शिवसेना नेत्या व आमदार डॉ. @neelamgorhe यांच्या पुण्यातील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी आज @Shivsenaofc राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या श्रीमती. @ShainaNC तसेच श्रीमती. श्रेया योगेश कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
या भेटीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते @mieknathshinde यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने पुढील वाटचाल यावर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
याशिवाय पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता, तसेच शहरातील बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा समाजोपयोगी पद्धतीने वापर करण्याबाबतही चर्चा झाली. पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका अधिक सक्षम करण्यासंदर्भात विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या.
या प्रसंगी राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या श्रीमती. शायना एन. सी., श्रीमती श्रेया योगेश कदम, श्रीमती पूजा रावेतकर, श्रीमती कांताताई पांढरे, श्रीमती रंजना कुलकर्णी, श्रीमती सोनाली लांडगे, श्रीमती भारती जोशी, श्री. महेंद्र जोशी, जायंट्स संस्थेचे डॉ. श्री. कैलास बवले, श्री. गणेश शिरोडे आणि श्री. धनंजय लोखंडे उपस्थित होते.
@iYogeshRKadam
राज्याचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब उत्तम आरोग्य आणि प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत
आपली जिद्द आणि निष्ठा आम्हा सर्वांना प्रेरणा देते.आपण लवकरच बरे व्हा साहेब
खडसेबाई नी स्वतःच्या पक्षाकडे आणि नवऱ्याकडे लक्ष दयावे, शिंदे साहेबांवर बोलायची आपली पात्रता नाही..आपले राजकारण बापाच्या नावावर चालू आहे जास्त बोलायला लावू नका
@Rohini_khadse बाई स्वतःचा पक्ष संपत चालला ते बघा नवऱ्याकडे थोडं लक्ष दया बाकी शिंदे साहेबांवर बोलायची तुमची पात्रता नाही
आपण बापाच्या जीवावर आयत्या बिळावर नागोबा झालेला आहेत बोलायला लावू नका
*शिवसेना: ६० वर्षांचा धगधगता संघर्ष, 'महाराष्ट्र धर्म' आणि हिंदुत्वाचा विचार*
— डॉ. नीलम गोऱ्हे
(शिवसेना नेत्या, मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद)
भाग १
शिवसेना म्हटले की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो महाराष्ट्राचा नकाशा आणि एखाद्या घनदाट जंगलातून अचानक गर्जना करत येणाऱ्या वाघाचे ते धगधगते चित्र! साधारणपणे १९९८ सालापासून, म्हणजेच गेली २६ वर्षे मी शिवसेनेची एक प्रामाणिक कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. महाराष्ट्राबद्दलची प्रखर निष्ठा, ज्वलंत हिंदुत्व, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची मूळ चतुःसूत्री आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडींशी सातत्याने जागरूक राहून संवाद साधणारी आणि निवडणुकीच्या राजकारणात अनेक चढ-उतार पाहत यशाची उत्तुंग शिखरे सर करणारी संघटना म्हणून शिवसेना संपूर्ण जगाला परिचित आहे. अनेक राजकीय पक्ष हे ५०, ६० किंवा ७० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय परंपरेतून तयार होतात. शिवसेनेच्या स्थापनेलाही आता सहा दशके पूर्ण झाली आहेत, तरीही हा पक्ष आजही तितकाच तरुण आणि ऊर्जेने भरलेला वाटतो. त्याचे कारण असे की, स्वातंत्र्योत्तर काळात आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठी माणसाच्या अस्मितेतून जन्माला आलेला हा एकमेव बलाढ्य पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुढे उदयाला आला, परंतु काँग्रेसचीच विचारसरणी घेऊन काम करत असल्याने त्यांच्या नावापुढील 'राष्ट्रवादी' हा शब्द वगळता मूळ विचारात फारसा फरक नव्हता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष उदयाला आला, परंतु तो पक्षही शिवसेनेच्याच मुशीतून आलेला असल्याने ती शेवटी एक 'सेना'च आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर शिवसेना म्हटले की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्त्व जनतेच्या मनाशी थेट एकरूप होते.
सर्वसामान्य आणि अन्यायग्रस्तांसाठी संघर्ष करण्याची त्यांची वृत्ती, चित्रपट, कला, साहित्य, संगीत, क्रीडा आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांशी असणारा त्यांचा थेट, निर्भीड आणि तितकाच निगर्वी संवाद अफाट होता. त्यांच्या संवेदनशीलतेचे अनेक अनुभव लोक सांगतात.
बाळासाहेबांच्या याच विचारांचे सोने करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब हे असेच एक नेतृत्व होते, ज्यांनी 'तिथल्या तिथे न्याय' देण्याची शिवसेनेची पद्धत लोकांच्या मनामनात रुजवली. शिवसेनाप्रमुख आदेश देतील, तीच अंतिम पूर्वदिशा मानून त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे हा शिवसैनिकांचा बाणा होता. मुंबईतील शिवाजी पार्क, लालबाग, परळ, दादर, भोईवाडा, जोगेश्वरी, अंधेरी, वरळी कोळीवाडा, माहीम कोळीवाडा हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले राहिले आहेत. हाच बालेकिल्ला पुढे ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ करत थेट रायगड आणि संपूर्ण कोकणाशी जोडला गेला. मुंबई-कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास असो, ऐतिहासिक मलंगगडाचा प्रश्न असो, स्थानिक पातळीवरील महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय असो की समाजविघातक प्रवृत्तींविरुद्धचा लढा— शिवसेना नेहमीच संघर्षात अग्रभागी राहिली. केवळ मुंबई-ठाणेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात— अगदी धुळे, नाशिक, सातारा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सर्वच ठिकाणी नगरपालिका, जिल्हा परिषदांपासून ते विधानसभा आणि लोकसभेपर्यंत शिवसेनेचे आमदार-खासदार मोठ्या संख्येने निवडून आले. शिवसेनेच्या पूर्वीच्या पिढीने रस्त्यावरचा संघर्ष केला, तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आलेल्या पुढच्या पिढीने विरोधी पक्षात असताना जनतेचा आवाज बुलंद केला आणि सत्ताधारी पक्षात असताना गतिमान व रचनात्मक विकासकामांची अनोखी शैली दाखवून दिली. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे हे राजकीय कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
पूर्वी शिवसेनेचा इतिहास आणि भूमिका या बोर्डाच्या माध्यमातून (शाखांवरील फलक लेखन) लिहिल्या जायच्या, परंतु बदलत्या काळानुसार आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना घराघरांमध्ये आणि तरुणांच्या मोबाईल स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी घेतलेला राजकीय निर्णय आणि 'एनडीए' (NDA) सोबत पुन्हा जाण्याचा घेतलेला पवित्रा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा आहे. शिवसेना कुठतरी काँग्रेसच्या विचारसरणीच्या आहारी जात आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक दबावाखाली काम करते आहे, हे चित्र महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवसैनिकांना कधीच सहन होणारे नव्हते.भाग १- contd भाग २
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@lokmat@LoksattaLive@pudharionline@navshaktiweb@JaiMaharashtraN@LokshahiMarathi@kamleshsutar@ANI
June 14, 2026
Incomplete works in the Vitthal-Rukmini Temple should be completed immediately; will follow up at the government level regarding citizens' issues concerning the corridor – Dr. Neelam Gorhe @neelamgorhe
Pandharpur. June 14: Shiv Sena leader and Hon. Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe today performed the ritual worship and took darshan of Shri Vitthal and Rukmini Mata at Pandharpur. On this occasion, she prayed for the happiness and prosperity of the people of the state as well as for the all-round progress of Maharashtra. On this occasion, Dr. Gorhe was honored on behalf of the society of Pandharpur by presenting her with a shawl and coconuts.
After the darshan, while inspecting various facilities in the temple premises and the ongoing development works, Dr. Gorhe gave some important suggestions to the temple management committee. She suggested that the incomplete works in the temple premises before the onset of the monsoon should be completed immediately. Also, although waterproofing works have been carried out, complaints of water leakage are still coming from some places. Dr. Gorhe said that the Archeology Department should pay serious attention to this matter and take necessary measures.
While expressing the need for a separate and inclusive electrical plan for the temple premises, she appealed to plan keeping in mind the increasing number of devotees in the future. Also, Dr. Gorhe gave suggestions to the temple management committee to provide seating arrangements in the Hirakani Chamber for the convenience of female devotees and to make clean drinking water available.
Meanwhile, a delegation from the Pandharpur Tirthakshetra Bachav Samiti met Dr. Gorhe and submitted a memorandum regarding the proposed temple corridor. The delegation demanded that while constructing the corridor, the houses, lands, and livelihoods of the citizens in the area should be considered and the project should be implemented only after taking the locals into confidence.
On this matter, while assuring the delegation, Dr. Gorhe said that protecting the interests of local citizens while carrying out development works is extremely important. The Pandharpur Tirthakshetra Bachav Samiti should prepare a detailed breakdown of exactly how many houses, shops, and lands of citizens will be acquired and present a review. Efforts will be made to follow up at the government level regarding the difficulties faced by citizens during the implementation of the corridor project and to find an appropriate solution.
During Dr. Gorhe's visit, detailed discussions took place on various issues related to facilities in the temple premises, conveniences for devotees, and the corridor project. This has once again drawn attention to the issues of temple development and devotee facilities.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@sunetrac@ANI@ians_india@PTI_News@DDNewslive@airnewsalerts@DeptArchaeology@LokmatTimes1@timesofindia@htTweets@fpjindia@ShittalKardekar
शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्य म्हणून आज गोपनीयतेची शपथ घेतलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॅा. नीलम ताई गोर्हे यांना विधानभवनात भेटून पुढील शुभेच्छा दिल्या.
@TV9Marathi नीलमताई यांना पक्षाने संधी दिली कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या अभ्यास, कर्तृत्व आणि जनसंपर्काच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.आणि त्यांच्या नेतृत्वाची ती क्षमता आहे म्हणूनच इतर पक्षांनाही त्यांच्यासारख्या नेत्यांची गरज वाटते पण सुषमा ताईंना स्वीकारलं जात नाही,
नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी पीडित मृत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. धायरी येथील तिच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या.#justic
सत्यश्री सोशल फाउंडेशन हे एक छोटेसे रोपटे आज नव्या दिशा आणि नव्या संकल्पनांसह पुढे जात असून, भविष्यात ते एका भक्कम वटवृक्षाचे रूप धारण करेल याबाबत कोणतीही शंका नाही. सत्यश्रीसोबत दररोज नव्या महिला जोडल्या जात आहेत
सौ पूजा रावेतकर
अध्यक्षा :-सत्यश्री सोशल फाऊंडेशन