आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली. सध्या या जाहिरातीत 457 पदांचा समावेश असून राज्यसेवेच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रमांक 2 ची जाहिरात आहे. तरीही वस्तुनिष्ठ पद्धतीने राज्यसेवेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही अखेरची संधी असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी यासाठी पाठपुरावा केला. पदांच्या वाढीबाबत आजरोजी ठोस काही सांगता येत नसले तरी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु राहील.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या परीक्षेत निवड झालेल्या 623 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणेबाबत विनंती केली. याबाबत मा. देवेंद्रजी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले आहेत. #mpsc
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@Devendra_Office#Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा 2024 साठी साहेब तुम्ही त्याच जोमाने प्रयत्न करताल अशी सर्व स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने अपेक्षा करतो. तुम्ही कोणतेही काम हातात घेतलं की यश मिळते हा आजपर्यंत चा इतिहास आहे. combine पूर्व मध्ये पण भरघोस जागा वाढ होईल अशी अपेक्षा करूयात.. 🙏
#combine ची आलेली जाहिरात म्हणजे विद्यार्थ्यांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचं यश असून विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभागी होता आले याचं समाधान आहे.
जाहिरात आली असली तरी #PSI पदाच्या जागा मात्र पुरेशा नाहीत, आधी 441 जागांचे मागणीपत्रक असताना आता मात्र केवळ 216 जागांची जाहिरात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
तसेच ही जाहिरात तब्बल आठ महिने उशिरा आली आहे, परिणामी वयवाढीचा फटका बसून हजारो विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत, त्यामुळे विधानमंडळात गृहमंत्री यांनी वयवाढीचा जीआर सर्व परीक्षांना लागू करण्याचे जे आश्वासन दिले होते ते #combine परीक्षेसंदर्भात देखील पाळून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा.
#sub_registrar पदांची एकही जागा आलेली नाही, त्या जागा समाविष्ट करण्यासंदर्भात देखील विचार करणे गरजेचे आहे. असो जागावाढ संदर्भात विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, दीड महिन्यांनी येणाऱ्या मविआ सरकारच्या पहिल्या निर्णयांमध्ये जागावाढ संदर्भातला निर्णय असेल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #PSI | #जागावाढ | #StudentsRights |
जलसंपदा विभाग सरळसेवा भरती 2023
संभाजीनगर वगळता कोणत्याही विभागाने प्रतीक्षा याद्या जाहीर केलेल्या नाहीत.
निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच प्रतीक्षा याद्या आणि नियुक्त्या उमेदवारांना मिळाल्या पाहिजेत.
@Dev_Fadnavis@Deepakk75058621
मा. दिपक कपूर जी,
दिनांक २४/०९/२०२४ च्या आदेशानुसार जलसंपदा विभाग भरती २०२३ मधील कागदपत्र पडताळणी ला गैरहजर हजर असलेले विद्यार्थी सुधारित प्रतीक्षा यादी प्रदर्शित करून नियुक्ती आदेश आचारसंहिता पूर्वी द्यावे असे आदेश असताना देखील संभाजी नगर परिमंडळ वगळता इतर कोणत्याही परिमंडळांनी सुधारित प्रतीक्षा यादी प्रदर्शित केलेली नाही.
तरी आपणास विनंती आहे की सर्व परिमंडळ प्रतीक्षा यादी व नियुक्ती आदेश आचारसंहिता पूर्वी देऊन शेकडो बेरोजगारांना दिलासा द्यावा!
@Deepakk75058621@mieknathshinde
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
#Combine परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची कुठलीच हरकत नाही, केवळ आपल्या #गृहविभागाकडून#PSI पदाचे मागणीपत्रक आयोगाकडे गेले नसल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे आपल्या विभागाने तत्काळ रिक्त पदांचे मागणी पत्रक आयोगाला पाठवून सहकार्य केल्यास जाहिरात त्वरित प्रसिद्ध होऊ शकते.
राज्यात PSI च्या जवळपास 2500 जागा रिक्त आहेत, त्यामुळे ज्याप्रमाणे 2012 मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.आर आर आबांनी 1852 जागांची भरती केली होती, त्याचप्रमाणे यंदा आपण देखील मोठी जाहिरात प्रसिद्ध करावी तसेच राज्यसेवा जागावढीचा प्रश्न देखील मार्गी लावावा ही विनंती.
असो, असो उशिरा का होईना आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची #SERIOUS पणे दखल घेतली याबद्दल आपले आभार!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC | #Rajyaseva |
#कर_सहायक आणि #लिपिक_टंकलेखक पदाची जाहिरात जाहिरात येऊन दीड वर्ष तर पूर्व परीक्षा होऊन सव्वा वर्ष, मुख्य परीक्षा होऊन दहा महिने तर स्किल टेस्ट होऊन ४ महिने झाले आहेत, परंतु न्यायलयीन प्रक्रियेत सदरील परीक्षा अडकल्याने अद्यापही निकाल प्रलंबित आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत 20 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून विद्यार्थ्यामध्ये मोठ्या प्रमाणात निराशेची भावना आहे, तरी विधानसभेची आचार संहिता लक्षात घेता कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी उद्या होणाऱ्या सुनावणीत हा मुद्दा मार्गी लागावा यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे आयोगाकडून अपेक्षित आहे, सरकारने देखील समन्वय साधावा, ही विनंती !
@mieknathshinde@mpsc_office
#MPSC
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
हवामान खात्याने मुंबईला 8 तारखेला red अलर्ट तर 9 ला yellow अलर्ट दिला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. बाहेरून येणाऱ्या अनेक रेल्वे रद्द झाल्यात, अशा वेळी मुलं स्किल टेस्ट ला कसे पोहचणार. पवई सेंटरवर कोणत्याही प्रकारचा निवारा उपलब्ध नाही. @mpsc_office विनंती आहे यावर मार्ग काढा
आज मुंबई व लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा फटका आज होत असलेल्या लिपिक टंकलेखक परीक्षेला बसला आहे. संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी इथे दाखल झाले आहेत पण पावसामुळे त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता येत नाहीये.. परिणामी ज्यांना आज परीक्षेला बसणे शक्य झाले नाही त्यांची परीक्षा इतर दिवशी घ्यावी, असे निर्देश शासनाने #MPSC ला द्यावेत, ही विनंती!
@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis
@BaliramDoleyINC TCS कंपनी वर कारवाई करा...
जर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे ज्या मुलांना घेतलं नव्हते.. त्यांना परीक्षा देता आली नाही..
आत्ता या कंपनी च्या चुकीला कोण जबाबदार ?
परीक्षा मुंबईला आहे, मुले राज्यभरातून आले आहेत 2000 ते 4000 ₹ लॉज + प्रवासाचे आर्थिक त्रास आणि तसेच मानसिक त्रास सुद्धा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आज टायपिंग स्किल टेस्ट घेणार होते, ज्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईला आले होते. पहिलीच बॅच 12:30 वाजेपर्यंत पूर्ण करता आली नाही आणि गोंधळ झाल्यानंतर आज आणि उद्या होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे. पुढील चाचणी 1 ऑगस्ट नंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची आपली जबाबदारी असताना तांत्रिक अडचणींच्या कारणाने आपण ती TCS कंपनीच्या माथ्यावर मारून आपली नैतिक जबाबदारी नाकारत आहात का? जर प्रत्येक परीक्षा घेण्यात TCS अपयशी ठरत असेल, तर TCS कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करावे.
तसेच, दिलेले कोणतेही वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरलेल्या MPSC सचिवांनी राजीनामा द्यावा. निदान एवढी तरी नैतिकता दाखवून जबाबदारी स्वीकारावी.
@mpsc_office@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@Drsuvarnas
RTO आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जागा वाढवण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार खाद्य पदार्थांची दुकाने, हॉटेल, खाद्य पदार्थांच्या हातगाड्या वाढून भेसळ वाढत आहे तर दुसरीकडे प्रत्येक माणसामागे एक वाहन या हिशोबाने रस्त्यावर मुंगी प्रमाणे वाहने झाली आहेत.
वरील दोन्ही विभागांचा वाढती लोकसंख्या, जबाबदाऱ्या, नागरिकांची सुरक्षा आणि कामाचा ताण या हिशोबाने सुधारीत आकृतीबंध तयार करून मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra