It appears that the train is used for animals.train no.22156
Please ensure basic cleanliness
at least. Utterly disgusting .
Dust,mud on the seats.
@Central_Railway@DRMSolapur@AshwiniVaishnaw@gm
It appears that the train is used for animals.train no.22156
Please ensure basic cleanliness
at least. Utterly disgusting .
Dust,mud on the seats.
@Central_Railway@DRMSolapur@AshwiniVaishnaw@gm
@DRMSolapur@Central_Railway@AshwiniVaishnaw
22156 kolhapur to Kalburgi
Filthy and mudy ac coaches in AC tier3 what a disgusting way by railway to treat passengers
Mudy and filthy ac coaches please look into issue
@DRMSolapur@Central_Railway@AshwiniVaishnaw
22156 kolhapur to Kalburgi
Filthy and mudy ac coaches in AC tier3 what a disgusting way by railway to treat passengers
Mudy and filthy ac coaches please look into issue
शासकीय सेवेत असताना आंदोलनाचा प्रचार आणि Objective पॅटर्नची उघड बाजू घेणे योग्य आहे का?
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ व Social Media Guidelines अंतर्गत याची चौकशी होणार का?
@MahaDGIPR@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ प्रश्नांची म्हणजेच Objective questionsची परीक्षा पद्धती का सदोष आहे, त्यातून कसे घोळ होतात?, हा विषय पुढे आणलाय. या संदर्भात MPSC आयोगाने सुधारणा करण्याची मागणी केलीय. @mpsc_office@Mpsc_Andolan
1.) राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न हा वर्णनात्मकच. (Descriptive) कायम ठेवावा.
समितीने पूर्ण भारतभर असलेले इतर राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा पद्धतीचा अभ्यास करून ,त्या धरतीवर महाराष्ट्राला अधिक सक्षम अधिकारी भेटावे करिता हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला होता
तज्ज्ञ समितीने निश्चित केलेला अभ्यासक्रम व परीक्षा-पॅटर्न ही अंतिम व बंधनकारक बाब असावी. रस्त्यावरील आंदोलन अथवा तत्कालिक दबावाखाली आयोगाने निर्णय बदलणे उचित नाही.
2.) आयोगाची परीक्षा पद्धत विद्यार्थी आंदोलनांच्या दबावाखाली बदलली जाणे ही एका घटनात्मक स्वायत्त संस्थेच्या विश्वासार्हतेलाच सुरुंग लावणारी बाब आहे. रस्त्यावरील दबावाखाली धोरण ठरणे, हे सुशासनाचे लक्षण नव्हे.
2025 नंतर हजारो विद्यार्थी वर्णनात्मक पॅटर्ननुसार अभ्यास करत आहेत कुठलाही बदल त्यांच्यावर अन्याय करणारा राहील.
आयोगाने कुठल्याही एखाद्या विद्यार्थी गटाच्या दबावांमध्ये येऊन पॅटर्न बदलणे उचित नाही
3.) आज पुन्हा वर्णनात्मक ऐवजी वस्तुनिष्ठ (Objective) पॅटर्न आणण्याची मागणी होत आहे . हा प्रश्न "सोयीचा" नसून "गुणवत्तेचा" आहे. आयोगाने ठरवायचे आहे की सक्षम प्रशासकीय अधिकारी घडवायचे आहेत, की केवळ परीक्षा पार करणारे उमेदवार निवडायचे आहेत?
आजची मागणी मान्य केल्यास उद्या दुसरा गट थेट परीक्षा रद्द करण्याचीही मागणी करू शकतो तेव्हाही आयोग तेच ऐकणार का? ही घसरण कुठेतरी, आणि आजच, थांबवावी लागेल.
पुढील दशकात महाराष्ट्राला मिळणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुणवत्ता थेट धोक्यात येईल आणि त्याचे परिणाम शेवटी सर्वसामान्य जनतेलाच भोगावे लागतील.
विद्यार्थी संघटना नेहमीच सुलभ परीक्षा-पद्धतीची मागणी करत राहतील पण तोच निर्णयाचा आधार असू शकत नाही.
4.) वर्णनात्मक पॅटर्नची गुणवत्तात्मक आवश्यकता :
लेखन-कौशल्य वस्तुनिष्ठ (MCQ) परीक्षेतून तपासताच येत नाही; ते फक्त वर्णनात्मक परीक्षेतूनच तपासले जाते. नीतिशास्त्र, सचोटी व कठीण प्रशासकीय पेचप्रसंगांतील नैतिक निर्णयक्षमता फक्त वर्णनातूनच मोजता येते.
राष्ट्रीय स्तरावर दशकानुदशके सिद्ध झालेले मॉडेल हेच आहे .
UPSC आणि इतर राज्याचे लोकसेवा आयोग मध्येही पूर्व परीक्षा (Prelims) फक्त चाळणीसाठी वस्तुनिष्ठ आहे, तर अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षा (Mains) पूर्णतः वर्णनात्मकच आहे. महाराष्ट्राने वर्णनात्मक पॅटर्न कायम ठेवणे हे देशातील सर्वोच्च व सर्वाधिक विश्वासार्ह निवड-यंत्रणेचेच अनुसरण आहे.
5.) महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या UPSC यशाबाबत डांगे समितीसंदर्भात
आम्हाला असे निदर्शनास आले आहे की मा. मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा UPSC परीक्षेतील यशाचा टक्का कसा वाढवता येईल, यासाठी स्वतंत्र "डांगे समिती" नेमली आहे. या संदर्भात आमचे असे निवेदन आहे की, सन 2025 पर्यंत MPSC राज्यसेवा (वस्तुनिष्ठ) व UPSC (वर्णनात्मक) यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करणे अवघड जात होते. आता वर्णनात्मक पॅटर्न लागू झाल्याने MPSC व UPSC च्या अभ्यासक्रमात व लेखन-कौशल्याच्या मागणीत बरेच साम्य निर्माण झाले आहे यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना UPSC मध्येही यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. वर्णनात्मक पॅटर्न रद्द करून पुन्हा वस्तुनिष्ठ पॅटर्नकडे गेल्यास, हा नुकताच निर्माण झालेला समन्वयही मोडून पडेल आणि डांगे समितीच्या मूळ उद्दिष्टालाही बाधा पोहोचेल.
तज्ज्ञ समितीने निश्चित केलेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न कोणत्याही रस्त्यावरील दबावाखाली न बदलता, जसाच्या तसा कायम ठेवावा.
गेल्या दोन वर्षांपासून (2025-26) याच वर्णनात्मक पॅटर्ननुसार तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर पॅटर्न बदलामुळे अन्याय होणार नाही, यासाठी आपल्याला लढायचं आहे.
@Nikhil_A_Patil ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या एक ते दोन वर्षांपासून वर्णनात्मक पध्दतीने अभ्यास केलाआहे,त्यांनी काय करायचं,अगोदर एक ते दोन वर्षे आणि परत पुढे एक ते दोन वर्षे,कारण objective आणि descriptive चा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे,याचा पण विचार कराobjective करायच असेल तर दोन वर्षे नंतर करा,
@RRPSpeaks@RRPSpeaks मुलाखतीची तयारी करणाऱ्या ४३८ उमेदवारांच्या मानसिक त्रासाचाही विचार व्हावा. वर्षांनुवर्षांची मेहनत, कुटुंबाचे त्याग आणि मुख्य परीक्षा पार केल्यानंतर हा टप्पा गाठला आहे. मुलाखतीच्या उंबरठ्यावर असताना अशी अनिश्चितता निर्माण झाल्याने खूप मोठं खच्चीकरण होतंय.@Dev_Fadnavis
@RRPSpeaks काही उत्तरपत्रिकांबाबत निर्माण तक्रारींचा परिणाम म्हणून संपूर्ण भरती प्रक्रिया स्थगित करू नये हा मुलाखतीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल ज्या विद्यार्थ्यांना शंका आहे त्यांचे निरसन करून मुलाखती नियोजित वेळेनुसार सुरू करण्यात याव्यात.🙏
@CMOMaharashtra@mpsc_office
@RRPSpeaks “जर आयोगाने घोषित केलेल्या निकालाच्या आधारे interview प्रक्रिया सुरू केली असेल, तर केवळ अप्रमाणित आरोपांवर ती थांबविणे म्हणजे आधीच पात्र ठरलेल्या उमेदवारांवर प्रतिकूल परिणाम करणे होईल.”
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत आयोगाकडून मानवी चुका झाल्याचे पुरावे समोर आले होते. हे पुरावे आम्ही आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा Revaluation + Retotaling ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका होती.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मात्र संपूर्ण मुख्य परीक्षेचाच निकाल रद्द करून सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करावं, अशी अव्यवहार्य मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही ती मान्य केली. त्यामुळं या प्रक्रियेला पुन्हा किमान पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शिवाय आधीच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सुमारे ४३८ विद्यार्थ्यांचं भवितव्यही अधांतरी असून याबाबत ते कोर्टातही जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचं Revaluation+Retotaling करून यातून जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांना अगोदरच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४३८ मुलांसोबत मुलाखतीची संधी उपलब्ध करून देणं हाच पर्याय योग्य आहे. अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #JusticeForStudents #StudentsFirst
उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन हे पूर्णतः नियमबाह्य आहे,तरी मा. आयोगाने पुर्नमूल्यांकन न करता व निकाल रद्द न करता मुलाखत कार्यक्रम नियोजित वेळेत घेऊन उत्तीर्ण उमेदवारांना न्याय द्यावा ही कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@mpsc_office