"आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास ✌
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या #जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने 🙌
विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
MPSC Group-B (2025) च्या अंतिम शिफारशीपूर्वी उमेदवारांना SR, STI, ASO व PSI साठी Preference Link पुन्हा उपलब्ध करून उमेदवारांच्या पदनिहाय पसंतीचा अंतिम विचार होणे आवश्यक असल्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. समान उमेदवारांची विविध पदांच्या शिफारस प्रक्रियेत पुनरावृत्ती झाल्यास पुढील गुणवत्ताक्रमातील उमेदवारांच्या संधींबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
गुणवत्ताक्रम + उपलब्ध रिक्त पदे + उमेदवारांची अंतिम पदपसंती यांचा पारदर्शक पद्धतीने विचार केल्यास निवड प्रक्रिया अधिक न्याय्य होण्यास मदत होईल. तसेच PSI Physical साठी पात्र ठरणाऱ्या पुढील गुणवंत उमेदवारांच्या संधीही स्पष्ट होऊ शकतील. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा विषय असल्याने Waiting List व पुढील शिफारस प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या या मागणीचा सकारात्मक व तातडीने विचार करावा, ही विनंती !
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #MPSC_उमेदवार #प्रेफरन्स_लिंक #प्रतीक्षा_यादी
Sonam Wangchuk is trying hard to see you all! Just submitted a letter to the hospital as his health is good and they claim he is not in detention. So why the restrictions?
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
कधीकधी, आपल्याकडे जी गोष्ट असते तिची किंमत आपल्याला ती गमावण्याच्या उंबरठ्यावर येईपर्यंत कळत नाही. ही प्रामाणिक, हृदयद्रावक कबुली आपल्याला आठवण करून देते की खरं प्रेम म्हणजे नवीन व्यक्तीचा शोध घेणे नव्हे, तर ज्या व्यक्तीची आपल्याला नेहमी गरज होती, ती व्यक्ती आपल्यासोबतच होती
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.
#MPSC @mpsc_office
चंद्रपूर @mpsc_office आयोग राव आता तरी लाजा पोरांच्या हक्कासाठी आणि लाखोंच्या फायदेशीर परीक्षा पद्धतीसाठी तुमची स्थापना केलेली असतांना तुम्ही सरकारचा पक्ष घेऊन ऑनलाईन पद्धतीने घेणार असाल तर आम्ही जनचळवळ सुरू केलेली आहे ती ही #mpsc विरोधात.त्यासाठी आमची मागणी मान्य करा.
आज 'महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती'च्या वतीने व विठ्ठल कांगणे सरांच्या पुढाकारातून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य आंदोलनात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि त्यांच्या या लढ्याला माझा जाहीर पाठिंबा दिला.
MPSC कडून होणारी ऑनलाइन परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी, शिक्षकांसाठीची TET परीक्षा रद्द करण्यात यावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, MPSC मार्फत वर्ग ३ व ४ च्या पदांच्या भरतीसाठीचा अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावा तसेच विविध परीक्षांसाठी वेगवेगळे शुल्क आकारण्याऐवजी एकच शुल्क आकारण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
यावेळी आ. रोहितदादा पवार,प्रा. विठ्ठलजी कांगणे सर, प्रा. नितेश कराळे सर, पॅन्थर चे नेते भाई दीपकजी केदार,युवा नेते रविराज साबळे,कॉकरोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील, प्रा. बाळासाहेब शिंदे सर, त्रिशूल पाटील यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज राज्यातील आणि देशातील लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गोंधळ, बदलणारे नियम आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. हा केवळ विद्यार्थ्यांवरील अन्याय नसून देशाच्या भविष्यासोबतचा विश्वासघात आहे.
विद्यार्थ्यांचा संघर्ष हा न्याय, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्थेसाठी आहे.
पेपरफुटी थांबलीच पाहिजे... भ्रष्टाचार संपलाच पाहिजे... आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळालाच पाहिजे!
विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या या लढ्यात मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार केला नाहीतर हजारो विद्यार्थी मुंबईत धडकतील असा कडक इशारा दिला.
लाखो विद्यार्थ्यांची एकच मागणी!
MPSC परीक्षा ऑफलाईन घ्या.
ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक अडचणी आणि पारदर्शकतेवरील प्रश्न लक्षात घेता विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर ऑफलाईन परीक्षा हाच योग्य पर्याय आहे
विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका! @mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
📌गट क 2026 परीक्षा ऑनलाईन होणार.
TCS आणि IBPS ने घेतलेली तलाठी भरती / इतर परीक्षेत झालेला भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. नॉर्मलायझेशन पद्धत होणार आहे जी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
परीक्षा पूर्वीप्रमाणे #ऑफलाईनच हवी.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@mpsc_office@NANA_PATOLE
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारा बुलंद आवाज…
मा. राज्यमंत्री तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.रविकांत दादा तुपकर
आपणास #वाढदिवसाच्या_क्रांतिकारी_शुभेच्छा! 💐
संघर्ष, नेतृत्व आणि शेतकऱ्यांप्रती असलेली आपली निष्ठा सदैव प्रेरणादायी राहो. @Ravikanttupkar1
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
क्लर्क OPTING OUT साठी 8 लाखाची मागणी....@mpsc_office@bhimanwar MPSC प्रतीक्षा यादी जाहीर न करण्याच्या निर्णयाचा आर्थिक लाभ उचलणारी टोळीचा सुळसुळाट...8 लाखात क्लर्क क्या बात है.... महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पाहून आनंद होत असेल तुम्हाला ?
@pudharionline@MahaDGIPR
सरकार लोकांना असे त्रास देते
*भाजपच्या वरळी येथील जांभोरी मैदान येथील मोर्च्यामध्ये एक महिला अनेक तासांपासून वाहतूक कोंडीत अडकली होती यामहिलेने भाजपच्या नेत्यांना मोर्च्यात येऊन जाब विचारला आणि गोंधळ घातला*
भरपूर वीडियो .. चेक कमेंट 👇👇
शिवसाई परिवाराचे अध्यक्ष तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. डी. एस. लहाने सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.आ. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधरभाऊ बुधवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेशभाऊ शेळके, डॉ. चिंचोले सर, प्रसिद्ध शायर डॉ. गणेशजी गायकवाड, उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, वायाळ सर, म्हस्के सर आणि प्रसिद्धीप्रमुख गजाननभाऊ धांडे, सुनील सोनुने यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रा. डी. एस. लहाने सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐
#HBDLahaneSir #HappyBirthday #DSLahaneSir #Buldhana