महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली राजकीय कारकीर्द वृद्धिंगत होवो आणि आपणांस उत्तमोत्तम आरोग्य-दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा !
#वाढदिवस#Devendra#Fadnavis#Birthday#Wishes
आपले संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्या, गोरगरीब, शिक्षणापासून व विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या व्यथा मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्ण��भाऊ साठे यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन.
#लोकशाहीर #पुण्यतिथी #अभिवादन
मॅरिगोल्ड सोसायटी परिसरात पावसाळ्यात नाल्याच्या पाण्यामुळे दुर्गंधी व मच्छरांच्या समस्येची नागरिकांकडून माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सोसायटीचे नागरिक उपस्थित होते समस्येवर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या
सुंदराबाई शाळा ते गणेशनगर चौक या मार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रा��ी येत होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत रात्रीच्या वेळी खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले.
यावेळी मी स्वतः रात्री उशिरापर्यंत उभे राहून कामाची पाहणी केली
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.
वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि कृषी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#KrushiDin#vasantraonaik#AgricultureDay
🎓 कर्तव्यनिष्ठ शिक्षकाला मानाचा मुजरा! 🌸
आज आपल्या वडगाव शेरी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री. अशोक भिकाजी मोरे सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभास सहकारी नगरसेवकांसमवेत उपस्थित राहण्याचा योग आला.
मोरे सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देत ��िक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या समर्पित सेवेसाठी मनःपूर्वक आभार व्यक्त करत, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या शुभेच्छा दिल्या.
🏅 जागतिक ऑलम्पिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ऑलम्पिक ही केवळ स्पर्धा नसून उत्कृष्टता, मैत्री आणि सन्मान या मूल्यांचा जागतिक उत्सव आहे. खेळाडूंच्या अथक परिश्रम, जिद्द आणि क्रीडाभावनेतून आपल्याला प्रेरणा मिळते.
निरोगी जीवनशैली, क्रीडा संस्कृती वृद्धिंगत करण्याचा संकल्प करूया.
भारतीय महिला हॉकी संघाचा FIH Women's Nations Cup मधील ऐतिहासिक वि��य! न्यूझीलंडवर २-० अशी मात करत भारताने विजेतेपदासह FIH Pro League मध्येही पुनरागमन निश्चित केले.
तुम्ही फक्त सामना जिंकला नाही, तर लाखो भारतीयांच्या हृदयात अभिमानाचा नवा अध्याय लिहिला आहे. ❤️
पुणे महानगरपालिकेच्या वतीने एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात सहभागी ��ोत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
“योग करा, निरोगी रहा!” 🌿
नारायण मोहन गलांडे
नगरसेवक तथा अध्यक्ष, क्रीडा समिती, पुणे महानगरपालिका
#आंतरराष्ट्रीय_योग_दिन #YogaDay2026
परिश्रम, साधेपणा आणि कर्तृत्वाचा प्रेरणादायी प्रवास...
महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा.
@rashtrapatibhvn#happybirthdaydroupadimurmu
पुणे मनपा भवन येथे क्रीडा समिती कार्यालयामध्ये विविध प्रशासकीय व विकासकामांचा आढावा घेत कामकाज पाहिले.
शहरातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, खेळाडूंना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज पेरून 'हिंदवी स्वराज्य' निर्मितीचे स्वप्न साकारणाऱ्या राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान कायमच प्रेरणा देत राहील ! स्वराज्याच्या स्फूर्तीदेवता, थोर आदर्शमाता माँ जिजाऊ साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त वंदन