📌 हिटलर ज्यावेळी जर्मनीचा हुकुमशहा होता त्यावेळची ही एक खूप अर्थपूर्ण एक कविता आहे.
👉 लोकशाहीची "जाणीव " असणाऱ्या सर्वांना वरील कवितेचा अर्थ नक्की समजेल....!!
#Democracy#constitution
लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तांत्रिक प्रयोग करू नका!
CBT (Computer Based Test) पद्धत आणि वर्षातून अनेक वेळा पूर्व परीक्षा घेण्यासंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, तज्ज्ञ, प्रशिक्षण संस्था आणि संबंधित भागधारकांशी व्यापक सार्वजनिक सल्लामसलत करणे अत्यावश्यक आहे.
आजही महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण व आदिवासी भागात संगणक सुविधा, इंटरनेट, वीजपुरवठा आणि दर्जेदार परीक्षा केंद्रांची गंभीर कमतरता आहे. अशा परिस्थितीत घाईघाईने CBT लागू करणे म्हणजे हजारो गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय ठरू शकतो.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पेपरफुटी थांबविण्यात अपयशी ठरलेली व्यवस्था आता CBT प्रणालीमध्ये सायबर सुरक्षा, डेटा सुरक्षा, सर्व्हर हॅकिंग, प्रश्नपत्रिका एन्क्रिप्शन आणि परीक्षा केंद्रांची विश्वसनीयता कशी सुनिश्चित करणार?
MPSC ने प्रथम स्पष्ट करावे:
▪️ राज्यभर समान दर्जाची CBT परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत का?
▪️ स्वतंत्र सायबर सुरक्षा ऑडिट होणार का?
▪️ Mock Tests आणि संक्रमण कालावधी दिला जाणार का?
▪️ विद्यार्थ्यांच्या हरकती व सूचनांसाठी अधिकृत सार्वजनिक चर्चा आयोजित केली जाणार का?
सुधारणा हव्यात, पण त्या पारदर्शक, सर्वसमावेशक आणि विद्यार्थीहिताच्या असल्या पाहिजेत. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग करून नव्हे, तर विश्वास निर्माण करूनच परीक्षा पद्धतीत बदल व्हायला हवा.
@bhimanwar@INCHarshsapkal@degree_holders@Mpsc_Andolan@PunyachiMPSC@FutureMpsc12
#DhananjayShinde #Dhananjay_Shinde
#MPSC #CBT #CompetitiveExams #StudentsFirst #maharashtranewsnetwork
▪️CBT घेतली, तर 21 दिवसांत निकाल लागेल. असे सांगितले जात आहे.
▪️तलाठी भरती 2023 परीक्षासाठी रोज 3 शिफ्ट मध्ये असे 19 दिवस लागलेले.
▪️तदनंतर Normalization च्या खेळात बऱ्याच उमेदवारांच्या कष्टाची माती झाली.
(यंदा राज्यसेवेचा निकाल CBT शिवाय 22 दिवसांत आयोगानेच लावला आहे.)
लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तांत्रिक प्रयोग मान्य नाहीत!
आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) मा. अध्यक्ष यांना ऑनलाइन (CBT) परीक्षा पद्धती आणि Normalization लागू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन सादर केले.
गेल्या काही वर्षांत देशभरातील अनेक ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटी, सर्व्हर फेल्युअर, तांत्रिक बिघाड, सायबर सुरक्षेचे प्रश्न आणि परीक्षा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रयोग करणे योग्य ठरणार नाही.
MPSC ने अनेक दशकांपासून निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रिया उभी केली आहे. हा विश्वास कायम राहणे कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
आमच्या प्रमुख मागण्या :
१. CBT परीक्षा पद्धतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
२. Normalization पद्धत रद्द करण्यात यावी.
३. सर्व MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्यात याव्यात.
४. परीक्षा पद्धतीत बदल करण्यापूर्वी विद्यार्थी संघटना, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करण्यात यावी.
लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य हे कोणत्याही तांत्रिक प्रयोगाची प्रयोगशाळा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, पारदर्शक प्रक्रिया आणि गुणवत्तेवर आधारित न्याय्य स्पर्धेचा अधिकार आहे.
सदर निवेदनाची प्रत जोडलेली आहे.
@mpsc_office@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@Dev_Fadnavis
#MPSC #StudentsFirst #CBT #Normalization #CompetitiveExams #Maharashtra #Transparency #JusticeForStudents #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
MPSC म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयोगशाळा आहे का?
कधी अभ्यासक्रम बदल, कधी Optional विषय सुरू करून पुन्हा बंद, आता अचानक Online परीक्षा आणि त्यातही अन्यायकारक Normalization पद्धत!
MPSC सारख्या स्वायत्त संस्थेला महाराष्ट्रात एक साधी ऑफलाईन परीक्षा सुद्धा पारदर्शकपणे घेता येत नसेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
विद्यार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून, वर्षानुवर्षे कष्ट करून तयारी करायची आणि आयोगाने एका निर्णयाने त्यावर पाणी फेरायचं? विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोण घेणार?
MPSC ने गट 'क' ऑनलाइन परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यायकारक Normalization पद्धत रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबवावा. नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan
#MPSC #GroupC #OfflineExam #Normalization #MPSCStudents
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
@mpsc_office आयोग आमचा विद्यार्थ्यांचं अस झालंय-
"सासुमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली"
Online परीक्षा नको म्हणून Mpsc कडे गेलो आणि @mpsc_office ने परीक्षा online केली. 😢😢😢
@Mpsc_Andolan@PunyachiMPSC
@mpsc_office आयोगराव तुम्ही फास्ट निकाल लावून सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. सगळे विद्यार्थी तुमच्या बदलेल्या पद्धतीच्या प्रेमात पडले होते.
आज online एक्साम घेण्याचा ठरवून तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्यासारखं केलं आहे. Online exam मध्ये किती घोळ आहे हे सगळ्यांना माहीत आहे,तरी सुद्धा का असे?
२-५ हजाराचं पाकीट घेऊन मतदान करणारे पक्ष सोडून गेलेल्या खासदारांना गद्दार बोलतायत … 😅
पैशांवरून टोमणे देतायत …
गरीब घरातली पोरं उभी राहिली की
ती तर नको असतात …
ताई दादा किंवा देशमुख पवार ठाकरे शिंदे यांच्याच पोरांनी घरातल्यांनी राजकारण कायम करायचं…
चांगली पद.. सत्ता कायम उपभोगायची…
आणि आता त्यांनी तुम्हाला विश्वासात न घेता पक्ष बदलला तर राग येतो ???
वर्षानुवर्षे तेच चेहरे तेच नेते …
राज्याचा राजकारणाचा चिखल पाहून आता कशाला वाईट वाटलं पाहिजे …
हेच वाईट हेच नेते इतर पक्षात गेल्यावर निवडून देताना वाटलं पाहिजे …
शेवटी लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे नेते मिळतात, हेच खरं आहे … !!!
#महाराष्ट्र #राजकारण