अपेक्षा असेल.
#RupeeVsDollar #RupeeVsDollar #RupeeAt90
लोकमत मुंबई महामॅरेथॉनच्या ९व्या पर्वाला आज मिळालेला प्रचंड प्रतिसाद भारावून टाकणारा होता. पहाटेच्या गुलाबी थंडीत ठाणे येथे जमलेल्या विविध वयोगटातील हजारो धावकांचा जोश पाहण्यासारखा होता. प्रख्यात कलाकार श्रेयस तळपदे, सुबोध भावे, शशांक केतकर, सायली संजीव यांच्या उपस्थितीने त्यांच्या उत्साहात भर पडली. आरोग्यविषयी जागृतीच्या उद्देशाने आणि तंदुरुस्तीच्या ध्येयाने सर्व धावले.
मला खूप आनंद होतो आहे की छत्रपती संभाजीनगरला छोट्या रूपात सुरु झालेली ही स्पर्धा आता एक राज्यव्यापी चळवळ झाली आहे. लोकमत महामॅरेथॉनच्या संचालक रुचिरा दर्डा आणि त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.
@MahaMarathon@shreyastalpade1
#Mumbai #MahaMarathon
#thane #Lokmat
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, 'लोकमत'चे संस्थापक, चतुरस्त्र संपादक, राज्याचे माजी मंत्री आणि माझे पिता जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २८व्या स्मृतिदिनी आज प्रेरणास्थळ, यवतमाळ येथे विनम्र अभिवादन केले. असंख्य स्मृती डोळ्यांसमोर दाटून आल्या.
बाबूजी अनेक कठीण प्रसंगांना सामोरे गेले, भरपूर टीका झेलली, पण तरीही त्यांनी त्यांची शांती कधीही ढळू दिली नाही. सदैव कार्यरत राहणे आणि सकारात्मकतेचा मार्ग धरून ठेवणे हा त्यांचा जीवनमंत्र होता त्यामुळेच त्यांची मुद्रा नेहमी प्रसन्न आणि हसतमुख असे. 'लोकमत'ने सामान्य माणसांच्या समस्या आणि व्यथा निर्भयपणे मांडल्या पाहिजेत, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या शिकवणीवर आजही संपूर्ण लोकमत परिवार चालत आहे.
बाबूजी, आपल्या स्मृती आमच्या हृदयात सदैव चिरंतन आहेत.
स्मृती समारोहाची पूर्वसंध्या प्रख्यात गायक नितीन मुकेश यांच्या संगीतमय स्वरांजलीने अविस्मरणीय ठरली.
@vijayjdarda@devendarda@rishidarda@karandarda@lokmat
#JawaharlalJiDarda #Lokmat #Yavatmal
खूप वर्षानंतर शुक्रवारी विधानभवनाला भेट दिली. माझ्यासमवेत 'लोकमत'चे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा हेही होते.
१५ वर्षे याठिकाणी आमदार, मंत्री म्हणून मी काम केले आहे. विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणे, उद्योग मंत्री, शिक्षण मंत्री म्हणून अनेक महत्वाची विधेयके मांडणे, विरोधकांना सामोरे जाणे आणि आमदार म्हणून महत्वाच्या चर्चांमध्ये भाग घेणे... अनेक आठवणी जाग्या झाल्या.
विधानसभेचे तरुण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची यावेळी भेट झाली आणि खूप बरे वाटले. १९३५ पासून सर्व सदस्यांनी केलेल्या कार्याचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प ते पूर्णत्वाला नेत आहेत. हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज असणार आहे. अभिनंदन आणि धन्यवाद नार्वेकरजी.
#Mumbai #VidhanBhavan
१५० वर्षांचा गौरवशाली प्रवास... पण ‘वंदे मातरम्’चा नाद आजही तितकाच जाज्वल्य! लाखो स्वातंत्र्यसैनिकांना त्याग आणि बलिदानाची प्रेरणा देणारे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या लेखणीतून अवतरलेले हे राष्ट्रीय गीत भारतभूमीच्या वैभव, सौंदर्य आणि संपन्नतेचे अजरामर स्तोत्र आहे.
मातीच्या सुगंधात मिसळलेले, हृदयाला अभिमानाने भरून टाकणारे ‘वंदे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा बनले.
त्या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#VandeMataram #BankimChandra #FreedomMovement
नेपाळमध्ये उसळलेल्या हिंसक आणि रक्तरंजित क्रांतीतून जेन झी म्हणवला जाणाऱ्या तरुण वर्गातील अस्वस्थता उघड झाली आहे. या पिढीला चांगले शिक्षण, व्यवसाय आणि नोकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, कोविडनंतर अद्याप सावरू न शकलेली नेपाळची अर्थव्यवस्था या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे. त्यातच भ्रष्टाचार आणि नेत्यांची ऐषआरामी जीवनशैली यांनी तरुणांच्या नाराजीत अधिकच भर घातली. सोशल मीडियावर घातलेल्या निर्बंधांमुळे या रोषाचा स्फोट झाला.
या घटनाक्रमातून तरुणांच्या जीवनात सोशल मीडियाचे किती महत्त्वाचे स्थान झाले आहे, हे स्पष्ट होते. श्रीलंका, बांगलादेश आणि आता नेपाळ - या शेजारी देशांतील घडामोडी भारतीयांसाठीही चिंताजनक आहेत. निरंतर प्रगतीसाठी उपखंडात शांतता आणि स्थैर्य टिकले पाहिजे, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
#NepalGenZProtest #NepalPolitics
लंडन येथे पार पडलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’नंतर छत्रपती संभाजीनगरला परतलो. हा खरंच एक अविस्मरणीय अनुभव ठरला. लोकमत समूहाचे अध्यक्ष व माझे ज्येष्ठ बंधू विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभूतपूर्व परिषदेत भारताची ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, विकासाच्या संधी आणि धोरणात्मक बदल यांवर सखोल चर्चा झाली.
राजकारण, व्यवसाय, प्रशासन, माध्यमे, सामाजिक सेवा आणि प्रवासी भारतीय अशा विविध क्षेत्रांतील अग्रगण्य भारतीय व विदेशी मान्यवर या मंचावर एकत्र आले, हा एक दुर्मिळ योग होता. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी, वेदांत गृपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, फिनोलेक्सचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, गल्फ ऑइल इंटरनॅशनलचे अध्यक्ष संजय हिंदुजा, लॉर्ड रामी रेंजर, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ओबीसी मंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, खा. सुनील तटकरे, खा. अजित गोपछडे, राज्यमंत्री सर्वश्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, पंकज भोयर यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींना या वेळी पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर चार चर्चासत्रे झाली. यापैकी ‘महाराष्ट्र - द इकॉनॉमिक पॉवरहाऊस ऑफ इंडिया’ या विषयावरील चर्चासत्राचे संचालन करण्याची संधी मला मिळाली.
शिक्षणानिमित्त मी काही वर्षे लंडनला राहिलो असल्याने या शहराशी माझे भावनिक नाते आहे; त्यामुळे अनेक गोड आठवणी ताज्या झाल्या. एक गोष्ट विशेष जाणवली ती म्हणजे तिथे जमलेल्या प्रत्येक भारतीयाचा प्रचंड आत्मविश्वास. अमेरिकेने लादलेले टेरिफ असो वा इतर आव्हाने - कुणीही घाबरलेले नव्हते. उलट, “हे शतक भारताचे आहे” असा ठाम विश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मूलभूत सुविधा, शिक्षण, व्यवसायसुलभता आणि सुशासनावर भर दिला तर भारताला कुणीही अडवू शकणार नाही, असा ठाम सूर होता.
या परिषदेतील अनुभवाने प्रचंड ऊर्जा घेऊन मी परतलो आहे. या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व लोकमत सहकारी व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@nitin_gadkari@PiyushGoyal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@vijayjdarda@VDoraiswami@fadnavis_amruta@RamdasAthawale@rahulnarwekar@save_atul@AshokChavan1958@MPLodha@SanjayShirsat77@SMungantiwar@HCI_London@AnilAgarwal_Ved@SunilTatkare@dbmahadik@RVikhePatil
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या जीवनात विविध टप्प्यांवर मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांना नमन.
उद्योजकतेपासून पत्रकारिता, राजकारणापासून समाजसेवेपर्यंतच्या माझ्या प्रवासात अनेक दिग्गजांनी मला शिकवलं, घडवलं. त्यांच्या अनुभवांमधून मिळालेली शिदोरी माझ्या वाटचालीला दिशा देत राहिली आहे. मी त्यांचा कृतज्ञ आहे.
अजूनही शिकत आहे, अजूनही शोध सुरूच आहे - कारण जीवन हे एक सतत शिकण्याची शाळा आहे.
माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षक, मार्गदर्शक, सहकारी, आणि टीकाकार - हे सर्व माझ्या दृष्टीने 'गुरु'च आहेत.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे गुरु लाभोत, अशीच प्रार्थना.
#gurupurnimawishes #GuruPurnima
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत संपन्न झालेल्या बीकेटी प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड्सच्या चौथ्या पर्वाच्या शानदार राज्यस्तरीय सोहोळ्यात आज सहभागी झालो. सरपंच म्हणजे गावाचा पालक, कर्णधार. राज्यभरातून आलेल्या शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत, टाळ्यांच्या गजरात आणि अपूर्व उत्साहात विविध विजेत्या सरपंचांचा आज सन्मान करण्यात आला. सरपंचांशी संवाद साधताना गावपातळीवर किती कल्पकतेने, जबाबदारीने आणि समर्पणाने कामे झाली आहेत, हे जाणवले. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व मंत्रीमहोदय, अधिकारी आणि निमंत्रितांचे खूप खूप आभार.
@Jaykumar_Gore@kokate_manikrao@iAditiTatkare@OfficeofAditi@iYogeshRKadam@rishidarda
जगण्यासाठी ऑक्सिजन जितका आवश्यक, तितकंच हास्यही! चार्ली चॅपलीन म्हणतात ज्यादिवशी आपण हसलो नाही तो दिवस व्यर्थ आहे. चिंता, राग – सगळ्यावर हसणं रामबाण उपाय!
आज जागतिक हास्यदिनानिमित्त हसा, आणि इतरांनाही हसवा!
#WorldLaughterDay
Congratulations, Karan, on pursuing the Executive MBA Business Programme at the prestigious Harvard Business School, Boston! I truly admire your determination to take up higher studies despite being deeply immersed in work. Facing challenges and emerging with flying colours has become second nature to you—and this achievement is no exception.
I’m confident that the insights and knowledge you’ve gained at this globally renowned institution will greatly benefit both you and the Lokmat Group in the times to come.
@vijayjdarda@devendarda@rishidarda@karandarda@lokmat@LokmatTimes_ngp
प्रकाश आणि भक्तीचा अद्भुत संगम!
वेरूळ लेणी क्रमांक 10 मध्ये भगवान बुद्धांच्या मुखावर सूर्यप्रकाशाचा सुवर्णस्पर्श झाला तो दिव्य क्षण अनेक भक्तांनी, पर्यटकांनी सोमवारी अनुभवला.
सूर्य उत्तरायणाला जात असताना सूर्यकिरणे लेणीत येत असतात. प्राचीन स्थापत्य कलेचा हा अद्भुत अविष्कार थक्क करणारा आहे.
#Ellora #Heritage #BhagwanBudhha
चीनच्या डीपसेक चॅटबॉटने अमेरिकेच्या चॅट-जीपीटी आणि अन्य चॅटबॉट्सना दिलेल्या आव्हानाची चर्चा होत असताना भारताने सर्व भारतीय भाषा, संस्कृती यांना नजरेसमोर ठेऊन स्वतःचे कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेल विकसित करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात देशाला जागतिक स्तरावर स्पर्धेत उतरण्यासाठी हे आवश्यकच आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोन्स ने केलेली क्रांती आपण बघत आहोत. आता भारताचा जगातील सर्वांत स्वस्त चॅटबॉट मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो.
गेले काही महिने मी एआयचा अभ्यास करत आहे. कार्यालयीन पत्रव्यवहार, भाषणे, भाषांतर हे ज्या अचूकतेने आणि अवघ्या काही सेकंदात चॅटबॉट करतो ते अविश्वसनिय आहे. बातम्यांचे लेखन, संपादन, छायाचित्र संपादन यात नाविन्य, कलात्मकता आणण्याची प्रचंड क्षमता या तंत्रज्ञानात आहे. खरे तर वैद्यकीय सेवा, कायदा, शिक्षण आणि अन्य अनेक क्षेत्रात दुरगामी बदल आपण बघणार आहोत. येऊ घातलेल्या या महाक्रांतीला तयार राहणे हेच शहाणपणाचे असणार आहे.