विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरून पुण्यात जमावबंदी लागू करणारे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार? भरतीच्या जाहिराती काढता येत नाहीत, पेपरफुटी रोखता येत नाही; पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी कलम १४४ लागू करता येते!
ही जमावबंदी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आहे की सरकारच्या भीतीपोटी?
मा. देवेंद्रजी @Dev_Fadnavis
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी, आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा. ३१ जुलैपर्यंत ५० ते ६० हजार पदांच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करा आणि राज्यातील लाखो परीक्षार्थींना न्याय द्या.
प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर जमावबंदी लावून प्रश्न सुटत नाहीत; रोजगाराच्या जाहिराती काढूनच प्रश्न सुटतात! सरकारने विद्यार्थ्यांना घाबरू नये - विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता करावी.
जब जब सरकार डरती है, पोलीस को आगे करती है !!!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra
सरकारने २०२६ मध्ये जाहीर केलेल्या महाभरतीबाबतही अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही. त्या भरतीचे पुढे काय झाले, याबाबत सरकार किंवा आयोगाकडून कोणताही ठोस खुलासा करण्यात आलेला नाही. २०२६ वर्ष संपायला अवघे काही महिने उरले असताना ही अनिश्चितता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चिंताजनक आहे.
📌राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया आधी पूर्ण करण्यात यावी.ही विनंती.🙏
@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
१००,१५० दिवसांचा कार्यक्रम, सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध यानंतर बेरोजगारांच्या पदभरती जाहिरातींसाठी उशीर करण्यात यावा यासाठी आता नवीन कारण आणि ते म्हणजे "ऑनलाईन साठीची समिती". १८ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयापासून पदभरतीची तयारी का करण्यात आली नाही?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आत्तापर्यंत फक्त घोषणाच झालेल्या आहेत प्रत्यक्षात मात्र विविध प्रशासकीय करणे देऊन "मेगाभरती" प्रक्रिया लांबण्याचे षडयंत्र सुरू आहे, बेरोजगार उमेदवारांचे वाढते वय, ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती यामुळे तरुण पिढी प्रचंड नैराश्यात आहे.
#MPSC
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा@mpsc_office@CMOMaharashtra
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
MMRDA भरती परीक्षा ११–१२ मे रोजी पार पडली. उत्तरतालिका प्रसिद्ध होऊनही अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हजारो उमेदवार अनिश्चितता व मानसिक तणावाचा सामना करत आहेत. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा.🙏🏼@MMRDAOfficial@mieknathshinde
MJP भरतीतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा ५ मार्च रोजी पार पडली. इतर काही पदांचे निकाल लागले, मात्र JE (Civil) चा निकाल ४ महिने उलटूनही प्रलंबित आहे. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा. 🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@GulabraoRPatil
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
मा. लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात यासाठी वर्धा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर नंतर लातूर येथे विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरले आहेत. आयोगाने आता तरी झोपेतून जागे होऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती @bhimanwar
*पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रिया संदर्भातील कथित घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि पारदर्शकतेची आपली मागणी प्रशासनाने मान्य केली असून, चौकशी पूर्ण झाल्यावरच अंतिम नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल आयुक्त साहेबांचे मनापासून आभार!!!!!!
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अभियांत्रिकी सेवेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या पदाचे सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली.
जलसंपदा विभागांतर्गत 'कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित)'
PMC-JE परीक्षेत घोटाळ्याचा संशय; सत्य बाहेर आणा..
पुणे महानगरपालिकेच्या PMC-JE परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेले गंभीर आक्षेप अत्यंत चिंताजनक आहेत. परीक्षा सात शिफ्टमध्ये घेण्यात आली असताना Normalization प्रक्रिया कशी राबविण्यात आली, Raw Score आणि Normalized Score जाहीर का करण्यात आले नाहीत, तसेच IBPS पद्धतीप्रमाणे पारदर्शक निकाल का प्रसिद्ध करण्यात आला नाही..
परीक्षेच्या निकालात अनेक विसंगती असून सात शिफ्टमध्ये परीक्षा होऊनही गुणांकन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. गुणवत्ता यादी, सेक्शननिहाय गुण, Raw Score आणि Normalized Score जाहीर केल्यास सत्य समोर येईल..
याशिवाय, परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची शक्यता दर्शविणारे काही पुरावे समाजमाध्यमांवर समोर आले आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे हजारो गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यासारखे आहे..
यापूर्वी जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेतही संशय निर्माण झाल्यानंतर CCTV फुटेज, उमेदवारांच्या हालचाली आणि गोपनीय अहवालाच्या आधारे चौकशी करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर PMC-JE प्रकरणातही मेरिटमधील अव्वल ३०० उमेदवारांचे CCTV फुटेज, लॉग डेटा आणि गोपनीय अहवाल तपासून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी..
राज्य सरकारने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, ही विनंती..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@ShivsenaUBTComm
PMC-JE भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून व्यक्त होत असलेल्या शंका आणि आक्षेप गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा विविध शिफ्टमध्ये पार पडली असताना Normalization प्रक्रिया नेमकी कशी राबविण्यात आली, Raw Score व Normalized Score सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, तसेच गुणवत्तायादी आणि गुणांकनाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे का जाहीर करण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निकालातील कथित विसंगतींमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्व गुण, सेक्शननिहाय माहिती आणि Normalization संदर्भातील तपशील जाहीर करणे आवश्यक आहे.
समाजमाध्यमांवर काही संशयास्पद बाबी देखील समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. मेरिट यादीतील अव्वल उमेदवारांचे CCTV फुटेज, लॉग डेटा आणि संबंधित अहवालांची पडताळणी करून सत्य जनतेसमोर आणावे.
राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांना द्यावा. पात्र आणि मेहनती उमेदवारांना न्याय मिळणे हीच सर्वांची अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMCPune