So missing link is now flooded and apparently closed.
Probably part of the first rain testing plan mentioned by CM Devendra Fadnavis the other day when speaking about 2 potholes.
Literally the first major rain and we are exposed!
You would think they plan for Landslides, heavy rains as the first thing when building a project in Sahyadris but no!
Corruption of the highest order?!?!?!
Video Source : instagram
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
Development or Distruction?
माझा एक मित्र २०२३ मध्ये घरातून दिसणाऱ्या हिरवाईने नटलेल्या त्या विशेष नजाऱ्यासाठी फक्त ठाण्याला राहायला गेला होता.
पण २०२६ पर्यंत ते दृश्यच नाहीसे झाले आहे, ती हिरवाई नष्ट झाली आहे. आणि लवकरच तिथे काँक्रीटचे आणखी एक जंगल उभे राहील.
केवळ ठाण्यातच नाही, तर संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात आणि भारतात सर्वत्र हेच घडत आहे.
विकासाच्या नावाखाली झाडं हिरवी राई असलेली अशी क्षेत्रे मर्जीतल्या भांडवलदारांच्या (crony capitalists) हवाली केली जात आहेत.
खाणकामासाठी जंगलं तोडली जात आहेत.
किनारपट्टीला लागून रस्ते बनवण्याच्या अट्टहासापायी खारफुटीची वनं नष्ट केली जात आहेत.
आणि याविरुद्ध जो कुणी आवाज उठवेल त्याला सरळ 'राष्ट्रविरोधी' ठरवले जाते.
डिस्क्लेमर : भारतातील लोक एकतर आंधळे तरी झाले आहेत किंवा मग इतके हतबल झाले आहेत की, ते आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी साधा निषेधाचा एक आवाजही काढू शकत नाहीयेत.
- दर्शन मोंडकर
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
"यांना समजून घ्या...
या आहेत भाजपच्या मिरा रोडमधील नगरसेविका सौ अनिता पाटील, पालिकेत महिला आणि बाल कल्याण समितीची जबाबदारी यांच्यावर आहे. यांना दोन सख्खे भाऊ आहेत - दयाराम चव्हाण आणि राजेश चव्हाण.
त्यांच्या भावांवर अत्यंत गंभीर आरोप आहेत,posco Act अंतर्गत श्री राजेश चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे,असे काही रिपोर्ट सांगत आहेत.
दयाराम चव्हाण याने इयत्ता ५ वीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला पीडित केले, तिचे लैंगिक शोषण केले आणि त्याचा व्हिडिओ बनवून सतत ब्लॅकमेल करत राहिला. हे शोषण त्याने पुढेही चालूच ठेवले.
दुसरा भाऊ राजेश चव्हाण यानेही त्याच व्हिडिओचा आधार घेत त्या अल्पवयीन मुलीचे शोषण केले, ब्लॅकमेलिंग चालूच ठेवले आणि अत्याचार करत राहिला.
हे शोषण सलग ५ वर्षे चालू होते. इयत्ता दहावीत असताना या अल्पवयीन मुलीने नगरसेविका सौ. अनिता पाटील यांना या संपूर्ण अत्याचाराची माहिती दिली. मुलीला अशी अपेक्षा होती की त्या न्याय मिळवून देतील, पण त्यांनी आपल्या भावांना पाठीशी घालत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.
सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अल्पवयीन मुलगी मदतीची अपेक्षा करताना ऐकू येत आहे.
मनसे, छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पेणकर पाड्याचे स्थानिक रहिवासी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी, काँग्रेस आणि विविध महिला संघटनांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. या महिलेचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे, तसेच या गुन्ह्यात तिला सहआरोपी म्हणून नोंदवण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली जात आहे.
सौ. अनिता पाटील यांचे म्हणणे आहे की, त्यांना या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे."
दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असताना कारवाई होईल का?
आपल्या वक्तव्यांमुळे आणि भाजपच्या गुलामीमुळे लोकं सोशल मीडियावर कमेंट्समध्ये शिव्या घालतात, लाज काढतात म्हणून कमेंट्स बंद ठेवणाऱ्या नवनाथ बनने मला अक्कल शिकवू नये... आम्ही मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी लढतोय कोणत्या लोढाची किंवा हिंदी भाषेची गुलामी करत नाही!
#BaskarBan #BJPsParrot #हिंदआहोतहिंदीनाही
@BJP4India@NavnathBanBJP@AmeetSatam@MPLodha@mnsadhikrut@RajThackeray
बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही,
पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही,
त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...!
माझे पुन्हा सवाल आहेत,
शेतकर्यांना मदत केव्हा करणार?
पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?
#टोमणेसभा
रशियाने सांगितल्यानंतर मग भारतीयांना समजलं.. शंभरेक भारतीय मेले.. ही परिस्थिती आहे इथल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची.. अजिबात विश्वास ठेवू नका यांच्यावर.. देशाचं वाटोळं करण्यात ही माध्यमे आघाडीवर आहेत.. त्यानंतर राजकारणी.. असो..❤️
#भारत
Horrible परिस्थिती आहे देशात!
शंभर एक लोकांचा मृत्यू झालाय पण रशियाने ट्वीट केलंय म्हणून कळतंय, नाहीतर आमचा मीडिया तर याने बुलेट चालवली, त्याने बस मधून प्रवास केला, त्याने दोन गाड्या कमी केल्या यातच अडकलाय.
एका चिमुकलीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हळहळला आहे, आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्याराज्यात विजय मिळाला म्हणून झालमुरीचा खातायत...ह्यांना लाज कशी वाटत नाही? ह्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? देवाभाऊ किती निर्लज्जपणाचं प्रदर्शन ह्या महाराष्ट्राला घडवणार आहात?
#ShameOnDevendraFadnavis #Nasrapur #bengalelection2026
पूर्वी टीव्ही आणि चित्रपट हे समाजाचा खरा आरसा होते. लोकांच्या समस्या, वास्तव, संघर्ष हे सगळं स्पष्टपणे दाखवलं जायचं.
आता मात्र चित्र बदललंय…
आजच्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये ना समाज दिसतो, ना प्रश्न! सगळं काही “एंटरटेनमेंट”च्या नावाखाली वरवरचं झालंय.
खऱ्या समस्या आता फक्त सोशल मीडियावरच जिवंत आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा सारखा एकेकाळी समाजावर भाष्य करणारा कार्यक्रमही आता वास्तवापासून दूर गेलाय का ?
याच विषयावर आमचं सविस्तर विश्लेषण नक्की पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा! 👇
.
.
.
.
.
#tmkoc #tmkocfanclub #maharashta #marathi #mns
चिमुरडीवर अत्याचार झाला, #पुणे पेटले, ट्रॅफिक मध्ये अडकले पण हे दिसले ?
मेधा कुलकर्णी :- महिला बिलाच्या वेळी दिल्लीत आक्रोश करत होत्या इथे अत्याचार झाला तर दिसल्या?
सिद्धार्थ शिरोळे :- ह्यांचे इंग्रजी ट्विट गायब झाले बाकीवेळी असतात.
मोहोळ :- उत्तरेत गाड्या सोडताना दिसतात.
सलमान सारखा इतका मोठा मेगास्टार आपल्या मराठी चित्रपटात रोल मागून काम करतोय याचा आपल्याला अभिनान का असू नये..???
हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या पेड भक्तांच्या नादी नका लागू तुम्ही…त्यांना माय मराठीची प्रगती कधीच बघवणार नाही.
तुम्ही सलमानच्या एंट्रीची थेटरात मजा घ्या !
Seeing photos of 'cracks' on Mumbai Metro works? 🤔
Not every line/gap is a crack.Most show planned construction joints, safe by design.
Thank you, Mumbaikars, for your vigilance & sharing.We inspect every flag promptly.
Joint or crack? A quick guide to spot the difference🧵
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।