📍पवई.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित "पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा" या उपक्रमाअंतर्गत पवई तलावाच्या स्वच्छता व संवर्धन कामास सुरुवात केली, याप्रसंगी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री.सिद्धेश कदम, आ.श्री.दिलीप मामा लांडे, सचिव श्रीमती जयश्री भोज, सदस्य सचिव श्री.अविनाश ढाकणे, महानगरपालिका उपायुक्त श्री.संतोष दौड उपस्थित होते.
तसेच निसर्ग, वनशक्ती, बुऱ्हाणी फाउंडेशन, पर्यावरण दक्षता मंच, NSS, प्रोजेक्ट राईस सारख्या विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@MahaDGIPR@isiddheshRkadam@Mi_DilipLande
#MajhiVasundhara
#EnvironmentClimateChange
#WorldEarthDay #EarthDay #वसुंधरा_दिन #पर्यावरण #माझी_वसुंधरा
भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा प्रवास योजनेअंतर्गत आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटन आणि विविध कार्यक्रमांविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. कार्यकर्त्यांनी देखील याप्रसंगी त्यांच्या भावना व्यक्त करून उत्स्फूर्त प्रतिसादात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी आ.अश्विनीताई जगताप, मा.खा.अमर साबळे, शहर जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
@iAshwiniJagtap@BJP4India@BJP4Maharashtra@cbawankule
#BJP #chinchwad #Pune
श्रावण मासानिमित्त आज बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ (छ. संभाजीनगर) येथील श्री घृष्णेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
#Ghrushneshwar#Jyotirlinga#घृष्णेश्वर
📍बालेवाडी,पुणे | भाजपा प्रदेश महाअधिवेशन
आमचे नेते, केंद्रिय गृहमंत्री ना.श्री.अमितभाई शाह जी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बालेवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महा अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमितभाई शहा यांनी सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.येत्या विधानसभा निवडणुकीत संपुर्ण ताकदीने कामाला लागण्यासाठीची नवउर्जा या संबोधनातून प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांस मिळाली.
नुकतीच भाजपा आणि महायुतीकडून विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल अमितभाई शाह यांनी विशेष सन्मान करून शुभेच्छा दिल्या. याबद्दल त्यांचे मनस्वी आभार.
उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रभारी मा. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी आणि सहप्रभारी मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी, सह संघटन मंत्री शिवप्रकाशजी,
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा.श्री.विनोदजी तावडे, मा.श्री.आशिष जी शेलार, मा.श्री.रावसाहेब जी दानवे मा. श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@AmitShah@BJP4India@BJP4Maharashtra@byadavbjp@AshwiniVaishnaw@shivprakashbjp@Dev_Fadnavis@cbawankule@TawdeVinod@ShelarAshish@raosahebdanve@ChDadaPatil
#MahaBJPKaryakarini #Pune
आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी बांधव आणि भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा, विठूरायाच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही पंढरीनाथाचरणी प्रार्थना.
जय हरी विठ्ठल!
राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे बंधू धनंजय मुंडे उर्फ आमचे धनु भाऊ यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते!
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि सुख संपन्नता देवो.
@dhananjay_munde
केंद्रीय रक्षामंत्री तथा भाजपा के वरिष्ठ नेता आदरणीय श्री @rajnathsingh जी को जन्मदिन कि हार्दिक शुभकामनाए.
आपके स्वस्थ्य जीवन और दीर्घायु की कामना करती हूं!
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आज वडीगोद्री येथे उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघे पाच दिवस झाले उपोषण करत आहेत.
कालपासून त्यांनी पाणी देखील त्यागले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे वंचितांच्या लढ्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा धीर देण्यासाठी मी गेले. सरकारमधील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल द्यावी आणि त्यांना सन्मान देऊन उपोषण सोडवावे व न्याय द्यावा.