कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 संदर्भातील विद्यार्थ्यांच्या गंभीर तक्रारींची निष्पक्ष चौकशी होऊन सर्व उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी झाली पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भवितव्यावर कोणताही संशय राहता कामा नये. दोष असेल तर जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे आणि विद��यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
@INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @bhimanwar @Dev_Fadnavis
#MPSC_PAPER_CHECKING_घोळ
#MPSC
#RojgarNyay
🚨 MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या मूल्यांकनावर गंभीर प्रश्नचिन्ह!
200 गुणांच्या वर्णनात्मक पेपरमध्ये 181/200 गुण?
130+ उमेदवारांना 75% पेक्षा अधि�� गुण?
15 गुणांच्या प्रश्नाला 8 गुण, तर काही ठिकाणी 20 पैकी 20 गुण? हे गुणदान नेमके कोणत्या निकषांवर झाले? वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुण कसे मिळाले, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची MPSCने पारदर्शकपणे उत्तरे देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणलेल्या काही गंभीर विसंगती :
🔴 P1 आणि P2 मध्ये काही उमेदवारांच्या गुणांमध्ये 50–89 गुणांचा फरक
🔴 15 गुणांच्या उत्तरात केवळ 3 मुद्द्यांसाठी 8 गुणांचे गुणदान
🔴 वर्णनात्मक पेपरमध्ये काही उमेदवारांना 20 पैकी 20 गुण
🔴 135 गुणांचे मूल्यमापन होऊन अंतिम गुण 68 करण्यात आल्याचा दावा
🔴 काही प्रकरणांमध्ये 17 गुण मोजले गेले नसल्याचा आरोप.
ही आकडेवारी आणि दावे सत्य असल्यास, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक ��ूल्यांकन ऑडिट होणे आवश्यक आहे.
📢 आमच्या मागण्या स्पष्ट आहेत:
1️⃣ प्रत्येक उत्तरपत्रिकेची पुन्हा तपासणी करावी. सरसकट Moderation झाले नाही आणि काही उत्तरपत्रिकांचे थेट Chief Moderation झाले असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची चौकशी करून संपूर्ण प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करावे.
2️⃣ दळवी समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी.
3️⃣ Paper-2 चे मूल्यांकन संबंधित विषयातील पात्र व तज्ज्ञ परीक्षकांकडूनच झाले आहे का, याची खात्री करावी.
4️⃣ गुणदानाचे Independent Audit करावे.
मूल्यमापन पद्धती, Moderation, Chief Moderation आणि गुणांमध्ये झालेल्या बदलांची स्वतंत्रपणे तपासणी करावी.
5️⃣ फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती प्रक्रियेला स्थगिती द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांवर कोणताही अन्याय होणार नाही.
6️⃣ पारदर्शकतेसाठी Top Rankersच्या उत्तरपत्रिका, मूल्यांकन पद्धती आणि Moderationचे निकष नियमानुसार ��ार्वजनिक करावेत.
ही मागणी कोणत्याही उमेदवाराविरुद्ध नाही. ज्यांनी मेहनत घेतली आहे, त्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही. आमची एकच मागणी आहे - प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, पारदर्शक मूल्यांकन आणि न्याय मिळाला पाहिजे. MPSC ही महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची संस्था आहे. तिची विश्वासार्हता टिकवण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि निष्पक���षता ही तडजोड न करता पाळलीच पाहिजे.
विद्यार्थ्यांना उत्तर हवे आहे, उत्तरपत्रिकांचे स्वतंत्र पुनर्मूल्यांकन हवे आहे, मूल्यमापनाचे Independent Audit हवे आहे आणि सर्वात महत्त्वाचे - विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे!
@INCMaharashtra @INCHarshsapkal @mpsc_office @bhimanwar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @INCRojgar
#AgriMPSC #AgriMPSC2024 #MPSC #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #MPSCवाचवा #StudentsForJustice
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२६ ही ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या परीक्षेपूर्वी ४८४ जागांना मान्यता मिळून त्यांचा जाहिरातीत समावेश झाला नाही, तर हा सलग तिसऱ्या वर्षाचा खंड (Gap) असेल. शेवटची जाहिरात २०२४ मध्ये आली होती. यामुळे शेतकरी कुटूंबातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ���यांची वयोमर्यादा संपून त्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
त्यामुळे कृषि विभागाच्या ४८४ पदांच्या मागणीपत्राला वित्त विभागाने तातडीने मान्यता द्यावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ���ी विनंती.
@CMOMaharashtra
@CmoMahShadow
@Dev_Fadnavis
@RRPSpeaksFC
@bharanemamaNCP