ज्ञानेश्वर नगर येथील आरोग्य केंद्राच्या वादांकित विषयावर ठाण्यात दोन राजकीय गट आमने सामने आल्याचे वृत्तांकन करत असताना ठाण्यातील पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. याबाबत कारवाई करण्यात यावी. @ThaneCityPolice
अधिवेशन संपलं आणि सरकारी जागा लुटण्यास काम सुरू झाल, @cbawankule अशी योजना ठाण्यात आहे का? ठाण्यातील खारेगाव येथे पाणथळ जमिनीवर भराव करून सरकारी जमिनी लुटण्याचे काम सुरू आहे. @ThaneCollector कारवाई होईल का?
https://t.co/DqzuuRhUQj
भिवंडी कडून ठाण्याकडे येताना मानकोली येथे हायवे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाले आहे नऊ किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी एक तास वेळ दाखवत आहे. @ThaneCityPolice
ठाण्याची वनसंपदा असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर येथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर माती मुरूम, डेब्रिजची भरणी सुरू आहे. @NaikSpeaks साहेब आपण गांभीर्याने कारवाई करावी तसेच या भरावाच्या गाड्या वनविभागाच्या गेटमधून येऊर मध्ये कशा गेल्या याची चौकशी व्हावी. @Awhadspeaks
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे टोल गेटवर वाहतूक पोलीस नागरिकांची एक प्रकारे अडवणी करून कारवाई करत आहेत ही दंडेली आणि जाचक कारवाई थांबवण्यात यावी जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. @Dev_Fadnavis साहेब आपण यावर गांभीर्याने लक्ष द्यावे.
जगामध्ये आतापर्यंत विविध क्षेत्रांत जी प्रगती झाली आहे, त्यामध्ये महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही जिथं महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटवलेला नाही. तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा आणि हीन विचारसरणीमुळे महिलांना नेहमीच अन्यायकारक वागणूक मिळाली. त्यांच्या समानतेच्या अधिकाराला नकार देण्यात आला. 'स्त्री म्हणजे चूल आणि मूल' एवढ्यापुरतचं तिचं विश्व मर्यादित करण्यात आलं.
मात्र, त्याच महिलांना संधी मिळताच त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली. त्यांनी देशाचे नेतृत्व केले, सीमांचे रक्षण केले आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला. एवढेच नव्हे तर त्यांनी अवकाशालाही गवसणी घातली.
आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात जगत आहोत. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समतेचं आणि न्यायचं कवच दिलं असलं तरी आजही काही प्रतिगामी प्रवृत्ती स्त्रीच्या जन्माला, तिच्या स्वातंत्र्याला, शिक्षणाला, न्यायाला आणि हक्कांना आव्हान देताना दिसतात. त्यामुळे एक संवेदनशील समाजघटक म्हणून अशा अनिष्ट विचारांचा प्रतिकार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हा आपल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर्श आहे.आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.
आजच्या या विशेष दिनी सर्व स्त्रियांच्या सामर्थ्याला, कर्तृत्वाला आणि योगदानाला सलाम. मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!