विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" मागणीपत्रक देण्यात आले आहे.
दि. 27.05.2026 च्या सुधारित आकृतिबंध शासन निर्ण��ानंतर व दि. 08.06.2026 च्या अंमलबजावणी परिपत्रकानंतर रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सुधारित मागणीपत्र MPSC कडे
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
विषय : MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य पदे दर्शविल्याबाबत तातडीने सुधारित मागणीपत्र पाठवून रिक्त पदांचा समावेश करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र. 133/2025-26 अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी प्रसिद्��� करण्यात आलेल्या पदसंख्येमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य (0) पदे" दर्शविण्यात आली आहेत. ही बाब राज्यातील हजारो अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण करणारी असून राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत चिंताजनक आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेली माहिती, विभागी�� आस्थापना अभिलेख तसेच विविध शासकीय कागदपत्रांमधून जलसंपदा विभागासह इतर विभागांमध्ये स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे स्पष्ट होते. असे असतानाही 2023, 2024 आणि 2025 या सलग तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणतेही मागणीपत्र न पाठविणे अथवा शून्य पदांची मागणी करणे हे राज्यातील गुणवंत उमेदवारांवर अन्य��य करणारे आहे.
जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, नगरविकास आणि इतर पायाभूत सुविधा विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू असताना तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. परिणामी कामांच्या गुणवत्तेवर, देखरेखीवर आणि अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की,
1. जलसंपदा विभागासह संबंधित सर्व विभागांमधील स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी संवर्गातील प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सार्वजनिक करावी.
2. उपलब्ध रिक्त पदांच्या आधारे सुधारित मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ��ातडीने पाठवून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 मधील पदसंख्या वाढवावी व रिक्त पदांचा समावेश करावा.
3. सेवाप्रवेश नियमांमधील प्रलंबित बदलांचा परिणाम न होणारी पदे तात्काळ भरती प्रक्रियेत समाविष्ट करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
4. गेल्या तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी शून्य मागणीपत्र का पाठविण्यात आले याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेले तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. या विषयात आपण वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
मोबाइल क्र. ९८६७६ ९३५८८
@CMOMaharashtra @INCHarshsapkal @INCMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @girishdmahajan @RVikhePatil @degree_holders @mpsc_ofice @Mpsc_Andolan @PunyachiMPSC
#MPSC #MES2026 #CivilEngineering #Maharashtra
RTI, शासकीय नोंदी व उपलब्ध माहितीनुसार जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही 2023, 2024 व 2025 या सलग तीन वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" मागणीपत्र देण्यात आले आहे.
खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या.
#BMC_SE
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता भरतीत काही लोक गैरप्रकार करण्याच्या तयारीत आहेत.
तशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या दलालांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
@mybmc@CMOMaharashtra
#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका #Engineer भरतीत घोटाळा/सेटिंग झाली आहे का?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या प���ाची परीक्षा ही ३/८/९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेबाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे.
काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. परीक्षेतील मार्क वाढवण्यासाठी यांचे बोलले सुरू आहे.
BMC भरतीत घोटाळा होऊ नये म्हणून फक्त #TCS_ION ची परीक्षा केंद्रे द्यावे म्हणून आपण मागणी करतो आहोत, उमेदवारांनी आंदोलने सुद्धा केली परंतु तरीही BMC प्रशासन नमले नाही.
BMC आण�� सरकारने या ऑडिओ क्लिपला गांभीर्याने घेऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करावी. असे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण करून परीक्षा घ्याव्यात ही नम्र विनंती.
@mybmc @Dev_Fadnavis @AUThackeray @mieknathshinde @Dhananjay_AAP @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @ShelarAshish @Awhadspeaks @degree_holders @CMOMaharashtra @PatilKailasB @AbhiPawarBJP @harshsapkal .
शिवशाहीत भर पहाटे बलात्कार घडला,
तात्यांनी बातमी ऐकली अन दांडा हातात घेऊन बस डेपोच फोडला,
20 सुरक्षा रक्षकाला निलंबीत करून परिवहन मंत्री मोकळा झाला
पोलिसांना मोठं यश "आरोपीची चप्पल सापडली" ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आवाज आला
न्यूजवाले सुसाट बसमध्ये घुसू लागले,
एक अँकर जोरात ओरडली पळापळा यात बघा बघा काय काय आहे?
साड्या, रगी, चड्डी, पँट्टी, कंडोमचा खच्च निघाला,
सगळं कसं विपरीत घ���लं,
शोधायला गेले काय तिसरंच उघडं पडलं,
आरोपीने गुन्हा केला,
चपल सोडुन पळून गेला,
आठ टीम तरी गडी,
गावला नाही,
पोलीस म्हणतात चप्पल सापडली यश आलं,
चित्राताई म्हणतात देवाभाऊ कठोर भूमिका घेणार
अहवाल म्हणतो एकदा नाही दोनदा बलात्कार झाला
असा सगळा खेळ खुलेआम मांडला होता
बलात्कार पीडितेच्या तोडलेल्या लचक्यावर सुद्धा राजकारणाचा खेळ रंगला होता
जाणीव कुणाला कशाचीच राहिली नाही
कधी तरी अशा मुद्द्यावर एकत्र येऊन लढावं
असं कुणाला वाटलंच नाही
गावात, शहरांत कुठे कुणीच सुरक्षित नाही
खंडणी रोखली तर देशमुख केला
संविधान जिंदाबाद म्हटलं म्हणून सूर्यवंशी केला
आंतरजातीय विवाह केला म्हणून विक्रम गायकवाड केला
दलित पुजारी म्हणत धडापासून दहातोंडेच मुंडकं वेगळं केलं
प्रेम केलं म्हणूं लातुरात माऊली सोट मारला
जत सांगलीमध्ये 5 वर्षाच्या चिमुरडीवर
बलात्कार करून तिला मारून पेटीत भरला
अठरा तरुणांनी 5 तरुणीवर सामूहिक बलात्कार केला
हिंमत करून लेकरू शहरांत आलं होतं
तिचा सुद्धा स्वारगेटला पहाटे नराधमाने घात केला
तरी कुणी म्हणत नाही
गृहमंत्री राजीनामा द्या
एक दांडा काढतो
एक फतवा काढतो
हिंमत कुठंय मुळावर घाव घालण्याची?
अन जिथं नाही सुरक्षित आई बहीण
ती राजवट उद्ध��स्त करण्याची?
नेता म्हणतो हे सगळं सोडा,
आमच्या उतेकरने बनवलेला छावा कसा वाटला?
तरी आम्ही गप्प आहेत,
सगळे चिडीचिप्प आहेत,
आमच्या घरातले सुरक्षित आहेत ना,
कुंभमेळ्यात अंघोळ करून आलेत ना,
यात जनता खुश असावी का?
अन बलात्कार झालेली पीडिताच दोषी का नसावी,
म्हणणारी औलाद येते जन्माला यावी का?
- दीपक केदार
@mybmc
सर्व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थी आपल्याला विनंती आणि विनवण्या करून थकले. शेवटी, त्या��ना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले.
त्यांची मागणी अत्यंत साधी आणि सरळ आहे:
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क ��रलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा द्यावी.
👉 परीक्षा फक्त अधिकृत केंद्रांवरच घेण्यात याव्यात.
👉 500-600 किमी दूर परीक्षा केंद्र देणे अन्यायकारक आहे.
👉 गल्ली-बोळातील खाजगी परीक्षा केंद्रे जाणूनबुजून निवडणे हे संशयास्पद आहे.
👉 यापूर्वी गैरव्यवहार झालेल्या परीक्षा केंद्रांची पुन्हा निवड का केली जात आहे?
यातून नेमके काय साध्य करायचे आहे?????
Computerized online exam
मध्ये ���िद्यार्थ्यांना अतिशय जुने, निकृष्ट दर्जाचे desktop आणि keyboard दिले जातात, त्यामुळे परीक्षा सुरू असतानाच तांत्रिक अडचणी येतात.
पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव आहे.
वारंवार तक्रारी असूनही प्रशासन जाणूनबुजून अशा परीक्षा केंद्रांची निवड करत आहे, जिथे गैरव्यवहाराला वाव मिळू शकतो.
👉 ही परिस्थिती कुठे घेऊन चालली आहे?
मा. मनपा आयुक्त श्री. भूषण गगर��णीजी,
आपल्याकडून ही अपेक्षा नाहीच.
"Free, fair, and transparent exam" हा प्रत्येक परीक्षार्थी चा हक्क आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@maha_governor
@AjitPawarSpeaks
@ssaunik
मनमानी कारभार आणि राजकारणाच्या खेळात गोरगरीब विद्यार्थ्यांना ढकलू नका.
त्यांची मागणी पूर्णतः रास्त आहे.
तात्काळ अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.
🔸 हे सर्व उमेदवार एकत्र आल्यावर
शेवटचा मार्ग कोणत�� व कसा निवडतात याचा आपणास अनुभव आहेच.
🔸 अशा अन्यायकारक निर्णयांमुळे महाराष्ट्र सरकारची देशभर बदनामी झाल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत.
हे पुन्हा अनुभवायचे आहे का??
वा #देवाभाऊ तुमचे सरकार 74000 कोटी बजेट असलेली मुंबई महानगर पालिका JE आणि SE (CIVIL/MECH/ELEC) ची परीक्षा चक्क सायबर कॅफे ���र घेते. मग 900/1000 रुपये कशाला घेता परिक्षा जर पारदर्शक पद्धतीने होऊ द्यायचा नसेल तर 😡हे आहे का तुमचे अचछे दिन
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mybmc
@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ramkadam@BJP4Mumbai
IBPS कडे शासन मान्यता प्राप्त TCS ION डिजिटल केंद्र उपलब्ध असताना देखील खासगी ��ल्ली गल्लीबोळा मधील केंद्र दिलेत जेथे आधी घोटाळे सिद्ध झाले आहेत.
७- ८ महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासन मृदू जलसंधारण विभागाला खासगी केंद्र
परीक्षार्थींना व��नंती !
बृहन्मुंबई महानगर पालिका अभियंता परीक्षा २०२५
काल बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी दरम्यान आपण अत्यंत दूरावस्थेत असलेल्या खाजगी परीक्षा केंद्राचा मुद्दा मांडला होता.
सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपणांस परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या, “दुरावस्थेत” असलेल्या सर्व खाजगी परीक्षा केंद्राचे या सर्व केंद्रांचे फोटो व ठिकाण DM करावेत.
गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता “मराठी भाषा दिनानिमित्त” या सगळ्या दुरावस्थेतील परीक्षा केंद्रांचे फोटो काढून आयुक्त मा. भूषण गागरणी आणि सहकाऱ्यांना रंगीत फोटो अल्बम बनवून भेट देता येईल.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan @AAPMaharashtra
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC #AAP #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only #TCS #MCGM #Exams
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 च्या भरतीसाठी पाठवलेल्या जागा 2025 मध्ये वर्ग का केल्या?
धक्कादायक प्रकार:
▪️ १७ फेब्रुवारीला #MPSC च्या E-news letter मध्ये MES 2024 साठीच्या जागांचा उल्लेख
▪️ १८ फेब्रुवारीलाच त्या जागा MES 2025 साठी वर्ग केल्या!
हे सरकारच्या भरती लुटीचे स्पष्ट उदाहरण नाही का?
▪️ विद्यार्थ्यांना फसवण्याचा हा प्रकार सातत्याने सुरू आहे.
▪️ यामागे कुठली लॉबी कार्यरत आहे, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे!
#MPSC #MES2024
@Dev_Fadnavis
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे.
जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणत्याही नियमावलीचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
@Dev_Fadnavis
१७ फेब्रुवारी रोजी #MPSC Enews latter मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या #MES २०२४ साठीच्या जागा एका दिवसात म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी #MES २०२५ साठी जातात अश्या प्रकारच्या ��टनांमुळे MPSC आयोगाच्या विश्वसहर्तेवर प्रश्न निर्माण होतो
@BaliramDoleyINC
@Dhananjay_AAP @Dev_Fadnavis