वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी कधीही सरकार विरोधात भूमिका घेतली नाही. मंत्र्यांविरोधात भूमिका घेतली नाही. कारण न्याय मिळेल ही आशा आम्हाला होती. पण जर आता असा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असेल, तर काळजावर दगड ठेवून सरकार विरोधात भूमिका घ्यावी लागेल...
#JusticeForCommerce
साहेब, आपल्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला "मी वाणिज्य विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही" हे शब्द कानात घुमत आहेत. पण काल जाहीर झालेल्या RR मध्ये वाणिज्य शाखेला भोपळा मिळणे, हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. विश्वास तुटलाय, पण आजही न्यायाची अपेक्षा तुमच्याकडूनच
@Ashishjaisw3Adv
@ShahsikantL वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा हा केवळ रोजगाराचा प्रश्न नाही, तर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. Commerce क्षेत्रातील पदांसाठी Commerce विद्यार्थ्यांनाच न्याय्य संधी मिळाली पाहिजे. स्वतंत्र Commerce Cadre ही काळाची गरज आहे!
@ShahsikantL@Ashishjaisw3Adv वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा हा केवळ रोजगाराचा प्रश्न नाही, तर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. Commerce क्षेत्रातील पदांसाठी Commerce विद्यार्थ्यांनाच न्याय्य संधी मिळाली पाहिजे. स्वतंत्र Commerce Cadre ही काळाची गरज आहे!
@Ashishjaisw3Adv लेखा व लेखापरीक्षण ही केवळ कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया नाही; ती शासनाच्या आर्थिक शिस्तीची कणा आहे.
जे विद्यार्थी पदवीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अकाउंटिंग, ऑडिटिंग, कॉस्टिंग आणि टॅक्सेशनचा अभ्यास करतात, त्यांना बाजूला सारून "कोणतीही पदवी"
#AuditMatters#CommerceGraduates
आज वित्त व लेखा सेवेतील भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसमवेत व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मागण्या, सूचना आणि भूमिका यावेळी समजून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा सखोल, वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अभ्यास करून कारणमीमांसेसह सुधारित अहवाल सादर करण्याचे संबंधित समितीला निर्देश दिले. निर्णय प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच कोणत्याही विद्यार्थी घटकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगितले.
सर्व संबंधित घटकांच्या सूचना, मते आणि वस्तुनिष्ठ बाबींचा संतुलित विचार करून पारदर्शक, न्याय्य आणि व्यापक हिताचा निर्णय घेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी वित्त व लेखा सेवेतील काही पदांमध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते व्यवहार्य पर्याय अवलंबता येतील, याचा सविस्तर अभ्यास करून अभिप्राय सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण प्रशासन आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया यांचा समतोल साधत सर्व संबंधितांना न्याय मिळेल, यासाठी शासन कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सूचनेचा योग्य सन्मान राखत पुढील निर्णय प्रक्रिया राबविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
1/3
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील गट अ पासून गट क पर्यंतच्या सर्व पदांना अकाउंटिंग, ऑडिटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, पब्लिक फायनान्स या विषयांची गरज असतेच! तरीही कॉमर्स पात्रता बदलून अन्य पदवीसाठी खुली करण्याचा अन्यायकारक निर्णय कोणाचे हित साधण्यासाठी घेण्यात आलेला आहे?@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra Justice delayed is justice denied!
वित्त व लेखासाठी असलेल्या पदांची पात्रता एनी ग्रॅज्युएट करण्याचा डाव शासनातील काही विभागांनी मांडला आहे. त्याला वेगवेगळ्या लॉबींचे आर्थिक पाठबळ आहे! आता शासन त्या आर्थिक ताकदीपुढे झुकते, की कॉमर्स शाखेला न्याय देते, हे येत्या काळात कळेलच!! 1/2
काल पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी राज्यव्यापी शिष्टमंडळाच्या माध्यमातून ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतानाच विद्यार्थ्यांच्या नव्याने समोर येणाऱ्या अडचणी आणि प्रश्नही साहेबांसमोर मांडले. यामध्ये Descriptive, Objective आणि Hybrid या तिन्ही परीक्षा पद्धतींचे पर्याय, तसेच Commerce Cadre आणि Engineering Cadre मधील प्रश्नांवरही चर्चा झाली.
या भेटीदरम्यान एक गोष्ट विशेष भावली. साहेबांनी स्वतःहून हाक मारत विचारलं, "ये निखिल, काय म्हणतोस? काय समस्या घेऊन आला आहेस?" मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आस्थेने विचारपूस करणं, ही माझ्यासाठी समाधानाची बाब होती. आगामी काळात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवूनच शासन निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी दिला.
माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण वर्षानुवर्षे मेहनत घेत आहेत. घरच्या परिस्थितीशी संघर्ष करत, अनेक अपयश पचवत केवळ एका संधीच्या आशेने अभ्यास करत आहेत. तुमच्या या मेहनतीची आणि स्वप्नांची जाणीव ठेवूनच मी सातत्याने तुमचे प्रश्न शासनदरबारी मांडत आलो आहे. तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणं असो किंवा त्यावर निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करणं असो, मी तुमच्यासोबत होतो, आहे आणि राहणार आहे.
माझ्याबद्दल वेगवेगळे फेक नॅरेटिव्ह पसरवून संभ्रम निर्माण करण्याचे आणि प्रत्यक्ष कामापेक्षा श्रेय घेण्याचे प्रयत्न होत आहेत. पण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सुज्ञ आहेत. कोण प्रत्यक्ष मैदानात उतरून लढतंय आणि कोण केवळ श्रेयासाठी पुढे येतंय, हे त्यांना चांगलंच कळतं. त्यामुळे अशा प्रयत्नांना विद्यार्थी कधीही थारा देणार नाहीत, हा माझा विश्वास आहे.
मला कोणत्याही कामाचं वैयक्तिक श्रेय नको; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा, एवढीच अपेक्षा आहे.
तुमचा विश्वास हीच माझी ताकद आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा हीच माझी जबाबदारी आहे.!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
@Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office कॉमर्स कॅडरच्या न्याय्य मागणीसाठी सातत्याने आवाज उठवणारे आणि या लढ्याला दिशा देणारे श्री. निखिल पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! 💐
आपल्या या संघर्षाला यश मिळो आणि कॉमर्स कॅडरची मागणी शासनदरबारी मान्य होवो, हीच सदिच्छा!
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐✊