भूमिअभिलेख विभाग जाहिरात 2025 – भूकरमापक पदांसाठी जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त जागा भरून waiting उमेदवारांना संधी द्यावी. यामुळे नवीन भरतीची गरज कमी होऊन शासनाचा व विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. सकारात्मक निर्णय घ्यावा. @Dev_Fadnavis@ABPNews@Mahabhumi_SCDLR
@degree_holders@cbawankule नवीन पदभरती करायला परत 1/2 वर्ष लागणार. त्यापेक्षा आत्ता झालेल्या 903 पदांच्या भुकरमापक पदभर्तीमध्येच जागावाढ करा आणि Waiting/प्रतीक्षा यादीला असलेल्या सर्व उमेदवारांना संधी द्या. 🙏🏻
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका?
A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे?
B)लोकसत्ता बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे?
C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?
मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती २०२४-२५ चा निकाल कायदेशीर पेचामुळे प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर, मी माझ्या दालनात अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगर अभियंता श्री राम कदम आणि कायदा अधिकारी सौ कोमल पंजाबी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. सदर प्रकरणाची सुनावणी ९ मार्च २०२६ रोजी होणार असली तरी, मधल्या काळात महापालिकेचे वकील आणि उमेदवारांच्या वकिलांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, जेणेकरून तांत्रिक समन्वय साधून निकाल लावणे सोयीचे होईल.
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी तातडीने चर्चा करून माहिती घेण्याचे आणि प्रतीक्षा यादीतील दुय्यम अभियंता पदाची निवड यादी त्वरित जाहीर करण्याचे निर्देशही मी प्रशासनाला दिले आहेत, जेणेकरून उमेदवारांना लवकरात लवकर न्याय मिळेल.
#JuniorEngineerRecruitment #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #bjp4mumbai #BMC
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@AmeetSatam@ShelarAshish@MPLodha@mybmc
WRD WCD PWD जाहिराती लवकर येण्यासाठी Engineering association व विद्यार्थी एक वर्षापासून प्रयत्न करत आहेत तरी लाखो बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात या जाहिराती याव्यात व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही सरकारला विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde
बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी क्र. नअ/१३२१३/आसेप्र दि. २५.११.२०२४ अन्वये घेतलेल्या कनिष्ठ अभियंता JE (स्थापत्य/यांत्रिकी) परीक्षेला तब्बल १० महिने उलटले, तरी निकाल जाहीर झालेला नाही. हजारो उमेदवार प्रचंड मानसिक तणावाखाली प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्या करिअरचे नियोजन, कुटुंबाची जबाबदारी आणि भविष्यातील संधी या सर्वांवर याचा गंभीर परिणाम होत आहे.
प्रशासनातील रिक्त पदांमुळे विकासकामे रखडत असताना पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात होणारा विलंब समजण्यापलीकडचा आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वेळेत निर्णय ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे.
निकाल तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
#BhushanGagrani #BMC @mybmc@INCMaharashtra@degree_holders@Mpsc_Andolan
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde