हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले,माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ.
मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही.
तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde
20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची.
माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा.
हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे..!
आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लाऊन न्यायाची अपेक्षा करत आहेत.
न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे.
#pavanrajenimbalkar #samadkazi #omrajenimbalkar #dharashiv
एका बाजूला लहान मूल शांत झोपलेलं, तर दुसऱ्या बाजूला बाप आपल्या कष्टांची लढाई लढत उभा.❤️
स्वाभिमानाने जगण्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येक कष्टकरी हाताला मनापासून सलाम! 🙏