दिवसात फक्त एकदाच चालायची संधी मिळाली… तर कधी चालावे ?
Metabolic Health चा विचार केला, तर उत्तर स्पष्ट आहे : रात्री जेवणानंतर.
विशेषतः Blood Sugar, Fatty Liver, Insulin Resistance आणि पोटाची चरबी नियंत्रणात ठेवायची असेल तर.
✅ जेवण संपल्यानंतर साधारण 10–15 मिनिटांनी 15 मिनिटं शांतपणे चालायला सुरुवात करा. जेवून लगेच वेगाने चालण्याची गरज नाही.
✅ यामुळे जेवणानंतरची Blood Sugar Spike कमी ठेवायला, Insulin Sensitivity सुधारायला आणि शरीराला जेवणातील Glucose अधिक परिणामकारकपणे वापरायला मदत होते.
✅ वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचं. यासाठी Gym, Sports Shoes किंवा वेगळा वेळही लागत नाही.
✅ सकाळचा Walk Fitness साठी… आणि जेवणानंतर चालणं Blood Sugar, Fatty Liver आणि Metabolic Health साठी. शक्य असेल तर दोन्ही करा.
हजारो पावलं चालण्यापेक्षा… योग्य वेळी चाललेली 10–15 मिनिटं अनेकदा जास्त परिणामकारक ठरतात.
Dr Ravindra L. Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#MetabolicHealth #Walking #DiabetesCare #JustForHearts
सकाळची भूक बदलली आहे?
दुर्लक्ष करू नका.
✅ रोज सकाळी नैसर्गिक भूक लागणं हे अनेकदा चांगली झोप, योग्य रात्रीचं जेवण आणि संतुलित Metabolism याचं लक्षण असू शकतं.
✅ अनेक दिवस सकाळची भूक कमी झाली किंवा पूर्णपणे नाहीशी झाली, तर सर्वात आधी रात्रीचं जेवण, झोप आणि दिनक्रम तपासा.
✅ त्यासोबत वजन, थकवा किंवा इतर नवीन त्रासही सुरू झाला असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
सकाळची भूक बदलली…
तर फक्त नाश्ता बदलू नका.
कारण शोधा.
Like | Share | Subscribe
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#MetabolicHealth #HealthyHabits #PreventiveHealth #JustForHearts
“यशाची पहिली पायरी” पचवणं फार कठीण काम आहे…..
चार पैसे शिल्लक पडायला लागले की त्याचं काय करायचं हे बहुतांश लोकांना समजत नाही.
नोकरी वा धंदा, कोणत्याही मार्गाने येणाऱ्या गरजेपेक्षा जास्त पैशांचं नक्की काय करायचं हे कळालं तरच खरी स्थिरता येते.
यशाचं शिखर वगैरे फार लांबची गोष्ट.
साहिलनं Netflix वर एक वेबसिरीज बघा, असं सुचवलं. ती बघायला सुरुवात केली आणि आता 9 व्या सिझनला पोहचलो. त्या वेबसिरीजचं नाव Suit आहे. आता यातल्या माईक रॉस आणि हार्वी स्पेक्टरला तुम्ही ओळखतच असाल. ही वेब सिरीज कोर्ट, वकील आणि केस याभोवती फिरत असते.
हार्वी हा कायम जिंकण्यासाठीचं केस लढत असतो. तो एखादी केस जरी हारत असेल तरी जिंकण्याचा मार्ग शोधून काढतो. त्याला High Class राहायला आवडतं. हार्वी कायम त्याच्या विरोधी वकिलाला Dominant करत चालतो. त्याचं या वेबसिरीजमधलं एक वाक्य आवडलं. तो म्हणतो की, मी लोकांची काळजी करतो असं दाखवत नाही. ते समोरच्याला जाणवलं की तो आपला Weakness बनतो. ही क्वालिटी सिरीज असून जगणंचं शिकून जाते.
आपण एखाद्या व्यक्तीशी बोलताना शब्द जपून वापरायला हवेत. समजा एखाद्या व्यक्तीला काळजी घे म्हटलं. तर नंतर Universe तिच्यासाठी काम करतं चालतं. ती पोहचली की तुम्हाला आपोआप समजतं. कोल्हापूरचा मित्र मालकाला कॉल केला की तो घरी पोहचलेला असतो.
आपण बोलताना समोरच्या व्यक्तीला आपली एनर्जी पास करत असतो. त्यामुळं बोलताना, वागताना विचार करायला हवा. मोठी लोक कमी Accessible का असतात, ते आता समजायला लागलंय.
घराशेजारच्या हॉटेलमध्ये काम करणारा नेपाळी व्यक्ती सकाळी भेटला. Good Morning म्हणून त्यानं दिवसाची सुरुवात केली. तो बिल्डिंगमधला कचरा गोळा करतं होता. साडेचार वाजता उठून गाड्या धुतो, नंतर बिल्डिंगमधला कचरा साफ करतो. दिवसभर हॉटेलमध्ये Assistant Manager म्हणून काम करतो. हॉटेल रात्री 12 वाजता बंद होतं.
त्याच्या हॉटेल मालकानं रहायची आणि खायची सोय करून दिलीय. नेपाळमध्ये घरचे शेती करतात, असं तो सांगत होता. कुणाल शाहचा एक व्हिडीओ Xवर व्हायरल होतोय. त्यात तो Time ही आपली सर्वात मोठी संपत्ती असल्याचं सांगतोय. वरच्या नेपाळी व्यक्तीनं त्याचा टाइम बरोबर कामात घालवलाय. आपण टाईमला आपली Priority देऊ आणि पुढं निघून जाऊ.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांचा मराठी भाषेसोबतचा झालेला प्रेमभंग-विरह आणि त्यांच्या विरह वेदना शब्दात मांडताना आमच्या कोकणातले एक कवि लिहीतात… नीट ऐका हे स्वर!
कारण अध्यक्षांचं मराठी ऐकताना
आमचा कंठ दाटून आला होता🙏🏻
जिद्द, चिकाटी, परिश्रम अशी वर्षानुवर्षे तीच ती गुळगुळीत भाषणं करत लोकांना भारावून टाकत लोकप्रिय होण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेतलं वास्तव परखड पणे मांडणारा आन दुसरीकडे आपल्या कामातनचं लोकांच्या मनात आदर आणि 'विश्वास' निर्माण करणारा 'तुकाराम' साहजिकच कैक पटीनं उठून दिसतो..🔥🔥
“डॉक्टर, मला वारंवार लघवीला जावं लागतंय… हे Diabetes तर नाही ना?”
आज सकाळी OPD मध्ये एक 30 वर्षांचा IT Professional , consultation साठी .
मुख्य तक्रार होती : लघवीचं प्रमाण वाढल्यासारखं वाटत होतं.
त्याच्या मनात लगेच Diabetes ची भीती आली होती.
घरात हृदयविकाराचा इतिहास होता.
म्हणून आरोग्याबद्दल तो जागरूकही होता आणि थोडासा चिंताग्रस्तही.
OPD मध्ये तपासणी केली.
Sugar नॉर्मल होती.
इतर कोणताही गंभीर संकेत दिसत नव्हता.
त्यानंतर त्याने मागील काही वर्षांचे रिपोर्ट्स दाखवायला सुरुवात केली.
एकामागून एक.
काही रक्त तपासण्या.
काही स्कॅन्स.
काही प्रोफाइल्स.
ते पाहताना मला एक गोष्ट जाणवली.
हा तरुण निष्काळजी नव्हता.
उलट तो आरोग्याबद्दल खूप जागरूक होता.
तो माझे X वरील पोस्ट नियमित वाचत होता.
आरोग्याची काळजी घेत होता.
पण कदाचित तो लॅब रिपोर्ट्सना थोडं जास्त महत्त्व देत होता.
आमच्या चर्चेच्या शेवटी मी त्याला सांगितलं
“तुला सध्या आणखी टेस्ट्सची गरज नाही.”
“तुला फक्त काही महत्त्वाचे Health Markers ट्रॅक करायचे आहेत आणि त्यात सातत्याने सुधारणा करायची आहे.”
खरं सांगायचं तर…
मला वाटतं आज अनेक 24-40 वयोगटातील तरुण याच परिस्थितीत आहेत.
म्हणून त्याला दिलेला तोच सल्ला आज इथे तुमच्यासोबतही शेअर करतो आहे.
मी त्याला खालील Health Markers नियमित ट्रॅक करायला सांगितले.
1. Waist Circumference
वजनापेक्षा पोटाभोवतीची चरबी अनेकदा जास्त माहिती देते.
2. Early Morning / Resting Heart Rate
शरीर किती कार्यक्षम आहे याचा साधा आणि प्रभावी निर्देशक.
3. Heart Rate Recovery
जिने चढल्यानंतर किंवा वेगाने चालल्यानंतर 1 मिनिटात हृदयगती किती कमी होते?
मी नियमित पाहत असलेल्या महत्त्वाच्या मार्कर्सपैकी एक.
4. Push-up Count
शरीराची ताकद आणि Metabolic Fitness याचं साधं मोजमाप.
5. Pull-up Count
संपूर्ण शरीराची कार्यक्षमता आणि स्नायूंची गुणवत्ता दर्शवणारा निर्देशक.
6. VO₂ Max
तुमची Cardiorespiratory Fitness किती चांगली आहे याचा अंदाज.
7. Daily Step Count
परिपूर्ण नाही.
पण हालचाल होते आहे की नाही याचं वास्तव दाखवतं.
8. Triglycerides
अनेक तरुणांमध्ये वाढत्या Metabolic Risk चा सुरुवातीचा इशारा.
9. Fasting Insulin
Diabetes येण्याच्या अनेक वर्षांपूर्वी शरीरातील बदलांची चाहूल देऊ शकतो.
आणि त्यासोबत फक्त काही साध्या सवयी.
✔ नियमित व्यायाम
✔ लवकर रात्रीचं जेवण
✔ रोजची हालचाल
✔ पुरेशी झोप
✔ अधूनमधून निसर्गात चालणं
25+ वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट शिकलो आहे.
तिशीत असताना अनेक जण आरोग्य तपासण्यांच्या मागे धावतात…
पण आरोग्य घडवणाऱ्या सवयींची नोंद ठेवत नाहीत.
सर्व तपासण्या वाईट नाहीत.
योग्य वेळी त्या आवश्यकही असतात.
पण प्रत्येक काही महिन्यांनी नवीन टेस्ट करण्यापेक्षा…
स्वतःची फिटनेस, ताकद, हालचाल, recovery क्षमता आणि दिनचर्या यांचा मागोवा घेणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं.
कारण तिशीत चांगलं आरोग्य हे रिपोर्ट्समधून मिळत नाही…
ते सवयी, शिस्त आणि सातत्यातून तयार होतं.
Like | Repost | Follow
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#MetabolicHealth #Patients #Stories
#JustForHearts
शनिवारी गावाकडं गेलो होतो, त्यावेळी एक पोल्ट्री उद्योजक भेटला. त्यानं शाळेत असल्यापासून बिझनेसला सुरुवात केली. सुरुवातीला कोंबड्या कापल्या, घरापुढं चिकन सेंटर चालू केलं. आता 2 पोल्ट्री चालवतो, कोंबडं खत विकतो. पोल्ट्रीत कोंबड्यांखाली जे तूस टाकलं जातं, त्याचा पूर्ण तालुक्यातील पोल्ट्री उद्योजकांना पुरवठा करतो.
त्यानं बोलताना आपली भूक किती मोठी आहे, त्यावरून आपण किती यशस्वी होणार हे ठरतं असं सांगितलं. काम करताना स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपण करू शकतो असं समजूनच काम करायचं असं सांगितलं. गावच्या ठिकाणी आज त्याचा 3 कोटी+ टर्नओव्हर आहे.
त्यानं शेजारच्या गावाच्या MIDCमध्ये एक कंटेनर भाड्यानं लावलाय. हैद्राबादला जाऊनं गाडीतील माल खाली केला की तो कंटेनर येताना तूस घेऊन येतो. गड्यानं डोकं भन्नाट लावलाय, Confidence असावा तर असा.
HOW TO
RECOGNIZE DEFICIENCIES IN THE BODY:
COLD HANDS AND FEET
Constantly cold extremities can point to low iron or an underactive thyroid driven by an iodine deficiency, since both are needed to carry oxygen and generate body heat.
HAIR LOSS AND THINNING
Hair shedding is one of the first signs of low iron, low zinc, or inadequate protein, because your body deprioritizes hair growth the moment resources run short.
CRACKS AT THE CORNERS OF YOUR MOUTH
Splitting or sores at the corners of your mouth often signal a deficiency in B vitamins, especially B2 and B6, along with iron.
MUSCLE CRAMPS AND TWITCHES
Random cramping, twitching eyelids, or charley horses usually point to low magnesium, potassium, or calcium
RIDGED OR SPOONED
FINGERNAILS
Vertical ridges, brittleness, or nails that curve upward like a spoon are classic indicators of an iron deficiency.
TINGLING IN YOUR HANDS AND FEET
Numbness or a pins-and-needles feeling in your extremities can be an early warning sign of low B12, which your nerves depend on to function.
BUMPY SKIN ON THE BACKS OF YOUR ARMS
Those small rough bumps, often mistaken for normal skin texture, can reflect a deficiency in vitamin A or essential fatty acids.
A-SWOLLEN OR SCALLOPED
TONGUE
A tongue that looks beefy and red or has wavy indentations along the edges can point to low B12, folate, or iron.
YOUR BODY IS ALWAYS TALKING
Your body is constantly giving you clues, and these surface-level signs are often the first place a deeper deficiency shows up.
Pay attention to what it is telling you and get the right things tested.