मा. मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis जी, ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आमची सर्वांचीच आपणास नम्र विनंती आहे की, MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास, पारदर्शकता आणि समान संधी यासाठी ऑफलाइन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वांच्या वतीने या निर्णय बद्दल आपले खुप खुप आभार.. 🙏🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mpsc_office
#2027 पासून #MPSC च्यापरीक्षा ऑनलाईन होणार असेल तोही निर्णय आम्हाला मान्य नसेल. आम्हाला वेळ नको. तर आम्हाला ही ऑनलाईन परीक्षा पद्धतच नको. 2045 पासून सुद्धा नको.रस्त्यावर उतरावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही.
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@RRPSpeaks@AbhiPawarBJP
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
सर्व विद्यार्थ्यांचा विरोध असताना कोणाच्या फायद्यासाठी ऑनलाइन परीक्षेचा इतका अट्टाहास?
सर्व व्यवस्था ही नागरिकांसाठी असते ना की स्वतःच्या फायद्यासाठी.
विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लावू नका. परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच झाल्या पाहिजेत. यावर कोणतीही तडजोड मान्य नाही. 😡
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
MPSC ऑफलाइन परीक्षा ठिय्या आंदोलन दिवस ९….
📢 महत्त्वाचे आवाहन | सर्व विद्यार्थी, काँग्रेस परिवार आणि नागरिकांसाठी
प्रिय स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, क्लासेसचे संचालक, पालक, काँग्रेस परिवारातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल, AIPC, विविध विभाग व सेलचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील जनतेस,
MPSC परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी MPSC कार्यालय, सीबीडी बेलापूर येथे गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जाहीर केलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, रोजगार - स्वयं रोजगार विभाग आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या तर्फे आज दुपारी २.०० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत गेल्या नऊ दिवसांच्या संघर्षाचा आढावा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या घोषणेबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका, MPSC कडून अपेक्षित पुढील अधिकृत निर्णय आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील कृतीची दिशा जाहीर करण्यात येईल.
या संघर्षात राज्यभरातील लाखो विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, क्लासेसचे संचालक, सामाजिक संस्था आणि काँग्रेस परिवाराने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचीही ही संधी आहे.
विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक, गांधीवादी, संविधानिक आणि अहिंसक संघर्षाचे साक्षीदार होण्यासाठी आणि या महत्त्वाच्या घोषणेला उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
📍 स्थळ: MPSC कार्यालय, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई
🕑 वेळ: आज दुपारी २.०० वाजता
विद्यार्थ्यांचा संघर्ष, काँग्रेसचा संकल्प!
जय हिंद!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@DalviAaba@bhimanwar@mpsc_office@INCMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
@RRPSpeaks लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय?
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मा.@mpsc_office@bhimanwar आपल्याला विनंती आहे कि, ऑनलाईन परीक्षा, normlization यामुळे आमचे 2 ते 3 वर्षे वाया गेले. आपल्या मार्फत होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकारच्या दबावाखाली आपण काम करत आहात का?
लवकरात लवकर निर्णय माघे घेण्यात यावा.
#MpscOfflineExam
लाखो विद्यार्थ्यांची एकच मागणी!
MPSC परीक्षा ऑफलाईन घ्या.
ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक अडचणी आणि पारदर्शकतेवरील प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर ऑफलाईन परीक्षा हाच योग्य पर्याय आहे
विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका! @mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
आपला अभ्यासक्रम ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बनवण्यात आले.
UPSC जर संपूर्ण देशात परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेत असेल तर आपण ऑनलाइन का.?
जुनी लोक सांगतात मोठ्यांच अनुकरण करायचं असतं.
@mpsc_office#MPSC
MPSC परीक्षा म्हणजे हजार, पाचशेच्या नोटा नव्हेत की 'आली लहर केला कहर' म्हणून नोटबंदीसारखे आयत्या वेळेस वाटेल ते बदल करावेत. जेवढा वेळ आणि शक्ती MPSC च्या परीक्षांचे नियम बदलण्यात घालवली जाते, तितकी जर तरुणांच्या भवितव्यात गुंतवली तर या देशाचे भले होईल. या राज्याचा गाडा चालवू शकणारे तरुण प्रशासनाला हवे आहेत की नको?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan
#MPSC
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar "संवाद नको, चर्चा नको, फक्त निर्णय हवा—ही भूमिका आयोगाची असेल, तर मग विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची घोषणा नेमकी कोणासाठी होती?"