@kingsmanT11@drsujayvikhe तुम्ही शिकलेला आहेत असं समजून चांगल बोलाल असं वाटतं होत पण तुम्हीबी कारखानदारच निघालात.
यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती तर तुम्ही आजपर्यंत ऊसतोडीला आले असते आमच्या भागात..!😅
@BJP4Maharashtra@ANI
@old_cricketer सबसे ज्यादा भ्रष्टाचरण करनेवाली सरकार है ये।
ऑइल बाँड्स के नामपर पेट्रोल पर भारी टैक्स थोपा।
अगले एखाद सालमें पूरा पैसा वसूलनेके बादभी इन्फ्रास्ट्रक्चर सुधारनेके नामपर आजतक ३५ लाख करोडसे ज्यादा अतिरिक्त टैक्स वसूला।
पूरा इंफ्रास्ट्रक्चर निजी कंपनियोंसे बनवाकर पैसा जनतासे वसूला।
@SShere9575@mataonline मराठीत एक म्हण आहे “शहाण्याचा व्हावे चाकर पण मूर्खाचा होवु नये धनी”
सत्तेच्या नशेत सत्ताधाऱ्यांना माज आला की हेच उलट होते म्हणजे आपण मूर्खांचे धनीसुध्दा होवु नये परंतु चाकर होवून जातो.
@mataonline कोणताच माणूस किव्हा पक्ष कधीच सलग सत्तेत नसावा. सत्तेचा नशा माज मध्ये कधी बदलतो ते त्यांना पण कळत नसत. भाकरी नेहेमी फिरत राहण्यात जनतेच भल असत. नाही तर मग जन प्रतिनिधी राजा समजतात आणि आपल्याला मुर्खा चाकर.
“लाडकी बहीण” योजनेच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेसची आजची बातमी अस्वस्थ करणारी आहे.
१) चौकशी अंती ह्या योजनेतून ९२ लाख लाभार्थींना वगळण्यात आलं आहे.
२) ह्याचा अर्थ, चुकीच्या लाभार्थींना १४,००० कोटी रुपयांची उधळण झाली आहे.
३) ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतील सदस्य ४ लाख ४२ हजार आहेत.
४) २९,००० पुरुष आहेत.
५) थेट सरकारी कर्मचारी ८,००० आहेत.
६) कॅगच्या अहवालात योजलेल्या खर्चापेक्षा ३,५४१ कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचं म्हटलं आहे.
योजना जून २०२४ ला जाहीर झाली. ॲागस्टमध्ये दोन हप्ते देण्यात आले. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक झाली. त्याच निवडणुकीत नंतर सत्तेत आलेल्या महायुतीनं ह्याच योजनेत महिना दीड हजार वरून ती रक्कम दोन हजार करण्याचं आश्वासन दिलं होतं.
सुज्ञ आणि जागरूक नागरिकांना ह्यातून अर्थ काढणं सोपं आहे. @IndianExpress
#महाराष्ट्र #वित्तनियोजन
सोनम वांगचुक ह्यांची सत्याग्रहापायी खालावलेली तब्येत पाहता असेच म्हणावे लागेल की आता सरकारसोबत जनतासुध्दा संवेदनाशून्य झाली आहे.
वांगचुक ह्यांच्या निःस्वार्थ जीवनावर सफल चित्रपट काढणाऱ्या आमीर खानने तरी त्यांचे समर्थन करायला हवे होते.
@netwadhuri हो नक्कीच रुग्णाला धोका उदभवू शकतो; कारण नवीन वापरलेल्या ड्रगची काही रुग्णांना ऍलर्जी असू शकते. शिवाय इतर काही औषधी चालु असल्यास त्यासोबत ह्या ड्रगची सुसंगतता तपासणे गरजेचे आहे.
@kothariabhishek It’s very unfortunate that current government can’t avoid lust for easy money.
Total and clear callousness towards peoples sufferings.
समृद्धी महामार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत असा नरेटीव अदानीच समुहाचं चॅनल एनडीए मराठी पसरवत आहे. ही बातमी खरी आहे की खोटी ह्याची पाहाणी करून जर बातमी खरी असेल तर रस्ता दुरूस्त करावा आणि बातमी खोटी असेल तर अदानी समुहावर कारवाई करावी!
कारण खड्डे असणे पण महाराष्ट्राचा अपमान आहे आणि जर खड्डे नसतील आणि खोटी बातमी पेरली गेली असेल तर तो पण महाराष्ट्राचा अपमानच आहे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
यांना सत्ता सोडणे परवडणार नाहीये हे उघड गुपित आहे.
सत्ता सुटली आणि वेगवेगळ्या खात्यांच्या फाईल्स, श्वेतपत्रिका , घोटाळे,
पीएमकेअर्सचा ताळेबंद, नोटाबंदीच्या नंतर छापलेल्या नोटा आणि
बरच काही बाहेर आल तर बरेच घाईला येतील.
तपास यंत्रणा आणि प्रशासन , सत्ता बदलली कि सत्तेच्या समोर
कुर्निसात घालायला तयार असतील आणि उलट तेव्हाच्या विरोधकांना
कुठ आणि कस गाठायचं याचे रस्ते दरवाजे हेच मसुरीचे पेढे
दाखवतील.
त्यामुळे सत्ता टिकवावीच लागेल.
पूर्वी लोक तक्रार करायचे अमक्याला मतदान केल कि कमळीला
जातय.
मग सरसकट संध्याकाळी मतदानाची टक्केवारी वाढवलेली आहे
ज्याबद्दल अजूनही निवडणूक आयोगाकडून मौन आहे.
या दोन्हीचा सरप्राईज एलेमेंट संपलेला आहे.
आता मतदारयाद्यांची फेरतपासणी सुरु आहे , मोबाईलवरून
मतदानाची सुविधाही आणतील.
निवडणूक आयोगात बसवलेले मसुरीचे पेढे अर्थात गुळाचे गणपती
सगळ्याला माना डोलावून मम म्हणतीलच.
वाट्टेल त्या मार्गाने, वाट्टेल तशी सत्ता, ताकद, पैसा वापरून सत्ता
ताब्यात ठेवण्याचा आटापिटा करतील आणि लोकशाहीचे जे काही
पाचदहा कलथून उताणे पडलेले खांब आहेत ते भाट होण्यात धन्यता
मानतील.
पक्षीय राजकारणात सक्रीय असणारे विरोधक असोत कि लोकशाही
मूल्यांसाठी बोलणारे, संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते किंवा सामान्य
भारतीय नागरिक.
कुणालाही प्रचलित संसदीय मार्गाने , अर्ज विनंती खटले वगैरे करून
बदल घडेल याची अजिबात आशा आणि अपेक्षा नाहीये.
जनता सर्वोच्च आहे हे दाखवण्याची जबाबदारी आता जनतेची आहे.
सडके खामोश हो गयी तो संसद आवारा हो जायेगी !!
- आनंद शितोळे @AnandShitole