महाराष्ट्र राजपत्रित व अराजपत्रित सेवा गट अ गट ब गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षा एकच पूर्व व एकच मुख्य एकाचा दिवशी घ्यावी Offline (OMR) वर घेण्यात यावी पणOnline व Normalization आमचा स्पष्ट विरोध आहे @mpsc_office@bhimanwar@RRPSpeaks#mpscexamoffline
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पुणे आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आधी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC@satejp@mpsc_office
@mpsc_office Online CBT आणि Normalization August 2027 स्थगित नका करू #रद्द करा लागलीस तर Mpsc फीस वाढ करा पण Offline (OMR) Exam घ्या
आमचा तुमच्यावर विश्वास आहे #MPSC
@Dev_Fadnavis@narendramodi Happy birthday!! CM साहेब
तुम्हाला खूप दिर्घ आयुष्य लाभो.
महाराष्ट्र राजपत्रित व अराजपत्रित सेवा गट अ ब क, पूर्व व मुख्य परीक्षा online CBT व Normalization रद्द करा
सर्व MPSC Exam #Offline (OMR) घेण्यात याव्या
“𝐒𝐞𝐜𝐨𝐧𝐝 𝐀𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐊𝐞𝐲 : विद्यार्थ्यांच्या भविष्याचा जुगार ? ”
आता लक्ष संयुक्त गट-क मुख्य परीक्षा 𝟐𝟎𝟐𝟓 कडे !
संयुक्त गट-क मुख्य परीक्षा 2025 साठी उमेदवारांची अपेक्षा स्पष्ट आहे -
प्राथमिक उत्तरतालिकाच शक्य तितकी अचूक असावी आणि उत्तरबदल किंवा प्रश्न रद्द करणे हा अपवाद असावा, नियम नाही.
“एक 𝐀𝐧𝐬𝐰𝐞𝐫 𝐊𝐞𝐲 अचूक नाही, मग 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 𝐞𝐱𝐚𝐦 मधील 𝐌𝐮𝐥𝐭𝐢𝐩𝐥𝐞 𝐒𝐡𝐢𝐟𝐭𝐬 मध्ये अचूकता कशी ? ”
@mpsc_office@bhimanwar@CMOMaharashtra@MahaDGIPR@Dev_Fadnavis@Devendra_Office@INCHarshsapkal@AbhiPawarBJP@RRPSpeaks
NEET मध्ये एका विद्यार्थ्याच्या OMR नुसार 660 गुण असल्याचा दावा, पण निकालात 116 गुण. OMR विद्यार्थ्याकडे असल्याने पडताळणी शक्य झाली आणि प्रश्न उपस्थित करता आला.
हाच ऑफलाइन OMR परीक्षेचा सर्वात मोठा फायदा. MPSC मध्येही OMR आधारित ऑफलाइन परीक्षा घ्या. @CMOMaharashtra@bhimanwar
MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांना पत्र पाठविले आहे.
दिनांक १७ जुलै २०२६ रोजी ऑनलाईन परीक्षांसाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी सलग १५ दिवस आंदोलन करून आपला स्पष्ट विरोध नोंदविल्यानंतर, पुन्हा ऑनलाईन परीक्षांच्या दिशेने पाऊल उचलणे हे विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा देणारे आहे.
राज्यातील लाखो परीक्षार्थींची स्पष्ट मागणी आहे :
1. ऑनलाईन परीक्षांसाठी गठित समितीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा.
2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह सर्व भरती परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच घ्या.
3. परीक्षा पद्धतीतील कोणत्याही मूलभूत बदलापूर्वी विद्यार्थी, शिक्षक, क्लास चालक, तांत्रिक तज्ज्ञ आणि स्वतंत्र परीक्षा तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करा.
विद्यार्थ्यांचे भविष्य हे कोणत्याही प्रयोगाचे क्षेत्र नाही. त्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. संलग्न पत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे ही मागणी केली आहे.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@CongressRojgar
महाराष्ट्र राजपत्रित व अराजपत्रित सेवा स्पर्धा परीक्षा गट अ ब क, पूर्व व मुख्य या offline (OMR) घ्या
ज्या नवीन सरळ सेवा येणार आहे त्या साठी नवीन आकृतीबंद लवकर जाहीर करावा
Online(CBT) व Normalization
वर्षातून 2/3 पूर्व परीक्षा रद्द करा
#MPSC@mpsc_office@bhimanwar@RRPSpeaks
@AbhiPawarBJP आमची मागणी महाराष्ट्र राजपत्रित व अराजपत्रित अधिकारी गट अ ब क पूर्व परीक्षा व मुख्य Offline (OMR )स्वरूपातच घेण्यात यावी वर्षातून दोन व तीन पूर्व परीक्षा नको आम्हाला. #MPSC
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@CMOMaharashtra महाराष्ट्र राजपत्रित राजपत्रित गट ब व गट क यांचे पूर्व आणि मुख्य परीक्षा या कायमस्वरूपी Offline (OMR )स्वरूपातच घ्यावे आजचे मरण उद्यावर ढकलू नका ऑनलाइन(CBT) व Normalization रद्द करा त्यातून भविष्यात पुढे नवीन नवीन प्रश्न उद्भवणार आहे दोन्ही हात जोडून कळकळीची विनंती 🙏
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
आमचा पूर्ण विश्वास आहे आपण आजपर्यंत घेतलेल्या परीक्षा या विश्वासार्ह , न्याय
पारदर्शक पद्धतीने घेत आला आहात काळानुरूप नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे याबद्दल आम्ही आपल्याशी सहमत आहे त्या तंत्रज्ञानाचे फायदे कमी आणि #तोटे जास्त आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे @mpsc_office