पेपर पुढे ढकलला आहे तर सर्व तांत्रिक संवर्ग ( जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर) या पदभरती मध्ये समाविष्ट करून परीक्षा घेण्यात यावी ही नम्र विनंती.....!
@CMOMaharashtra@SanjayDRathods@RVikhePatil@mieknathshinde
MJP Assistant Accounts Officer परीक्षेतील Technical विभागात 50 प्रश्नांसाठी 100 गुण आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असताना, टॉप विद्यार्थ्यांना 99/100 गुण नेमके कसे मिळाले?
Negative Marking लागू असल्याचे सांगितले जात असताना 99 गुणांची गणना कोणत्या सूत्राने झाली? परीक्षा एकाच शिफ्टमध्ये झाली असल्यास Normalisation किंवा Score Equating लागू केले का? हा केवळ गुणांचा प्रश्न नाही; हा भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.
MJP आणि IBPS यांनी 99/100 गुणांची अचूक गणना, प्रश्ननिहाय गुणांकन, Negative Marking चे सूत्र आणि लागू केलेली स्कोअरिंग पद्धत अधिकृतरीत्या सार्वजनिक करावी.
जर गुणांकन प्रक्रियेत कोणतीही त्रुटी अथवा विसंगती आढळली, तर त्याची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. उमेदवारांना केवळ स्पष्टीकरण नव्हे, तर पारदर्शक उत्तर आणि अधिकृत हिशोब मिळालाच पाहिजे.
#MJP #AssistantAccountsOfficer #MJPExam #IBPS #RecruitmentTransparency
मा.@mpsc_office@bhimanwar
औषध निरीक्षक पेपर फोडून मिळवला, पण नुसत्या पेपरफुटीने निवड होणार नव्हती. अंतिम निवडीसाठी मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक होते. मग पेपरमध्ये काहीच येत नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीत 41%+ गुण कसे मिळाले?
हे गुण मिळाले नसते तर पेपर फोडूनही त्यांची निवड झाली नसती. मग मुलाखतीत आवश्यक गुण मिळतील, असे आश्वासन कोणी दिले?
मुलाखत मॅनेज झाली का? आयोगातील कोणत्या “सदस्याची” भूमिका होती? याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.@CMOMaharashtra@maha_governor@satejp@INCHarshsapkal
#MPSC #DrugInspector #पेपरफुटी
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.
आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटला असेल तर परीक्षेच्या दोन महिने आधीच पेपर फुटला ही बाब अत्यंत गंभीर नाही का ? परीक्षेच्या दोन महिने आधी पेपर फुटला असतानादेखील मार्च मध्ये पेपर घेतलाच का? दोन महिने आयोग झोपा काढत होता का ?
कर्णिक घोटाळ्यासारखेच हे प्रकरण असून आपण जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे अभ्यास करावा की करू नये ? या द्विधा मनस्थितीत आज विद्यार्थी आले आहेत, लायब्ररीतसुद्धा बसण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. संवैधानिक पदाची, आयोगावरच्या विश्वासाची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आपल्याला खरंच काळजी असेल तर तत्काळ नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्या आणि लाखों विद्यार्थ्यांवर उपकार करा.
राहिला विषय वैयक्तिक आणि राजकीय आरोपांचा, त्यासंदर्भात मी अजून एक टक्का देखील बोललेलो नाही, जेव्हा बोलायला सुरुवात करेल ना तेव्हा आपणच काय तर आपला पाठीराखा असलेल्या सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मी पुराव्याशीवाय बोलत नाही.
#MPSC #पेपरफुटी
#MPSC पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आणि नाराजीची भावना आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अनेक विद्यार्थी, सर्व क्लासचालक आणि अभ्यासिका चालक यांना धमकावल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांना विशेषतः पोलीस आयुक्तांना एकच सांगणं आहे, धमक्या द्यायच्या असतील तर कोयता गँगला द्या, बनावट दारू विक्रेत्यांना द्या!
आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाद करू नका, अन्यथा ही बाब महागात पडेल. हे सर्व स्वाभिमानी मराठी विद्यार्थी आहेत आणि आम्हीही त्यांच्यासोबत आहोत, हे पोलीस प्रशासनाने विसरू नये!
@Dev_Fadnavis@CPPuneCity
#MPSC_विद्यार्थी #पुणे_पोलीस
औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याचा MPSC ने केलेला दावा पोलीस तपासात फोल ठरला आणि एमपीएससी मधीलच ३ अधिकाऱ्यांना अटक झाल्याने या महत्त्वाच्या संस्थेच्या प्रतिमेला डाग लागला आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून त्यासाठी नवी मुंबईत MPSC कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रातिनिधीक आंदोलनात सहभागी होऊन अध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
RTO कमिशनर असताना भीमनवार यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे त्यांच्यावर आरोप असतानाही केवळ मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत म्हणून या गैरप्रकाराकडं दुर्लक्ष करत सरकारने त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली. अध्यक्षांवरच असे गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्यांच्या नेतृत्त्वाखालील कारभार पारदर्शक कसा होईल? असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळं त्यांना तातडीने या पदावरून हटवून तुकाराम मुंडे साहेब किंवा महेश झगडे साहेब यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची या पदावर नेमणूक झाली पाहिजे तरच निवड झालेले अधिकारी हे जनतेप्रती प्रामाणिक राहून सेवा करतील. त्यासाठीच राज्यातील विद्यार्थी पुण्यातून लवकरच मोठा लढा उभारणार असून त्यांच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठींबा आहे.
(विद्यमान अध्यक्षांविरोधात पूर्वी झालेल्या तक्रारीची काही पानं इथं माहितीसाठी देतोय आणि संपूर्ण पत्रही सोबतच्या लिंकवर पाहता येईल.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
https://t.co/W6YMPiMVnA
#MPSC #पेपरफुटी
Sunday Wisdom!दिवंंगत डाॅ.कर्णिक मलोआ चे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात घडलेल्या खान्देशातील उमेदवारांच्या एका प्रकरणानंतर आता पुन्हा खान्देशातील दुसर्या प्रकरणी आयोगाची अब्रु धुळीत.मधल्या काळात महत्प्रयासाने #MPSC ची विश्वासार्हता उंचावून ती जपण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांवर या पेपरफूटी प्रकरणाने पाणी.
औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेसाठी पेपर सेटर्सच्या निवडीमधे अवलंबली गेलेली कार्यपद्धत,पेपर सेटींग सारख्या संवेदनशील व गोपनीय कामकाजासाठी विषयतज्ञ व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता घालूून दिलेली आचार संहिता व अंगभूत सुरक्षा प्रणाली यांचे या प्रकरणी काटेकोर अनुपालन,याबाबतची वस्तुस्थिती व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरु झाल्याच्या दिवसापासून ते पेपर्स परीक्षा केन्द्रांकडे (दूरवरच्या व स्थानीय सुद्धा) रवाना होईपर्यंतच्या संपूूर्ण कालावधीतील,आयोगाचा कार्यालयीन परीसर व गोपनीय परीक्षा कक्षाचे सीसीटीव्ही चित्रिकरण,यांच्या सखोल अंतर्गत पडताळणी अंती आयोगाला निश्चीत निष्कर्षांप्रत पोहोचणे शक्य.
पूर्वपरीक्षा+लेखी परीक्षा वा केवळ लेखी/चाळणी परीक्षा या दोहोंसाठी विषयतज्ञांच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती,पेपर सेटींगचे संवेदनशील कामकाज,छपाई,साठवणूक, वाहतूक व आनुषंगिक सुरक्षा प्रणाली आणि संवेदनशील परीक्षा विभागात अधिकारी/कर्मचारी नियुक्तीस्तव योग्यता या बाबींचा आयोगाने "सर्वांप्रती अविश्वास" या तत्वावर संर्वकष फेेरआढावा घेत कार्यनियम व मानक कार्यपद्धतीतील उणीवा तातडीने दूर करून ती अधिक सक्षम करणे गरजेचे!
परीक्षा झाली… पण प्रक्रिया पारदर्शक होती का?
डमी उमेदवार, संशयास्पद निकाल, परीक्षागृहातील फोटो आणि बनावट भरतीचे आरोप…इतक्या तक्रारींनंतरही स्पष्ट उत्तर का मिळत नाही?
तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास का ढासळतोय, हे समजून घेण्यासाठी चॅनेलवरील पूर्ण व्हिडिओ पाहा.
#RecruitmentExam #PMC #ExamScam #YouthQuestions #ExamTransparency #LegalAwareness #VijayKumbhar
PMC recruitment, recruitment exam, exam scam, recruitment fraud, dummy candidate, suspicious results, exam transparency, youth questions, government recruitment, Pune Municipal Corporation, competitive exams, legal awareness, Vijay Kumbhar
आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रिया तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar@satejp@CMOMaharashtra@INCHarshsapkal@Dev_Fadnavis मा. आयोगाने स्वतः स्पष्ट केले होते की One Candidate One Post लागू करण्यात येईल आणि परत आता एका उमेदवाराची 3 पोस्ट साठी शिफारस न करता त्याच्याकडून preference घेऊन बाकीचे उमेदवारांना दिलासा द्यावा, नियुक्ती येईल मग त्यानंतर वेटींग mg पुढे कधी होईल काय होईल यामध्ये खूप वेळ जाणार.
#CIDCO कडून डिसेंबर 2023 मध्ये account clerk पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु परीक्षा 16 महिन्यानंतर 10 जून 2025 रोजी झाली. निकाल व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ऑगस्ट 2025 मध्ये पार पडली. आता 1 वर्ष उलटून गेले तरी अद्याप अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परिणामी गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. तरी CIDCO ने तत्काळ अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करून घेण्याबाबत कार्यवाही करावी, ही विनंती!
@mieknathshinde