🙏 माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या ९१व्या वर्षाच्या मंगलमय प्रारंभानिमित्त आयोजित ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्र प्रकाशन व विविध नूतन इमारतींच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
🕯️ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, द्रष्टे समाजसेवक तथा माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत दुःखात सहभागी झालो. भावपूर्ण श्रद्धांजली!
कर्जतचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सद्गुरू गोदडनाथ महाराजांच्या रथयात्रा उत्सवानिमित्त मनोभावे दर्शन घेत विधिवत महाअभिषेक करून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.
आषाढी एकादशी म्हणजे अखिल विश्वातील वारकरी संप्रदायाचा उत्कट अध्यात्मिक सोहळा होय... पाऊले चालती पंढरीची वाट, ही अनुभूती आपल्या सर्वांसाठीच भक्तीची पवित्र पर्वणी असते. आज पंढरपुरात येऊन श्री पांडुरंग आणि रूक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
महाराष्ट्राच्या राजकारणात अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय कौशल्य, निर्णयक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#Ajit_Dada_Pawar#Maharashtra#Tribute#RamShinde
📍 विधान भवन, मुंबई
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे विद्यार्थ्यांना आणि संस्थेला भेडसावणारी पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महाविद्यालयापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी २६.९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आज उच्चस्तरीय बैठकीत दिले.
कृषी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विविध प्रलंबित कामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. महाविद्यालय परिसरातील अंतर्गत रस्ते, खेळाचे मैदान, गोदाम, विविध शेड्स, पाईपलाईन, संरक्षक कुंपण तसेच विश्रामगृहाच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
महाविद्यालय सुरू होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटूनही भूसंपादनासह अनेक मूलभूत कामे अपूर्ण आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागांनी एकत्रितपणे कार्य करून सर्व प्रकल्पांना गती द्यावी, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
राज्याचे कृषीमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कृषी विभागाने सर्व प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावेत आणि आवश्यक मंजुरी प्रक्रियेला वेग द्यावा, याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कृषी शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हे महाविद्यालय सक्षम आणि सर्व सुविधांनी युक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आधुनिक कृषी शिक्षणासाठी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.
बैठकीस राज्याचे कृषीमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, कृषी सचिव श्री. परिमल सिंह, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (दूरदृष्यप्रणालीद्वारे) व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#PunyashlokAhilyadeviHolkar #GovernmentAgricultureCollege #halgaon
📍 विधानभवन, मुंबई
आगामी पावसाळी अधिवेशन २०२६ सुरळीत, सुरक्षित आणि सुयोग्य नियोजनबद्ध वातावरणात पार पडावे, यासाठी आज विधानभवन येथे आयोजित अधिवेशनपूर्व आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
अधिवेशन काळात माननीय सदस्य, अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि अभ्यागत यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ नियोजन, वैद्यकीय सुविधा, उपहारगृह व्यवस्था, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, रेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित मंडप उभारणी, सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छ व सुसज्ज उपहारगृहे तसेच अखंडित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध राहाव्यात यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विधानभवन परिसरातील कामकाज अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत व्हावे यासाठी प्रवेश नियंत्रण अधिक सक्षम करण्याबरोबरच डिजिटल प्रवेश पास व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत विधानमंडळाचे कामकाज प्रभावीपणे पार पडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय, तत्परता आणि उत्तरदायित्वाची भावना ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांना सुरक्षित, सुलभ आणि सक्षम वातावरण उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
सुयोग्य नियोजन, सक्षम व्यवस्थापन आणि उत्कृष्ट समन्वयाच्या बळावर पावसाळी अधिवेशन २०२६ आदर्श पद्धतीने पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी जोशी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ श्री. जितेंद्र भोळे, सचिव-२ श्रीमती मेघना तळेकर-इटकेलवार, सचिव-३ डॉ. विलास आठवले, सचिव-४ श्री. शिवदर्शन साठ्ये, सभापती कार्यालयाचे सचिव श्री. पंडित खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विद्याधर पाटसकर, सहसंचालक वैद्यकीय शिक्षण डॉ. विवेक पाखमोडे, वैद्यकीय अधीक्षक सर जे. जे. रुग्णालय डॉ. संजय सुरासे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. प्रविण मुंडे, दक्षिण मुंबई पोलीस उपायुक्त श्री. हेमराजसिंह राजपूत, सह आयुक्त अन्न व नागरी पुरवठा श्री. महेश चौधरी, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. गोविंद चौधरी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#MonsoonSession2026 #VidhanBhavan #MaharashtraLegislature #RamShinde #PublicService
📍 मॅजेस्टिक आमदार निवास, मुंबई
आज मॅजेस्टिक आमदार निवासाच्या नूतनीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या ऐतिहासिक वास्तूचे वारसा मूल्य, मूळ वास्तुशैली आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख अबाधित राखत आधुनिक सुविधांची सांगड घालण्याचे काम सुरू आहे.
विशेषतः इमारतीचे बाह्य सौंदर्य आणि ऐतिहासिक वैभव जपले जाईल, यावर भर देण्यात येत आहे. नूतनीकरणाच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वारसा संवर्धन आणि आधुनिक सुविधा यांचा आदर्श संगम घडविण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
#Mumbai #MajesticAmdarNivas #HeritageConservation #Development
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त १२६० कोटी रुपयांच्या श्रीक्षेत्र चौंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख अतिथी :-
– मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस
– मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे
– मा. उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्राताई पवार
– व महाराष्ट्रातील इतर मंत्री, लोकप्रतिनिधी व मान्यवर
स्थळ : श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
दिनांक : ३१ मे २०२६
वेळ : सकाळी ११:०० वाजता.
तरी सर्व अहिल्याभक्तांनी जयंतीनिमित्त आयोजित या भव्य-दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
स्वागताध्यक्ष :- प्रा. राम शिंदे
(सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद)
आयोजक :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उस्तव समिती, महाराष्ट्र राज्य.
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी३०१वीजयंती
#श्रीक्षेत्र_चौंडी #भूमिपूजन_सोहळा #रामशिंदे
कर्जत - जामखेड मतदारसंघाच्या दळणवळण विकासासाठी माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, करमाळा- जामखेड- साकत- पाटोदा या राज्य महामार्ग क्रमांक ५६ पैकी पहिल्या टप्प्यात अंदाजे ३००कोटी रु. खर्चाच्या करमाळा - जामखेड रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे.
महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून करमाळा- जामखेड- साकत- पाटोदा या राज्य महामार्गापैकी अंदाजे ३००कोटी रु. खर्चाच्या करमाळा ते जामखेड या ४० किमी लांबीच्या मार्गाचे १० मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर करण्याकरिता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे.भविष्यात हा मार्ग करमाळा, जामखेड, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड यांना अधिक सक्षमपणे जोडणारा विकासमार्ग ठरणार आहे.
सध्या खराब अवस्थेत असलेला हा जुना राज्यमार्ग मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी वापरला जातो. पोथरे, जवळा, नान्नज, बोर्ले, झिक्री यांसारखी महत्त्वाची गावे तसेच जवळा हे ब वर्ग दर्जा प्राप्त पर्यटन व तीर्थक्षेत्र या मार्गालगत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढते. याच मार्गावरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी , दुग्ध व्यवसायिक व कृषी मालाची वाहतूक तसेच दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या प्रकल्पाअंतर्गत पोथरे, जवळा, बोर्ले फाटा, नान्नज, झिक्री , पाडळी फाटा या गावांच्या ठिकाणी तब्बल १४ मीटर रुंदीचा रस्ता, बसथांबे तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सिमेंट काँक्रीटची बांधीव गटारे करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासाला सुरक्षितता, वेग आणि सुविधा मिळणार असून परिसरातील व्यापार, शेती आणि रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे.
कर्जत - जामखेड मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्रीमती. सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्जत - जामखेड मतदारसंघातील विकासप्रेमी जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार!
#Jamkhed #karjat_jamkhed #ahilyanagar
📍 साईबाबा समाधी मंदिर, शिर्डी
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण व आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन केंद्रीय संरक्षण मंत्री मा. श्री. राजनाथ सिंह जी, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी साईबाबांच्या चरणी राज्याच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली.
“श्रद्धा आणि सबुरी”चा संदेश देत मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या साईबाबांचे विचार आजही समाजाला सकारात्मकतेची आणि सेवाभावाची प्रेरणा देत आहेत.
#Shirdi #Saibaba #SaibabaDarshan #RamShinde
📍पुणतांबा, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख असलेल्या पुणतांबा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेल्या ऐतिहासिक ‘अहिल्यादेवी घाटा’ची पाहणी तसेच प्राचीन कार्तिकस्वामी मंदिर येथे दर्शन घेण्याचा योग आला.
गोदावरी तीरावरील हा घाट केवळ ऐतिहासिक वास्तू नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी, धर्मसंवर्धन आणि जनसेवेच्या दूरदृष्टीची साक्ष देणारा प्रेरणादायी वारसा आहे. मंदिर परिसरातील आध्यात्मिक वातावरण आणि घाटाचे ऐतिहासिक महत्त्व अनुभवताना या पवित्र भूमीच्या विकासासाठी व्यापक नियोजनाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली.
अहिल्यादेवी घाट व कार्तिकस्वामी मंदिर परिसराच्या सुशोभीकरण, संवर्धन आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी निश्चितच सकारात्मक पावले उचलली जातील. या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला त्याच्या वैभवाला साजेशी ओळख मिळावी तसेच भविष्यात अधिकाधिक भाविक आणि पर्यटक येथे आकर्षित व्हावेत, यासाठी प्रयत्नशील राहू.
याप्रसंगी कोपरगावच्या माजी आमदार श्रीमती. स्नेहलताताई कोल्हे, श्री. गंगाधर चौधरी, श्री. मधुकर सातव, श्री. सुभाषराव वहाडणे, श्री. भारतराव वहाडणे, श्री. सुधाकर जाधव, श्री. चंद्रकांत वाटेकर, श्री. अनिल नळे, श्री. संभाजी गमे, श्री. अशोकभाऊ पवार तसेच इतर सहकारी व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_घाट
#कार्तिकस्वामी_मंदिर #पुणतांबा #RamShinde
भारतीय जनता पार्टीचा भगवाध्वज हा केवळ एक ध्वज नसून राष्ट्रहिताची विचारधारा, राष्ट्रसेवेची निष्ठा व प्रत्येक कार्यकर्त्याच्या समर्पणाचे प्रतीक आहे. देशाच्या विकासासाठी व समाजसेवेसाठी सतत कार्यरत असलेल्या या विचारसरणीला अधिक बळकटी देण्याचा हा दिवस आहे.
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त, दिनांक ६ एप्रिल रोजी “माझा परिवार – भाजपा परिवार” या संकल्पनेला साकार करत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपल्या घरावर भाजपाचा ध्वज फडकवून हा दिवस उत्साहात व अभिमानाने साजरा करावा, असे विनम्र आवाहन.
चला, राष्ट्रसेवा व विकासाच्या या प्रवासात आपणही सक्रिय सहभाग नोंदवूया व भाजपाच्या विचारधारेचा अभिमानाने प्रसार करूया.
#BJPFoundationDay #MyFamilyBJPFamily #BJP #Maharashtra #RamShinde
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छेसह वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@Prof_RamShinde
विधानपरिषदेचे सभापती श्री.राम शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@Prof_RamShinde