Today, MPSC aspirants in Pune are on the streets fighting for their future.
Dear @RahulGandhi ji you have stood with students whenever their voices needed strength. Maharashtra’s aspirants need your support today. Please come to Pune, meet them and hear their concerns firsthand.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलं त्याच आस्थापनेत त्यांना शासकीय कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करुन द्यावा आणि ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना १० टक्के अंशाकालीन आरक्षणामध्ये समावेश करावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कबाडी हे उपोषणाला बसले असून त्यांच्या या आंदोलनाला भेट देऊन चर्चा केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षा पद्धतीला विरोध असून ऑफलाईन परीक्षा घेण्याची त्यांची मागणी आहे. यासंदर्भात आमदार रोहितदादा पवार हे उद्या (मंगळवार दि. ३० जून) पुण्यात पत्रकार संघात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
@RRPSpeaks
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
१/२ डियर आयोग, सरळसेवा परीक्षा आपल्याकडे देण्यासाठी आम्ही आमचं करिअर सोडून असंख्य आंदोलने, उपोषणे केली. पण गट-क जाहिरातीत आपण परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, लाखो उमेदवारांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाईन परीक्षेत असंख्य गैरप्रकार होतात..
@Dev_Fadnavis
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
PSI_वयवाढ_1वर्ष_GR
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
कमी जागांसाठी MPSC गट-क जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे..
हजारो जागा रिक्त असताना MPSC गट-क संवर्गाची फक्त ९३८ पदांची जाहिरात प्रसिद्ध करून राज्य सरकारने तरुणांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
परवाच्या अनुकंपा आणि MPSC लिपिक पदांच्या नियुक्ती सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले होते : "आम्ही हजारो पदांच्या जाहिराती काढणार आहोत" परंतु आजची जाहिरात त्यांच्या वक्तव्याचा विरोधाभास आहे.
RTO AMVI पदाच्या शेकडो जागा रिक्त आहेत तरीही आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात आले नाही. लिपिक तसेच इतर गट क संवर्गीय पदांच्या हजारो जागा रिक्त असताना फारच कमी जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra@AUThackeray@RRPSpeaks@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@PatilKailasB
ST महामंडळात 17,450 पदांची कंत्राटी चालक व सहाय्यक पदांची भरती करण्याचा निर्णय शिंदेच्या मंत्र्यांनी घेतला आहे.
कंत्राटी भरतीने कर्मचाऱ्यांचे शोषण तर होतेच परंतु कोणतीही विशेष भरती परीक्षा न घेता अशी पदभरती केली जाते. पुढं हेच कर्मचारी कायम करावे म्हणून मुंबईत आंदोलनाला बसतात. दोन्ही बाजूंनी नुकसान होत असल्याने शासनाने कंत्राटी पदभरतीचा निर्णय रद्द करावा आणि कायमच्या भरतीची जाहिरात काढावी. कंत्राटी पदभरतीचा जाहीर निषेध, प्रताप सरनाईकांना विनंती आहे आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@RRPSpeaks@Awhadspeaks@PratapSarnaik@msrtcofficial .
राजकीय नेते सत्ताधारी, विरोधी पक्षांचे आमदार खासदार तुम्ही फ्री असाल तर इकडे लक्ष देण्याची विनंती करतो..!
TAIT 3 परीक्षा निकाल जाहीर झाला असून निकालात पारदर्शकता ठेवावी म्हणून निकाल खूप साध्या पद्धतीने जाहीर केला असून निकालावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सर्वांनी हा विषय @dadajibhuse@AbhiPawarBJP@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks@RealBacchuKadu तात्काळ यावर विचारणा करावी निकाल पूर्वीसारखा लावण्यात यावा
#TAIT3_निकाल_घोटाळा #घोटाळा