ऑगस्ट २०२७ नंतर MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला नाही आणि २०२६ मध्ये ७०,००० पदांच्या जाहिराती काढण्याचे आश्वासनही सरकारने पूर्ण केले नाही, तर काँग्रेस पक्ष राज्यभर मोठे जनआंदोलन उभारून विद्यार्थ्यांच्या आणि बेरोजगार युवकांच्या हिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडेल.
राज्यातील लाखो परीक्षार्थीना "न्याय" मिळवून देण्यास काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@CongressRojgar@INCMaharashtra
#पदभरती #MPSC #MPSC_Offline
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात असून त्यांच्या अभ्यासाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून MPSC च्या परीक्षा पद्धती, ऑनलाइन (CBT), ऑफलाइन (OMR), नॉर्मलायझेशन, अभ्यासक्रम आणि परीक्षा प्रक्रियेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत सरळसेवा परीक्षांची निश्चित परीक्षा योजना जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
परीक्षेची पद्धत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांचे वितरण, विषय, परीक्षा प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बाबी स्पष्ट नसताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या पद्धतीने तयारी करावी, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. हजारो विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यास करत आहेत. अनेकांनी नोकरी, व्यवसाय आणि इतर संधी बाजूला ठेवून आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिली आहेत. त्यामुळे आयोगाकडून होणारा प्रत्येक विलंब त्यांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा ठरत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सातत्याने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घेतली आहे. MPSC च्या सर्व परीक्षा पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या पद्धतीने होणे हीच आमची भूमिका आहे. त्याच अनुषंगाने सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना देखील कोणताही विलंब न करता तात्काळ जाहीर करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.
आयोगाने परीक्षा योजना जाहीर करताना विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांकन पद्धती, परीक्षा दिनदर्शिका आणि पुढील भरती प्रक्रियेबाबत स्पष्ट, सविस्तर आणि अधिकृत माहिती एकाच वेळी जाहीर करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करून अभ्यास करता येईल.
विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा अमूल्य आहे. त्यांचा संयम पाहण्यापेक्षा त्यांच्या भविष्याचा विचार करणे ही आयोगाची जबाबदारी आहे.
म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमचे स्पष्ट आवाहन आहे.
1. सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना तात्काळ जाहीर करा.
2. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयांमध्ये अनिश्चितता आणि विलंब टाळा.
3. हजारो विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
4. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ न करता, पारदर्शकता आणि वेळबद्धतेचे तत्त्व स्वीकारून त्वरित निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा विश्वास कायम राहिला पाहिजे आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह झाली पाहिजे, हीच अपेक्षा.
@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@bhimanwar@CongressRojgar
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
MPSC विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा लढा आजपासून निर्णायक टप्प्यात! ✊
आज दुपारी १२ वाजता सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने CBT परीक्षा पद्धती व Normalization विरोधात बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाची यशस्वी सुरुवात झाली.
या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेले स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा केवळ एका पक्षाचा नव्हे, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि न्यायाचा लढा आहे.
आमची स्पष्ट मागणी:
✅ MPSC ने CBT व Normalization लागू करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
✅ विद्यार्थ्यांशी व त्यांच्या प्रतिनिधींशी खुली चर्चा करावी.
✅ पारदर्शक, न्याय्य आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारी परीक्षा पद्धती कायम ठेवावी.
मागण्या मान्य होईपर्यंत हे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच राहील.
महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला आवाहन—हा तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. या न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हा, आवाज बुलंद करा आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra
#MPSC #CBT #Normalization #StudentsFirst #JusticeForStudents #Maharashtra #Congress #MPSCStudents
एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेऊ नये अशी आग्रही मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केल्याबाबत आणि चिखली तहसीलमध्ये नायब तहसीलदारांची पदे तातडीने भरावी यासाठी मा. महसूलमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित करणारी दैनिके व पत्रकार बांधवांचे हार्दिक आभार!
#MPSC #OnlineExam #ChikhliTahsil #NayabTehsildar #ShwetaMahalePatil
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
@My_MBMC सदर पदभरती आमदार @iNarendraMehta यांच्या मागणीनुसार स्थगिती दिली मग ज्या सामान्य लोकांनी यांना निवडून दिले त्या बेरोजगार मुलांच्या मागणीचे काय? कंत्राटी लोकांना नक्की कोण आश्रय देतय? तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@JadhavMns
राज्यातील आरोग्य विभागात हजारो पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने सार्वजनिक आरोग्यव्यवस्था ढासळत आहे. रुग्णालयांत कर्मचारीअभावाची तीव्र तक्रार आहे, तर दुसरीकडे हजारो सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आणि आरोग्यमंत्री @abitkar_prakash यांनी तातडीने आरोग्य भरती प्रक्रिया पूर्ण करून राज्याच्या आरोग्य यंत्रणेला बळ द्यावे आणि बेरोजगारांना न्याय द्यावा, ही विनंती !
@INCHarshsapkal@INCMaharashtra
#आरोग्यभरती_लवकरात_लवकर
#ArogyaBharti
#महाराष्ट्रसरकार
#रोजगार
#आरोग्यसेवा
#Maharashtra
"मिनी मंत्रालय" मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची संख्या जवळपास पन्नास हजारांच्या आसपास आहे परंतु रिक्त पदे भरण्याच्या बाबत ग्रामविकास विभाग गंभीर नाही असे दिसते.
@Jaykumar_Gore@CMOMaharashtra
काल #TAIT चा निकाल लागला आणि यात प्रचंड घोटाळे झालेत. हे सरकार एकही परीक्षा पारदर्शक घेऊ शकत नाही. यांना परीक्षा घेण्याची ताकदच नाही! सगळीकडे बोगसगिरी सुरू आहे.
ज्यांनी दिवस-रात्र घाम गाळून अभ्यास केला ते आजही बेरोजगार आहेत. आणि ज्यांनी पैसे भरलेत ते आज सरकारी नोकरीत बसलेत. हा उघडपणे चाललेला अन्याय आहे. महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळण्याचं धाडस या सरकारला कोणी दिलं?
फडणवीस, शिंदे, पवार – सगळे उघड्या डोळ्याने हा प्रकार पाहतायत. म्हणजे या भ्रष्ट व्यवस्थेला त्यांचा पाठिंबाच आहे. गृहमंत्री फक्त नावालाच आहेत, त्यांच्या कारभारात कणभरही ताकद नाही. निष्क्रियतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचं सरकार!
जोपर्यंत परीक्षा MPSC कडे जात नाहीत तोपर्यंत असे घोटाळे थांबणार नाहीत. सरकारचा चेहरा उघडा पाडण्यासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही!
#TAITघोटाळा #MPSC #विद्यार्थीअन्याय #Maharashtra
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@dadajibhuse@AjitPawarSpeaks@mieknathshinde