कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर तोंड धरून व्यापाऱ्यांचा मारा करणं कोणी या भाजप सरकार कडून शिकावा!
महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी ५ क्विंटल (प्रति एकरी एकर) एवढाच कापूस हमीभावाने विकू शकेल, असा अजब आणि जुलमी फतवा या सरकारने काढला आहे! उरलेला कापूस व्यापाऱ्यांच्या घशात घाला आणि तोटा सहन करा असा रझाकारी नियम या सरकारने आता आणला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या उत्पन्नावर हा सरकारी दरोडा आहे. गल्ली ते दिल्ली कैफियत मांडूनही शेतकऱ्यांचे हे सरकार ऐकत नसेल तर हे सरकार भारतीय वंशाचे पण ब्रिटिश मानसिकतेचे आहे.
शेतकऱ्यांना अगोदर अस्मानी संकटाने मारले..
आता सरकारची सुलतानी त्यांच्या जीवावर उठली आहे.
अधिकचा कापूस पिकला, हा शेतकऱ्याचा दोष आहे का? ही मर्यादा सरकारने तात्काळ हटवावी आणि शेतकाऱ्यांकडून एकरी १२ क्विंटल कापूस हमीभावाने घ्यायला सुरुवात करावी, अशी आमची मागणी आहे.
जय महाराष्ट्र!
@CMOMaharashtra@AgriGoI@ChouhanShivraj@nitin_gadkari@PMOIndia@AmitShah
#farmerproducer #cotton #Maharashtra #BJPhittingfarmer
खेड्यापाड्यातील गोरगरीब मराठा समाज मुंबईत आरक्षण मागण्यासाठी आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर #लालबागच्या राजाचे अन्नछत्र बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मराठा हा स्वाभिमानी आहे आणि जो मराठा मुंबईत आला तो सगळ्यांचा पोशिंदा आहे.
#मराठा_आरक्षण#मराठाOBCArakshan
आज जागतिक रक्तदाता दिन!
या दिवशी मला 'लोकमत'तर्फे राबवलेली राज्यव्यापी रक्तदान मोहीम आठवते. कोरोनानंतरच्या भीतीच्या वातावरणात, रक्ताचा तीव्र तुटवडा असताना 'लोकमत'ने २ ते २७ जुलै २०२१ दरम्यान महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरे आयोजित केली आणि तब्बल ६०,७०६ बाटल्या रक्त संकलित केले. या पवित्र कार्यात महाराष्ट्रातील सर्व धर्म, राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला, हे विशेष.
'लोकमत'चे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती साजरी करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो?
या उपक्रमातून रक्तदानाविषयी जनजागृती झाली आणि असंख्य रुग्णांचे प्राण वाचले.
आजही ही मोहीम मला अपार समाधान देते.
#WorldBloodDonorDay2025
#blooddonation #Lokmat
@lokmat
पद्मविभुषण जयंत नारळीकर यांच्या निधनाने भारताने एक महान खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक गमावला आहे. त्यांनी आणि ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांनी मांडलेली 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थेअरी' जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
विज्ञानाचे मराठीकरण आणि हा काहीसा रुक्ष, किचकट असलेला विषय साधा सोपा करून लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. नारळीकरजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रिय विजयभैय्या, तुमच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! यार-दोस्त-सहकारी- कुटुंबीय सगळ्यांना जीव लावणाऱ्या तुमच्या चैतन्यशील दिलदारीने आम्हा सर्वांना श्रीमंत केले आहे. बाबूजींचा आशीर्वाद, तुमची ऊर्जा आणि जीवनसौंदर्य अविरत राहो. सदैव आनंदी आणि आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो हीच शुभेच्छा! 🎉
@vijayjdarda
#HappyBirthday
पाकिस्तानच्या आगळिकीला चोख प्रत्यूत्तर देत भारतभुमीचा ध्वज उंच फडकवत ठेवणाऱ्या सैन्यदलांना मानवंदना देताना आम्हा सर्वांचा उर काल आनंदाने भरून आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली छ. संभाजीनगरच्या क्रांती चौकात शहरातील मान्यवर नागरिकांनी एकत्र येऊन जयघोष केला तो क्षण...
@SanjayShirsat77@DrBhagwatKarad@SandipanBhumare@drkalyankale@CSNCityPolice
OPERATION SINDOOR
Indian Army Pulverizes Terrorist Launchpads
As a response to Pakistan's misadventures of attempted drone strikes on the night of 08 and 09 May 2025 in multiple cities of Jammu & Kashmir and Punjab, the #Indian Army conducted a coordinated fire assault on terrorist launchpads, pulverizing & razing them to cinders.
The terrorist launchpads, located close to the Line of Control, were a hub for planning and executing terror attacks against Indian civilians and security forces in the past. The Indian Army's swift and decisive action has dealt a significant blow to terrorist infrastructure and capabilities.
#IndianArmy
#PahalgamTerrorAttack
#JusticeServed
@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India@NorthernComd_IA@Whiteknight_IA
मी राज्याचा शालेय शिक्षणमंत्री होतो तेव्हाची गोष्ट. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे या अतिशय छोट्या गावच्या बिरदेव सिद्धपा डोणे या मुलाला दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के मार्क्स मिळाल्याचे कळले. मी उत्सुकतेने बिरदेवची चौकशी केली. माझे अधिकारी मला म्हणाले, सर, हा मेंढपाळ कुटुंबातला मुलगा आहे. आईवडील रोजंदारीवर जातात, हा मुलगा मेंढ्या चारून शिकतो. मला या मुलाच्या जिद्दीचे फार कौतुक वाटले. बिरदेवचे कौतुक करणारे एक पत्र मी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पाठवले... आणि विसरूनही गेलो.
इतक्या वर्षांनी हा बिरदेव अचानक मला पुन्हा भेटला आहे, आणि तोही भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक महत्वाकांक्षी तरुण म्हणून!
यूपीएससी परीक्षेत ५५१वी रँक मिळवून उत्तीर्ण झाल्याची बातमी बिरदेवच्या मित्राने त्याला फोनवर सांगितली तेंव्हा बिरदेव शेतातच मेंढ्या चारत होता. 'मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी क्रॅक केल्या'ची यशोगाथा सांगणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओत बिरदेवने माझी आठवण काढल्याचे मी पाहिले/ऐकले आणि खरं सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले...
इतक्या वर्षांपूर्वी मी पाठवलेल्या त्या पत्राची आठवण काढून बिरदेव सांगत होता, ते पत्र मिळताच मुख्याध्यापकांना खूप आनंद झाला. शाळेला खुद्द शिक्षण मंत्र्यांचे पत्र येण्याची ही पहिलीच वेळ. मुख्याध्यापकांनी त्या पत्राची रंगीत झेरॉक्स त्याला दिली आणि मूळ पत्र शाळेच्या रेकॉर्डवर ठेवले.
आपली एक छोटीशी कृती... कुणाच्या आयुष्याचा आधार होऊ शकते याचा हा अनुभव कृतार्थ वाटायला लावणारा आहे!
शाब्बास बिरदेव, असाच मोठा हो! तुझ्यासारख्या अधिकाऱ्यांच्या हाती देशाचे भवितव्य लखलखतेच असेल!
आपण लोकसेवक असल्याचा बहुतांश सरकारी बाबूंना विसर पडलाय. त्यात पोलिसांना अधिक. गुन्हेगारी का वाढतेय,याचे विश्लेषण आज एकही अधिकारी करत नाही. कर्त्यव्याचाच विसर पडलेल्या पोलिस विभागात मोठे बदल आवश्यक आहे, असे वाटत नाही का आपल्याला?@Dev_Fadnavis@DGPMaharashtra#महाराष्ट्र#म#पोलीस