दिव्यात चार दिवसांपासून पाणी नाही.
MIDC ने शटडाऊन घेतल्यावर त्याला लागूनच नेहमी पाईप लाईन कशी फुटते ?
३ दिवसांत २ वेळा पाईपलाईन फुटली.
कृत्रिम पाणीटंचाई निर्माण व्हावी यासाठी जाणूनबुजून पाईपलाईन सोबत घातपात केला जातोय का याची चौकशी व्हायला हवी.
@TMCaTweetAway@rajupatilmanase
@cmo@ThaneCollector@TMCaTweetAway@rajupatilmanase आजची परिस्थिती पाहाता ठाणे दिवा प्रभाग समिती अंतर्गत शिळफाटा कल्याण रोड हायवे वर अस्या शेंकडों होर्डींग आहेत त्या अनाधिकृत व धोकादायक आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्या आगोदर या अनाधिकृत होंल्डीग वर कारवाई होणे गरजेचे आहे.
@TMCaTweetAway 2018 पासुनकाम सुरु केलेला शिळ-दिवा रस्ता यंदाचा पावसाला हि शिळ - दिवा रोड नागरीकांना त्रासदायक होणार सत्ताधाऱ्यांचे अस्वासन पावसाच्या पुरात वाहुन जाणार अधिकाऱरी फक्त टक्के वारीत वेस्त.या कडे जनतेचे @CMOMaharashtra@DrSEShinde च्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते
एकदा झाले,दोनदा झाले,असे जर वारंवार घडत असेल तर कुठेतरी शांतता भंग करावी लागते.
१० वेळा तिकीटे बुक केली का त्यातील ६ वेळ�� तिकीटे बुक होतात.उरलेल्या ४ वेळा आपण स्वत:च कारण देवून सर्वसामान्यांच्या कष्टाचे पैसे घेवून चुप्प बसता,हे कुठेतरी थांबलेच पाहीजे.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मंजूर झालेल्या विकास कामांचे आज स्थानिक नागरिकांच्या हस्ते भूमी��ूजन करण्यात आलं आहे.यामध्ये प्रामुख्याने कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक गांधी नगर मधील काँक्रीट रस्ते व गटारांची कामे तसेत या परिसरात असलेल्या बाल उद्यानातील खेळणी व सुशोभीकरणाच्या कामाच शुभारंभ करण्यात आलं आहे.प्रभाग क्रमांक ११२ मधील गटार व रस्ते काँक्रीट च्या कामाचा व डोंबिवली एमआयडीसी मधील धर्मवीर आनंद दिघे उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ देखील क���ण्यात आले. या कामांसाठी एकुण २ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रस्ते व गावांमधील पायाभूत सुविधांच्या मंजूर कामांचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. यामध्ये खिडकाळी,देसाई, मोठी देसाई, पडले गाव तसेच शिळ या गावांमध्ये २ कोटी ७५ लाखांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आल�� आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष श्री.योगेश पाटील,दिवा शहर अध्यक्ष श्री तुषार पाटील,शहर संघटक श्री.तकदीर काळण,विभाग अध्यक्ष श्री संतोष पाटील,शरद पाटील यांसह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ व पक्षातील पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
कल���याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात असलेक्या कोळे,घेसर,निळजे या गावांमधील विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. या कामांमध्ये प्रामुख्याने गावांमधील रस्ते काँक्रीटीकरन करणे त्यासोबत गटारांची कामांचा शुभारंभ करण्यात आल आहे. २ कोटी ५० लाख रुपयांचा मंजूर असलेला निधीतून आज गावागावातील मूलभूत आवश्यक कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे,मा.नगरसेवक श्री.प्रभाकर जाधव,जिल्हा उपाध्यक्ष श्री.योगेश पाटील,शहर संघटक श्री.तकदीर काळण, विभाग अध्यक्ष श्री.रोहित भोईर,श्री.संतोष पाटील, श्री.शरद पाटील माजी उपसरपंच श्री.काशिनाथ पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या मंजूर कामांचा काल शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये डोंबिवली मधील सुनील नगर, म्हात्रे नगर , आय���ेगाव गावदेवी मंदिर जवळील रस्ता, कोपर स्टेशन , आयरेगाव व्यायाम शाळा या ठिकाणच्या २ कोटी ९० लाखांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. आमदार निधीतून विकासकामांचा भुमिपुजन सोहळा डोंबिवलीतील नागरिक आणि पक्षातील माझ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दिवा स्टेशन, साबे रोडवर, मच्छी मार्केटला लागून असलेले महापालिकेचे शौचालय तयार असुनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नागरिकांची विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे.
२ दिवसांत शौचालय नागरिकांसाठी खुलं करा अन्यथा आम्ही ते नागरिकांसाठी खुलं करू
@TMCaTweetAway
@abhijitbangar
दिवा स्टेशनला बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक ��ोंडी होणे नित्याचे झाले आहे. कितीतरी वेळा पत्र दिली. पालिका आणि वाहतूक पोलीस यावर काही कारवाई करणार का ? किमान जे उपाय सुचवलेत त्यावर तरी अंमल करा..! तरी प्रश्न सुटेल.
@ThaneTraffic
@TMCaTweetAway
@ThaneCityPolice
@rajupatilmanase
शिळफाटा जंक्शन येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम, महापे रोड येथील जलवाहिनीचे काम आणि बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित कामामुळे मुंब्रा बायपास, शिळफाटा चौकात दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत पुढील दोन महिने अवजड वाहनांना दिवसा ही बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी योग्य जरी असली तरी प्रथम शिळफाटा जंक्शन येथील उड्डाण पुलाचे काम पुर्ण करून किमान ३ लेन ( शिळ-मुंब्रा दिशेने २ लेन व मुंब्रा-तळोजा दिशेची १ लेन ) चालू केल्याशिवाय बुलेट ट्रेनचे काम सुरू करू नये, अन्यथा प्रचंड वाहतूककोंडी होत राहील. सध्या लोकांना बुलेटट्रेन पेक्षा या वाहतुक कोंडीतून दिलासा हवाय, बुलेट ट्रेनचे काम दोन महिन्यांनंतर सुरू झाले तरी काही फरक पडणार नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@shambhurajdesai@MMRDAOfficial@ThaneCityPolice