७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज
दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये
#MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये
#seriousness यावा यासाठी एवढी १५०० कोटींची वसुली आहे का ?
एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील याची हमी आहे का ?
हा विषय खूप #serious आहे, आदरणीय फडणवीस साहेब, फी संदर्भात आणि पेपर फुटी संदर्भात लवकर निर्णय घ्या ,अन्यथा विद्यार्थी जर #serious झाले तर...
@Dev_Fadnavis
भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने गती देणारे भारताचे माजी पंतप्रधान श्री.मनमोहन सिंह वयाच्या 90 व्या वर्षी या देशाची लोकशाही जिवंत राहावी म्हणून संसदेत हजर होते.
या देशाचा इतिहास कायमच तुमचा आभारी असेल सर.
काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहने आणि पोस्ट ठेवणे यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री @Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं ते गोलमाल उत्तर आहे, खऱ्या अर्थाने त्यांनी उत्तर दिले पाहिजे की देशात कुणाच्याही मजारीवर, कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा करावा. कुणाचं काय मत आहे हा वेगळा भाग आहे पण, कायद्याने बंदी असेल तर ते सांगावं. आणि कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही त्यांनी खुलासा करावा.
सत्ता येते आणि जाते पण, समाज आणि देश तिथेच राहतो - PM मोदी आज पुण्याच्या भाषणात, वाजपेयींचा संधर्भ देऊन बोलले.
पण ४०-४० आमदार @NCPSpeaks मधून येतात आणि @BJP4India मध्ये जातात, हे नाही बोलले आपले शेठ !
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks
माझ्या मतदार संघात टोरंट ही कंपनी विजेचा पुरवठा करते.या कंपनीच्या काही धोरणामुळे जनमानसात राग आहे.सरकारने नियोजित केलेल्या दरापेक्षा वाढीव दर,बिल न भरणाऱ्या नागरिकांना अटक करण्याचे प्रकार या कंपनीने केले आहेत.
या संदर्भात आज विधानभवनात सरकारला काही प्रश्न विचारले.या सोबतच संबंधित कंपनीला नागरिकांच्या सोबत सबुरीने वागावे,अश्या सूचना द्याव्यात ही मागणी केली.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा या खात्याचे मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यासंबंधी कार्यवाही अपेक्षित आहे.
#MonsoonSession
याद राख, तुला दिल्लीला जायचं असतं,
सांगलीत समाजाला धमकवण्याचा प्रयत्न करू नको!
#बेडग गाव भीम अनुयायानी लाँग मोर्चातून आपला लढा जिंकला आहे. कमान पाडण्याची जातीयवादी भूमिका घेतलेल्या अधिकाऱ्यांवर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही झाली.
त्याविरोधात जातीयवादी मनुवादी समूहाने भूमिका घेऊन मोटार सायकल रैली काढून या विरोधात मोर्चा आयोजित केला आहे. या भूमिकेचा ऑल इंडिया पँथर सेना निषेध करत असून सांगलीचे जातीयवादी या दंगलखोर गटाला प्रोत्साहन देत आहेत.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना त्यांच्याच पक्षाचे लोक हे विरोधात मोर्चे काढत आहे. सामाजिक सलोखा बिघडवत आहेत.
मोर्चा आयोजकाला तात्काळ अटक करावी, दंगली भडकवण्याचे हे षडयंत्र आहे.
तात्काळ आंबेडकरी समाजाच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या दंगलखोरांना अटक करावी, त्यांच्यावर सुद्धा अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करावी. या मोर्चा मागचा मास्टरमाईंड आम्ही त्याला सोडणार नाही, त्याने एक लक्ष्यात ठेवावं त्याला दिल्लीला जायचं असतं, राज्यभर फिरायच आहे. पँथर दणका देईला त्याला वेळ लागणार नाही, हे सुद्धा त्याने लक्ष्यात घ्यावा.
बेडग आंदोलन जिंकल्यानंतर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा, दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय तो देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना आवरून हाणून पाडवा.
ऑल इंडिया पँथर सेना सर्व घडामोडींवर लक्ष देऊन आहे. दंगलखोर प्रवृत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे.
#AllindiaPantherSena
आज विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी खासकरुन आमच्या महिला भगिनींनी @ShindePraniti@AdvYashomatiINC मणिपूर या विषयामध्ये विधानसभेमध्ये आम्हांला बोलू द्या अशी मागणी केली. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, या अतिशय संवेदनशील विषयावर तुम्ही मला सूचित केले आहे का ? असे विचारत, तुम्ही मला सूचित जर केले नाही तर तुम्ही बोलू शकत नाही. इतकं असंवेदनशील वागून विधानसभा अध्यक्षांनी आम्हांला बोलूच दिले नाही.
जी भूमी जिजाऊंची भूमी म्हणून ओळखली जाते, जी भूमी अहिल्याबाईंची भूमी म्हणून ओळखली जाते, जी भूमी सावित्रीबाई फुलेंची भूमी म्हणून ओळखली जाते, जी भूमी इंदिरा गांधींची भूमी म्हणून ओळखली जाते. त्या भूमीमध्ये आमच्या आया-बहिणींवर होणा-या अत्याचारांबाबत जर आम्हांला बोलूच दिले जात नसेल; तर मला वाटते लोकशाही नावाची संस्था ही बरखास्त झालेली आहे. एककल्ली कारभाराला आता जोर मिळत चालला आहे.
आश्चर्याची गोष्ट आहे की, पुरोगामी महाराष्ट्राच्या विधानसभेत मणिपूरच्या विषयावर चर्चाही होऊ शकली नाही. मला असे वाटते की, ह्या एका कृत्याने या विधानसभेची स़द्यपरिस्थिती काय आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रापासून ही विधानसभा किती लांब आहे हे दृश्य स्पष्ट होतं.
हे प्रातिनीधीक चित्र आहे १९४१ साली हिटलरने जर्मनीत पेरलेल्या #ज्यू-#द्वेषाचं...! अगदी मिसरूड फुटलेली जर्मन मुलेही ज्यू नागरिकांवर तुटून पडत...! हिटलर त्याला जर्मन राष्ट्रवाद म्हणत जर्मन लोकांना बहकावत राहिला... आणि त्यानं जर्मनीला अखेर विनाशाप्रत नेलं ! याच विचारसरणीचं प्रतिबिंब आज आम्ही देशात होत असलेल्या मुस्लीम आणि ख्रिश्चनद्वेषात पाहतोय. इतिहासातील गाडलेली मढी उकरून ज्यांचा धर्म आणि पोट अबाधित राहातं, त्यांना वेळीच रोखून देश एकसंध, एकजिनसी आणि एकात्म ठेवणं हा खरा #राष्ट्रवाद !
#ManipurViralVideo
वंचित बहुजन आघाडीच्या महामोर्चाचा दणदणीत विजय !
२ लाख २२ हजारांहून अधिक अतिक्रमणधारकांना घरं आणि शेती उध्वस्त करण्याच्या नोटिसा शासनाकडून देण्यात आल्या होत्या. कालच्या महामोर्चानंतर या लाखो कुटुंबांचा संसार वाचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोर्चा सुरू असतानाच राज्य सरकारचा निरोप आला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या सोबत विधानभवनात बैठक झाली. यावेळी खालील मुद्यांवर चर्चा झाली व खालील मागण्या सरकारने मान्य केल्या.
१. घरांसाठी केलेलं अतिक्रमण पाडण्यात येणार नाही.
२. अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे पट्टे त्यांच्या नावावर करण्यात येतील.
३. अतिक्रमण करून केलेली शेती उध्वस्त केली जाणार नाही, वा येणाऱ्या पिकांचा लिलाव होणार नाही. ज्याने शेती केली त्यालाच ते पीक मिळेल.
४. शेतीचे पट्टे शेती करणाऱ्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया आपल्याकडून सुरू केली जाईल. यासाठी अजून लढावं लागणार आहे.
५. SRA योजने अंतर्गत ज्यांच्या झोपड्या पाडण्यात आल्या व त्या प्रकल्पांचे बांधकाम रखडलेले आहे अशी लोकं बेघर असल्यासारखी आहेत. अशी सर्व प्रकल्प MHADA, MMRDA, CIDCO अशा सरकारी संस्थांकडे वर्ग करण्यात येतील.
६. SRA अंतर्गत बिल्डरकडून घराचे भाडे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २ - ३ वर्ष काही बिल्डरांनी झोपडीधारकांना भाडे दिलेले नाही. त्यामुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे. अशी प्रकल्प ज्या सरकारी संस्थेकडे जातील त्या संस्थेने हे भाडे थकबाकी सकट झोपडीधारकांना देण्याचे ठरले.
७. BDD चाळींच्या संदर्भात चर्चा पूर्णत्वास पोहोचली नाही. परंतु पुढच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा मांडला जाईल.
तुफान पावसात उसळलेल्या तुफान गर्दीचा हा महामोर्चा यशस्वी झाल्याचे जाहीर केले. मागण्या मान्य केल्याबद्दल शासनाचे व सहकार्य केल्याबद्दल सर्व नागरिकांचे, मुंबई पोलीस व पोलीस आयुक्त यांचे आभार.
पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज… शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी आणि राजकारणात संयमाला किती महत्व आहे हे कोणाकडून शिकावं; एकच नाव शरद पवार !
कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही. 10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली.