🗓️ २३-०६-२०२६ 📍 विधानसभा, मुंबई
आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये वीजेच्या संदर्भात सामान्य जनतेला भेडसावत असलेल्या समस्येच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. तसेच औष्णिक वीज केंद्र कार्यरत आहेत का अथवा ते बंद ठेवले गेले आहेत का याचा खुलासा सरकारच्या वतीने करण्यात यावा अशी मागणी केली.
संबंधित प्रश्नाला राज्याचे ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रश्नाचे समाधान केले.
अपक्ष निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर धुडकावून लावत काही झाले तरी "विचार" महत्त्वाचा असा "विशाल" विचार या महाराष्ट्रातील राजकीय पटलवार घालून देणारे #विशाल_पाटील आजच्या राजकीय चिखलफेकीत जास्त उजवे ठरतात.
#vishalpatil#maharashtra#महाराष्ट्र@patilvishalvp
एका अधांतरी भूमिकेमुळे जनतेची मोठी पुण्याई गमावलेला माणूस अशीच यांची नोंद होईल.जनतेचे आशीर्वाद हेच यांचे बळस्थान होते.. लोकही वेड्यासारखं कोणावरही प्रेम करतात आणि अपेक्षाभंगाच दुःख भोगत बसतात..!
@ShivSenaUBT_@INCMaharashtra
लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील या भाजपाच्या पण राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या राहिल्या.ॐराजे शिवसेनेतून निवडून येऊनही दुसऱ्या पक्षात निघाले आहेत..
धाराशिव हा जिल्हा आयुष्यभर एकाच पक्षांसोबत एकनिष्ठ राहिलेल्या माजी विरोधी पक्षनेते उद्धवराव पाटील यांचा आहे.
भारतीय लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करणारे, जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे लोकप्रिय नेते श्री राहुल गांधीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
#HappyBirthdayRahulGandhi#RahulGandhi
जो पक्ष महाराष्ट्रात वाढवण्यासाठी आजोबांनी कष्ट घेतले तरीही पक्षाने दोनवेळा उमेदवारी नाकारली पण पक्षाने उमेदवारी नाकारली तरी अपक्ष म्हणून विजयी झाल्यावर काँग्रेससोबतच राहणार असे सांगणारे आणि काँग्रेसचा शंभरावा खासदार बनणारे विशाल पाटील..
@patilvishalvp
फुटणार असालच तर चांगला दाम घ्या. चांगले 2-3 हजार कोटी..!
फुटल्यावर परत मतदारसंघात येऊ नका. ते पैसे घेऊन दुबई, अमेरिका, कॅनडाला कुटुंबासोबत सेटल व्हा.
परत आलात तर लोकं बेक्कार तुडवतील आणि लोकांनी नाही तुडवलं तर सरकार बदलल्यावर कुत्र्यासारखे हाल होतील.
पुन्हा निवडून येणार नाही याच हिशोबाने पैसे घ्या!
पृथ्वीराज बाबा हे एकमेव विश्वासू, पारदर्शक, नितीवान राजकारणी उरले आहेत.. आमच्या पिढीने हा माणूस पाहिला, अनुभवला, बघितला हे भाग्य...
रस्ते गटारीची कामं रुटीनने होतं असतात.आणि दा बारा हजारावर पोरं कुठं कारकून झाली नाहीत तरी द्राक्षबागेत छाटणी घड बुडवणे ही काम करून जगत असतात.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात म्हसवड–पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत वाहन विहिरीत कोसळून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यात महिला आणि एका लहान मुलांचाही समावेश आहे.
या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. पीडितांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
मृतांना भावपूर्ण आदरांजली.
#Solapur
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा, श्रद्धास्थानांचा, स्त्रीयांच्या मातृत्वाचा अथवा कोणत्याही समाजघटकाच्या भावना दुखावणारा विनोद कदापि स्वीकारार्ह नाही.
कॉमेडीच्या माध्यमातून मनोरंजन व्हावे, परंतु त्यासाठी अश्लीलता, घाणेरडे जोक्स, टिंगल-टवाळी आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये यांचा आधार घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. या शोच्या माध्यमातून नेहमीच लैंगिक संबंध, महिलांचे लैंगिक शोषण आदी विषयांवर कोणतीही लाज न बाळगता मनाला वाटेल तसे बरळून मनोरंजन करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे शिवाय युवा पिढीला आपण कोणते विचार देत आहोत हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
कॉमेडियन प्रणित मोरे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत मी तीव्र आक्षेप नोंदवला असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा बसणे गरजेचे आहे. समाजातील भावना दुखावणाऱ्या आणि सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या प्रकारांविरोधात मी विधिमंडळातही आवाज उठवणार आहे.
मनोरंजन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे स्वागतच आहे, परंतु त्याला जबाबदारीची आणि सामाजिक भानाची जोड असणे तितकेच आवश्यक आहे.
तरी माझी राज्याचे मुख्यमंत्री महोदय श्री. देवेंद्र फडणवीस जी साहेब यांना विनंती आहे की, त्यांनी तरूण पिढीला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या या काॅमेडियन शोवर तात्काळ बंदी घालावी तसेच या सबंध प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
#pranitmore
#comedianshow
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@MHPoliceITCell
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काल स्थापनादिन होता. आता राष्ट्रवादी नावाने दोन पक्ष अस्तित्वात आहेत. राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा परदेशी व्यक्तीला पंतप्रधानपद नको हा मुद्दा समोर आणला. शरदचंद्र पवार यांच्या कल्पनेतला हाच राष्ट्रवाद होता.त्याला काही काळ लोकमान्यता मिळाली
मध्य प्रदेश में BJP ने वोट चोरी से भी आगे बढ़कर, अब चुनाव आयोग का फ़ायदा उठाकर राज्यसभा सीट हथियाने का एक नया और धोखेबाज़ खेल शुरू कर दिया है।
चुनाव आयोग ने न सिर्फ़ मीनाक्षी नटराजन का राज्यसभा नामांकन रद्द किया है, बल्कि लोकतंत्र का गला भी घोंटा है।
जिन्हें अपनी काबिलियत पर बहुत ज़्यादा शक होता है, वे ही ऐसे हताशा भरे हथकंडे अपनाने पर मजबूर होते हैं।
#कायर_बीजेपी
#madhyapradesh
#minakshinatrajan
🗓️ ३१-०५-२०२६ 📍 श्रीरामपूर
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्वानुसार आपण जीवनामध्ये वर्तणूक ठेवली पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. करण ससाणे, अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सचिन गुजर, अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. माऊली मुरकुटे यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.