आपल्या समाजात बलात्काराची जी कीड लागली आहे ती मुळापासून उखडून काढायची आहे.त्या मुळे या पुढे देशातील कोणत्याही राज्यात असा प्रकार घडला तर कोणत्याही राजकीय पक्षाआधी आपण रस्त्यावर उतरून जाब विचारले पाहिजेत आणि पुढील कारवाईला प्रवृत्त केले पाहिजे.
#IndianDemocracy
स्वामी विवेकानंद म्हणतात की,"या देशातील तरुण पिढीने जर व्यवस्थेला हात घातला तरच हा देश सर्वोच्च होईल."अखेर आज तरूण पिढीने दाखवून दिलेच की, शिक्षणाची ताकद काय आहे.आज विषय आपल्या शिक्षणाचा होता म्हणून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला.
#जंतर_मंतर_ब्रेकिंग_न्यूज
२४ तास उलटून गेले होते वाकण फाटा येथे पाणी भरले असता. मुंबई आणि कोकणात जाणारे-येणारे दोन्ही मार्ग बंद झाले असता कित्येक नागरिक अडकले होते. स्थानिक प्रशासन आणि सरकार घरी झोपा काढत होते.
लोकांची पर्वा आहे की नाही..?
@CMOMaharashtra@MahaDGIPR
जोगेश्वरी मजास डेपो शेजारी असणाऱ्या झाडांच्या खोडावर विशिष्ट खुणा दिसून आल्या आहेत.या खुणा झाडांना इंजेक्शन दिल्या सारख्या आहेत.जे इंजेक्शन झाडं हळूहळू मारण्याचे काम करतं.कृपया @mybmc आपण पाहणी करून समस्येचे निरसन करावे.
"एन्काऊंटर करणं कितपत योग्य..?"
रोहित आर्य याचा पवई येथे झालेला एन्काऊंटर पुर्णतः संशयास्पद आहे.पोलिसांना परिस्थिती चर्चा करून सुध्दा हाताळता आली असती.परंतू घटनेची माहिती मिळताच एन्काऊंटर करण्याची तत्परता कशासाठी?
सोबत एक एअर गन असलेला माणूस पोलिसांचं काय बिघडवू शकत होता?
#पवई
संगमेश्वर तालुक्यातील ब्रिटिश काळातील सोनवी पुलाची अक्षरशः चाळण झाली आहे.ह्या धोकादायक पुलावरून दररोज कित्तेक अवजड वाहने जात असतात.या कडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर जिवीतहानी होण्याची मोठी संभावना आहे.
कृपया लवकरात लवकर लक्ष द्यावे.
@ShekharGNikam99@DMRatnagiri
अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश झाला…!
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा असून जगात इतरत्र कुठेही असे गडकोट पाहायला मिळत नाहीत. हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्रातील गडकोट जागतिक स्तरावर पोहोचावेत, या उद्देशाने युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत त्यांचा समावेश व्हावा यासाठी सन २०१५ पासून मी प्रयत्नशील होतो. याच प्रयत्नांचा भाग म्हणून २०१६ व २०१७ साली युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय तज्ञ समितीस महाराष्ट्रात निमंत्रित करून राज्यातील गडकोटांची प्रत्यक्ष माहिती दिली होती. युनेस्कोच्या आवश्यक निकषांची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन सरकारकडेही मी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याकरिता ज्यांनी राजस्थान मधील किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या डॉ. शिखा जैन यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासाठी देखील मी आग्रही होतो. राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य पावले उचलली. या सर्वांचे फलित म्हणून आज महाराजांचे १२ गडकोट जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले, याबद्दल मी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार, तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे व प्रशासनाचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.
महाराष्ट्रातील रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी राहिलेला जिंजी किल्ला अशा बारा किल्ल्यांचा World Heritage Sites मध्ये समावेश झालेला आहे.
युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) कडून जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाल्याने हे किल्ले जागतिक पर्यटन स्तरावर आले आहेत. यामुळे आपला उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच पर्यटनवाढ, स्थानिक रोजगार निर्मिती आदी बाबींनाही चालना मिळणार आहे.
मात्र, युनेस्को कडून या स्थळांच्या विकासासाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे या गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आणखी ठोस पावले उचलणे आता अत्यावश्यक आहे. या गडकोटांच्या संवर्धनासाठी योग्य निधीची तरतूद करून जतन, संवर्धन व विकासाची दिशा ठरविणे आवश्यक आहे. या बारा किल्ल्याच्या संवर्धनावर अधिक भर देऊन इतरही किल्ल्यांचे संवर्धन कार्य राज्य सरकारने हाती घ्यावे व उर्वरीत किल्लेही या यादीत समाविष्ट होतील यादृष्टीने प्रयत्नशील राहावे.
@Dev_Fadnavis@ShelarAshish@TawdeVinod@UNESCO@CMOMaharashtra
#WorldHeritageSite
#UNESCO
#FortsofMaharashtra
अरे अकलेच्या कांद्या...
जेव्हा स्वराज्य उभं झालं आणि शिवराज्याभिषेक झाला तेव्हा पासून स्वराज्याच्या राज व्यवहाराची भाषा मराठीच असावी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे.
आणि हो भाषा लादायचा प्रश्नच नाही.
तुम्हाला इथे नादायचं असेल तर मराठी भाषा स्वतः वर लादा..
@sushilkedia
अखेर माझी माय मराठी जिंकली..
हिंदी भाषेला प्राधान्य देऊन जर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा तुमचा मनसुबा असेल तर जरा थांबा..!
हा महाराष्ट्र आहे वेळ जर आलीच तर तुमच्या ह्या राजकीय पोळ्या तुमच्याच घशात घालू.
#जयमहाराष्ट्र#हिंदीलादणेथांबवा
बामण वाडी,गोरेगाव पूर्व,नेस्को सेंटर शेजारी अनधिकृत रित्या परप्रांतीय लोकांनी फुटपाथवर आपले धंदे मांडले आहेत.याची तक्रार पालिकेला २२ जानेवारी रोजी दिली गेली आज जवळपास एक महिना होत आला आहे.परंतू पालिकेने अद्याप काही कारवाई केली नाही.कृपया या प्रकारावर @mybmc स्पष्टिकरण द्यावे.
मराठ्यांनो सर्व काही करा पण याच्या नादी नका लागू.
हा माणूस महिन्यातून ४-४ दिवसांचा गॅप ठेवून आमरण उपोषण ठेवतो.याला आमरण उपोषण काय असतं हे सुध्दा माहीत नाही.
आणि हो येकदा गोदडी बाजूला ठेवून उपोषणाला बसतो का ते पण बघा.
आरक्षण हवं तर नक्कीच लढा पण याच्या नादाला लागू नका.
#मराठा