आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…
असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे..
सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या…
संतश्रेष्ठ श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले.
#संत_सेवालाल_महाराज#SantSevalalMaharaj
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.