anonymous with a name| only reactive | RTs LIKEs r Not Endorsement| मराठी | तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे | Fitness & Sports Infra | don't follow
@Garjana206 सर्वात आधी भक्त. त्याची स्कीम बंद होते ना.. दान करा - पुण्य कमवा,
guilt विसरा - कसेही वागा,
प्रतिष्ठा मिळावा - बडेजाव करा,
Pay now - redeem later.
@MarathiDeadpool बरोबर, चाळीसेक वर्षांपूर्वी धूम्रपान, दारू पिणे ही मध्यम वर्गात लाजिरवाणी गोष्ट होती. नंतर ती सामान्य बाब बनली , त्यापुढे त्यांना प्रतिष्ठा पण आली. आता यात वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा असला तरी नॉर्मलाईज व ग्लॅमर येणे मला पटत नाही. Extramarital affairs हा त्यापुढचा टप्पा आहे.
@Godfath52464383 राम जेठमलानी अत्यंत भोळ्या मनाची व्यक्ती होती. लोक गुन्हे करतील यावर त्यांचा विश्वास बसत नसे. याच भावनेतून त्यांनी इंदिरा गांधींचे मारेकरी, राजीव गांधींचे मारेकरी, जेसिका लालचा खुनी मनु शर्मा, हर्षद मेहता, आसाराम यांची वकिली केली. हा थोर माणूस भारताचा कायदा व न्याय मंत्रीही होता.
@mauchiuthecats@Garjana206 बरोबर. आधी सह्याद्रीच्या कड्यांमधून जाणारी पायवाट होती. पायी प्रवासी, घोडेस्वार आणि गाढवे, बैलांवर माल ठेऊन जाणारे वापरत असत. त्याचा गाडी रस्ता (बैलगाडी घोडागाडी) इंग्रजांनी बनवला. बहुतेक मूळ घाटरस्ता वेगळाच असावा. माणूस व प्राणी तीव्र चढाव चढू शकतात पण गाडी असेल तर ते शक्य नाही.
@s_chandorkar हिंदू, क्रिश्चन या धर्मांचे वेगळे अर्थशास्त्र नाहीये. त्यामुळे धर्माधारित राज्य आणि त्याचे अर्थशास्त्र वेगळे असू शकते. Crony capitalism वेगळा विषय आहे व तो देशाच्या धर्मापेक्षा राज्यकर्त्यांवर जास्त अवलंबून आहे. इस्लामचे स्वतःचे अर्थशास्त्र आहे त्यामुळे त्यांचे प्रारूप वेगळे आहे.
@BTechComedian स्वतःची काळजी घे.
स्ट्रेस आणि anxiety शरीरावर खोल परिणाम करतात. सोशल मीडिया पासून थोडे दूर रहायचे आणि आपल्या छंदाला वेळ द्यायचा. मित्रांना वेळ दे. जर आयुष्याकडे त्रयस्थपणे बघितलं तर स्वतःपुरता survival philosophy मिळून जाईल.
@aparanjape@amarbarwe@cIndraneel@ChitaleBandhu गुरुवार हा श्री दत्तात्रेय आणि श्री स्वामी समर्थांचा मानला जातो. त्यांना पेढ्याचा प्रसाद दाखवला जातो. जुनी परंपरा आहे.
P.s. पुलंच्या साता वारांची कहाणी मध्ये गुरुवारचा दत्ताचा पेढा असा उल्लेख आहे.
@drrohanshah_ped@amhiraigadkar इथे तसे कधीच होणार नाही.
अंडे खूप दूरची गोष्ट आहे. इस्कॉनच्या mid day meal मध्ये कांदा लसूण पण नसतो.
भारतीय पुण्य मिळवायला समाजसेवा करतो.
It is always a divine service and not philanthropy.
@shreeniwasngp@GodboleSandeep संस्कृत मध्ये. पण मराठीत कडू.
तसेच तिक्त म्हणजे संस्कृत मध्ये कडू पण मराठीत त्याचे रूपांतर तिखट होऊन अर्थांतर पण झाले आहे.
@nprashant आज राजकारणात पहिल्याचे श्रेय घेऊन हवा करायची पद्धत आहे. अमुक पहिल्यांदा कोणी आणले तमुक भव्य कोणी बनवले फलाणी योजना कोणी आणली. वर हाच खरा विकास हे ठासले जाते. त्यामुळे जे आहे ते व्यवस्थित करणे व कार्यक्षमपणे चालवणे याला राजकारण्यांच्या (आणि राजकारणाच्या) दृष्टीने महत्व उरले नाहीये