Predict Abhishek Sharma runs against New Zealand in 2nd T20i. The correct one will get ₹4444 paytm.
[Note : Must Like, Retweet & follow Me and @Rahulify1]
एक उमेदवार किती आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो?
आधी OBC NTB DTA SBC मध्ये असणारे उमेदवार आता EWS कटऑफ पाहून EWS मध्ये येत आहेत हे उचित आहे का? शासनाने यावर उत्तर दिले पाहिजे. अन्य जात प्रमाणपत्र धारक लोकांना EWS कस मिळत आहे याच उत्तर प्रमाणपत्र देणारे अधिकारी देऊ शकतात. @CMOMaharashtra
प्रबोधनाला कृतीची जोड देऊन राष्ट्रसंत भगवान बाबांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. अंधश्रद्धा, विज्ञान, भक्तिमार्ग यासारख्या विषयांवर अध्यात्मातून जनजागृती केली. डोंगरदऱ्यातील लोकांमध्ये वारकरी सांप्रदायाचे विचार रुजवून त्यांनी अनेकांच्या जीवनाला दिशा दिली. बाबांनी दाखवलेल्या भक्तीमार्गामुळे समाजात आजही अध्यात्माची गोडी दिवसेंदिवस वाढत आहे.
आज बाबांच्या पुण्यतिथी दिनी त्यांचे कार्य, विचार आणि शिकवणीचे स्मरण करताना त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प अधिक दृढ होतो आहे. श्रद्धेय भगवान बाबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!
#भगवानबाबा #पुण्यतिथी #जय_भगवान #BhagwanBaba #राष्ट्रसंत
#PSI वयोमर्यादेसाठी विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत, वेळ कमी असल्याने काल पासून विद्यार्थ्यी पोटतिडीकेने जीआर साठी मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्र्यांना त्यांचा आवाज अजिबात ऐकायचा नाही अशी स्थिती असल्याचे दिसत आहे.
काल एकीकडे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई महापालिका निवडणुकीसाठी PR करण्यामध्ये मध्ये मग्न होते. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधी उधळायला सरकारकडे वेळ आहे, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्याकडे कसालीही सवड नाही !
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#PSIवयवाढ
#MPSC
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
MPSC च्या विद्यार्थ्यांना वेठीस धरणे @Dev_Fadnavis यांना महागात पडेल. उद्याची परीक्षा पुढे ढकलून सगळ्यांना संधी द्या!
आचारसंहितेचे कारण सांगू नका, लाडली बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीत टाकता हा भंग नाही का? हिंदू महापौर झाला पाहिजेम्हणता ही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही का?
विद्यार्थी मानसिक तणावात आहेत, त्यांच्या जीवितास काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील!
ऑल इंडिया पँथर सेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. निगरगट्ट सरकारचा निषेध करतो!
@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#MPSCआंदोलन
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” हे विधान म्हणजे संधीसाधू “फडणवीस पवार शिंदे” सरकारचा उद्धट अहंकार, प्रशासकीय अपयश आणि विद्यार्थ्यांविषयीचा तिरस्कार उघड करणारे आहे. हे उत्तर नाही तर ही राज्यातील अन्यायग्रस्त परीक्षार्थींच्या थेट मानसिक छळाची कबुली आहे.
आमचे सवाल टाळू नका, उत्तर द्या :
🔥 १५–२० दिवस परीक्षा पुढे ढकलली तर ३ लाखांचे नुकसान होते, पण MPSC २–२ वर्षे निकाल लटकवते तेव्हा नुकसान होत नाही?
🔥 जाहिरात ७ महिने उशिरा काढणे तुमची चूक, आणि शिक्षा विद्यार्थ्यांना? ही कसली मस्ती?
🔥 ज्यांचे वय संपले, त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार - त्यापेक्षा इतरांचे १५ दिवस मोठे?
🔥 तुटपुंज्या जागा, शून्य नियोजन, शून्य जबाबदारी-तरीही सरकार येवढ्या माजात?
अन्याय सहन करणे नव्हे, त्याविरुद्ध उभे राहणे हाच न्याय असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाय देणारा सत्तेचा अहंकार तुम्हाला भोवणार आहे हे नक्की!
जाहीर निषेध!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@prithvrj@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#MPSC #PuneProtest #MPSC_Postpone #StopMentalTorture
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
#JusticeForMPSCStudent
मा. मुख्यमंत्री महोदय,
एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको!
लवकर निर्णय घ्या!
गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता.
आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार!
मग प्रश्न असा आहे👇
👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं?
STI Open – 0 जागा
ASO Open – 1 जागा
SR – 0 जागा
ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ?
🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा
🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या
🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या
इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे!
सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती
१) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?”
➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे!
➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही,
उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल!
२) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही”
➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली?
➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला?
➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती?
जर खरंच आचारसंहिता अडचण आहे,
➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या!
आमचे थेट सवाल 🔥
1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल?
— उलट सर्वांना समान संधी मिळेल!
2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का?
3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची?
मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?
4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे —
त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस?
5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती…
तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट?
“१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही”
➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे!
“अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून,
अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.”
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल!
आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत!
#StudentJustice
#MPSC_अन्याय
#LinkOpenKara
#ExamPostponeKara
#विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय
@Dev_Fadnavis
ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी एक वर्ष वय सवलत देण्यात यावी,या मागणीसाठी सातारा येथे विद्यार्थ्यांनी आज भेट घेतली.
यावेळी जितेंद्र साळुंखे,शुभम राऊत,अनिकेत उंबरे,चक्रधर पडवळ, विक्रम गायकवाड,प्रशांत यादव,नैतिक इंगवले,रोहित पडवळ या विद्यार्थ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्वरित मा.मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एक वर्ष वय सवलत देण्याची विनंती केली.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@supriya_sule जी पावले अभ्यासिका कडे जायला हवी ती रस्त्यावर जात आहे, 7 महिने जाहिरात उशिरा आली,चूक प्रशासनची झाली मग शिक्षा विद्यार्थ्यांना का? विद्यार्थी हक्क मागत आहे भीक नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पुर्व परीक्षा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीस जवळपास सात महिने उशीर झाला. यामुळे अनेक उमेदवार वयाच्या अटीत बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षी जाहिरात उशीरा आल्यामुळे शासनाने वयात सवलत दिल्याचे जाहिर केले होते. हे लक्षात घेता सदर परीक्षेसाठी वयात सवलत द्यावी किंवा वय मर्यादा कालावधी १ जानेवारी २०२५ हा गृहीत धरावा अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे. या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन देखील करीत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी रास्त असून मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन वयोमर्यादेसंदर्भात निर्णय जाहिर करावा जेणेकरून अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा देता येईल, अशी आमची मागणी आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis