मनसे नेते अमित ठाकरे ह्यांचे पुण्यावर विशेष प्रेम दिसतेय!
दोन दिवसांत ४५ गणेश मंडळांना आणि कार्यकर्ते ह्यांच्या घरी जाऊन २२ तास ते पुण्याच्या रस्तावर विविध भागात पोहचले. कार्यकर्ते ह्यांना भेटले, सामान्य माणसाला भेटले.
एकंदरीत पुण्यात गुन्हा दाखल झाल्यावर ते अधिकच पेटले. 🔥🔥
सोशल मीडिया इन्फ्लूअन्सर असणारा, रिअल इस्टेट एजेंट भावेश कावरे ह्याने आज मनसे नेते अमित ठाकरे ह्यांची भेट घेतली आणि झाल्या प्रकाराबाबत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली.
#AmitThackeray
६) आज महाराष्ट्रातील शहरांचा विचका करून ठेवला आहे, आणि याला हे विकास म्हणतात. रस्ते, फ्लायओव्हर्स म्हणजे विकास नाही. हे आमदार खासदार परदेशात जाऊन नक्की काय बघतात हे कळत नाही मला. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आत्ता शहरातील बांधकामं थांबवा.
१ मे ला मिसिंग लिंकचं उदघाट्न झालं आणि पुढे ६०,६५ दिवसांत तिथे पिलर पडून तिथे पाणी गळायला लागलं. फडणवीसांनी भाषणात मिसिंग लिंक प्रोजेक्टला कुठल्या कुठल्या देशातले सल्लागार आणले हे सांगितलं. आणि पुढे आमचा कॉन्ट्रॅक्टर भारतीय हे सांगितलं. इतके सगळे बाहेरून आणले मग कॉन्ट्रॅक्टर तिकडचाच आणायचात. या सगळ्याची वाट लावायला आमचा कॉन्ट्रॅक्टर आहेच. आज कंत्राटदारांना ५६% द्यावे लागतात म्हणे. जर उरलेल्या ४४% मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला अशाच दर्जाचे रस्ते आणि कामं मिळणार.
७) ब्रिटिशांनी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आज देखील उभं आहे, ब्रिटिशांच्या काळात उभे राहिलेले ब्रिज अजून टिकून आहेत. अमेरिकेत उभी राहिलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यात उभी राहिली पण आज देखील उभी आहे. मग आपल्याकडे काय घडतं नक्की ?
८) नितीन गडकरींच्या खात्याचं काम रस्ते बांधायचं. पण ते सोडून ते बोलत आहेत पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळायचं यावर. हे तुमचं काम नाही ते पेट्रोलियम मंत्री बघून घेतील.
९) इतकं सगळं घडून पण लोकांना राग येत नाही. लोकांना जो काही राग येतो तो ते मोबाईलवर व्यक्त करतात आणि शांत बसतात. मला कोणाची सत्ता आहे किंवा नाहीये याने काही फरक पडत नाही. भाजपचा एक आमदार, विधिमंडळात लोकं कशी गटारात पडून मरत आहेत, झाडं पडत आहेत यावर चर्चा सुरु आहे म्हणून हसतोय. भावनाशून्य झाले आहेत हे सगळे. आणि हे भावनाशून्य झालेत कारण लोकांना राग येत नाहीये.
१०) आपले सत्ताधारी, आमदार फोडता येत आहेत का, खासदार फोडता येत आहेत का, नगरसेवक फोडता येतील का यातच रमले आहेत.
११) लोकशाही कशी जिवंत असते याचं एक उदाहरण सांगतो. याच्या आधी पण सांगितलं आहे पण पुन्हा सांगतो. दुसरं महायुद्ध विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली जिंकलं. त्याबद्दल संपूर्ण इंग्लडने त्यांना डोक्यावर घेतलं पण पुढे ८ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. कारण लोकांनी सांगितलं तुम्ही युद्ध काळात उत्तम कारभार केलात पण म्हणून शांततेच्या काळासाठी तुम्ही योग्य नाहीत. माणसं किती सुज्ञ असतात बघा. माणसं फक्त सुशिक्षित असून चालत नाहीत तर ती सुज्ञ असावी लागतात. ज्या देशातील समाज सुज्ञ असतो त्याच देशाची प्रगती होत असते.
१२) मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची झालेली घटना मान्य करून, खरंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं म्हणायला हवं होतं. पण ते सोडून ते म्हणत आहेत की मी बघून घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही कुठली भाषा आली ? एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन, माझ्यावर ५ खुनांचे आरोप आहेत असं सांगतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही.
१३) आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही सतर्क रहा. मराठी मुलांना नोकऱ्या मिळत आहेत का, त्यांना टेंडर मिळत आहेत का, त्यांना कामं मिळत आहेत का पहा.
राज ठाकरे ।
राजसाहेबांनी आजपर्यंत आपला पूर्ण पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी पणाला लावला.. मतांच्या राजकारणाला कधीही भीक घातल नाही, नेहमी भूमिकेला महत्व दिल.. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी जितक्या पोडतिडकीने ते उभे राहत आले, तितक्या खंबीरपणे मराठी माणूस राजसाहेबांमागे कधी उभा राहील?
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
चला अर्ज भरुया!
प्रभाग क्रमांक ७ मधून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार
सौ. स्वप्नाली खामकर-पाचंगे
यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा.
📅 ३० डिसेंबर २०२५
⏰ सकाळी १०:०० वाजता
📍 मनसे कार्यालय, साईबाबा मंदिराजवळ, वर्तक नगर, ठाणे