या जगाला कोणती एक गोष्ट वाचवू शकत असेल तर ते फक्त एकच 'निस्वार्थ प्रेम'..
ज्या ज्या वेळी सगळं अस्ताला येईल त्या त्या वेळी 'प्रेम' हे दोनच शब्द नवीन अंकुर म्हणून उभं राहतील...
#सहजच
आपण फक्त दुर्घटना घडून गेल्यानंतर प्रतिक्रियात्मक, पोस्ट मॉर्टेम व घटनास्थळाला भेटी देण्याचे कर्तव्य पार पडणारा समाज झालोय. केवळ आपत्ती व्यवस्थापनच नव्हे तर आपत्तीप्रतिबंधक आराखडे तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत घटना घडणारच. आपण काय उंदरांचे जीवन जगायचे ?
महिला दिनाला शुभेच्छा देताना
ती आई आहे,बहीण आहे,बायको आहे असा उल्लेख केला जातो...
स्त्री ही नुसती स्त्री आहे..
कधी ती बायको-आई नसली तरी तिचं स्वतःच अस्तित्व आहे. नात्यांच्या त्या भूमिकेतून स्त्रीला बाहेर काढा..नुसतं तिला 'ती' म्हणून सन्मानाने जगू द्या... #महिलादिन
आंदोलन करणारा शेतकरी आज पाणी आणि इतर सुविधांसाठी झगडतोय... आंदोलन करणारा बळीराजा ‘आपलाच’ आहे... बोलुन आंदोलन थांबवता येईल... या असंतोषाचा परिणाम दूरगामी झाला तर येणारा काळ कठीण असेल... माणुसकीचा धर्म दोन्ही बाजुनं जपावा लागेल! बाकी चुक/बरोबर ‘काळच’ ठरवेल! #FarmersProtest
या कठीण काळात आपल्या बापाच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे... पाठीवर हात ठेवण्या इतके आपण मोठे नक्कीच नाही,
पण लढण्याचं बळ नक्कीच देऊ शकतो!
सरकारने खंबीरपणे पाठीशी उभं राहुन बळीराजाला सावरलं पाहिजे!
#ओला_दुष्काळ
#राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस एक सही तरीका हैं आंदोलन का। ये मनाने की नौबत क्यू आयी इसके बारे में नोएडा मीडिया सोच ले। फिर पता चलेगा के टीव्ही पर दिन रात कचरा दिखाके जो चीज वो दबाना चाहते हैं वो असल में इस देश का मुख्य मुद्दा हैं।
आपण हैदराबाद celebrate करतो, आपण हेही celebrate करणार, राज्यकर्त्यांनी पुरतं ओळखलं आहे आपल्याला. जय हो!
Something is seriously wrong with all of US! #Judiciary#Policing#Encounter
जर कधी एखादी गोष्ट फसली,चूकीची घडली तर आपण देवालाही प्रश्न विचारतो. त्याच्याकडे न्याय/जाब मागतो. मग नगरसेवक ते मुख्यमंत्री, पंतप्रधान अगदी राष्ट्रपतीना सूद्धा सन्मानानेच पण प्रश्न का नाही विचारायचे?! तो आपला हक्क आहे. ते तर देवही नाहीत. आपले प्रतिनिधी आहेत. हीच तर लोकशाही आहे.
20 जवान शहीद झालेत.
24 तास उलटून गेलेत.
अजूनही या शहीदांच्या बलिदानाबद्दल सरकारी वक्तव्य नाही. सगळं काही सोर्सेसच्या हवाल्यानं गुपचूप बाहेर आणलं जातंय.
शहीदांची नावं तरी देशाला सन्मानानं सांगा.
तुमच्या लपवाछपवीच्या राजकारणात त्यांच्या बलिदानाचा अपमान करु नका.
At least 20 Indian soldiers killed in the violent face-off with China in Galwan valley in Eastern Ladakh. Casualty numbers could rise: Government Sources
सकाळी टमरेल घेऊन सोबत जाण्यापासून ते संध्याकाळी पारावर गप्पा मारत एकमेकांचे सुख-दुःख जाणून घेणारी मैत्री या शहरीकरणाच्या आणि डिजिटलायझेशनच्या दुनियेत पुन्हा पाहायला मिळेल काय?