कंत्राटी उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार भरण्यास सुरुवात.
भरतीचा हाच वेग राहिल्यास राज्यसेवा २०२४ मध्ये दोन आकडी जागांचे आश्चर्य वाटायला नको.
संचालक, सहसंचालक, उपसचिव, कक्ष अधिकारी, निरीक्षक, BDO, अधीक्षक पदांची कंत्राटी भरती पुढील एका महिन्याच्या आत होणार.
सावध ऐका पुढल्या हाका!
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.
♦️तलाठी भरती घोटाळा.
👉तुमच्या कडे तीन लाख असतील तर परीक्षा केंद्रातील कर्मचारी तुम्हाला तलाठी भरती परीक्षेचे उत्तरे थेट कॉम्प्युटरपाशी आणून देतील.
👉तुमच्या कडे दहा लाख असतील तर तलाठी भरती मधील दलाल तुम्हाला थेट पोस्ट मिळवून द्यायची गॅरंटी देतील.
👉 तुम्ही गरीब असाल तर निवड झालेल्या श्रीमंतांची नावे फक्त निवड यादीत बघत बसावी, यावर आवाज उठविला तर तुमच्यावर अफवा पसरविल्या म्हणून कारवाई केली जाईल अशा धमक्या दिल्या जातील.
महाराष्ट्रातील नोकर भरतीत #व्यापम सारखा "महाघोटाळा" सुरू असून भ्रष्टाचाराने बरबटलेली तलाठी भरती तत्काळ स्थगित करून फेरपरीक्षा घेण्यात यावी.
@RVikhePatil@Dev_Fadnavis@RRPSpeaks@mieknathshinde@AjitPawarSpeaks
नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?
बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करतय.
10 लाखात तलाठी पद विकले जात आहे. वनरक्षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील गैरप्रकार समोर येत आहेत.
युवकांचे भविष्य असे आम्ही विकू देणार नाही. पदभरती मधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यावे,दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
याचा कर्ता करविता कोण आहे?
तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचे आता सिद्ध झालंय, पोलीस भरती,वन विभाग भरतीचे पेपर फुटल्यावर आम्ही शांत होतो पण आता सहनशक्ती संपली आहे. तलाठी भरती याप्रकारे घेण्यात काही अर्थ नाही त्यामुळे आज आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत आहोत. आंदोलनाच्या तारखा लवकरच जाहीर करू.
@RVikhePatil
#तलाठी भरतीत दहा लाखापेक्षा जास्त अर्ज आले आहेत, महसूल विभागाने #जिल्हानिहाय अर्जांची जाहीर केलेली संख्या थकीत करणारी आहे. राज्यात बेरोजगारीचा भस्मासुर वाढलेला असून, #पेपरफुटीमुळे नैराश्याचे वातावरण आहे. तलाठी परीक्षेदरम्यान पेपर फुटलाच तर सरकार आणि तरुणाई मधील #संघर्ष अटळ असेल.
याच MIDC भरती प्रक्रियेतील गट-क पदांची परीक्षा २०२१ साली ब्लॅकलिस्टेड आपटेक कंपनीकडून घेण्यात आली होती, जबरदस्तीने ती भरती प्रक्रिया रेटून नेण्यात आली.@midc_CEO MIDC च्या अधिकाऱ्यांनी रद्द केलेल्या गट-ड भरती प्रक्रियेचे परीक्षा शुल्क परत कधी मिळेल ते तत्काळ जाहीर करावे.
२०१९ साली फडणवीस सरकारने #MIDC गट-ड जाहिरात काढली, आज ती जाहिरात रद्द करण्यात आली. शुल्कापोटी उमेदवारांकडून घेतलेले करोडो रुपये परत करण्याबाबत सूचना पत्रात शब्दही नाही. बेरोजगारांना पुरते छळण्यात येतंय, जाहिरात रद्द करण्यासाठी #फडणवीसांचा जाहीर निषेध.
@Dev_Fadnavis@midc_CEO
मागील जाहिरातीत अर्जाचे रिफंड अजूनपर्यंत दिले नाहीच पण आता #ZP साठी प्रति अर्ज १००० रुपये ठेऊन बेरोजगारांना लुटण्यात येतय. एक उमेदवार जिल्हा परिषदेच्या ५-६ पदांपेक्षा जास्त संवर्गासाठी पात्र आहे म्हणजे ५-१०००० परीक्षा शुल्क.इथ बेरोजगारांचे खायचे वांदे आहेत, इतके पैसे कुठून आणणार?
✅ फडणवीस सत्तेत असताना महापरीक्षा भरती घोटाळा झाला
✅फडणवीस सत्तेत असताना मुंबई पोलीस भरती २०२३ घोटाळा झाला
✅ फडणवीस सत्तेत असताना वन विभाग भरती २०२३ पेपरफुटी झाली
हेच फडणवीस #पेपरफुटीवर_कायदा_करा याचे विधानसभेत मोघम उत्तर देतात,त्यामुळे #फडणवीस_राजीनामा_द्या@Dev_Fadnavis
पदभरत्यांच्या जाहिराती साठी बेरोजगारांना 6 महिन्यापासून झुलवत ठेऊन @CMOMaharashtra काय साध्य करत आहे?
@mieknathshinde साहेब,मनापासून भरती राबविण्याची इच्छा आहे की फक्त गाजावाजा करून बेरोजगारांच्या तोंडाला पाने पूसायची आहेत?कधी येणार जाहिराती?
#75000_मेगा_भरती@Dev_Fadnavis
सरळसेवा भरती कॉपीमुक्त झाली तरच हजारो जागांचा फायदा आहे नाहीतर लाखो रुपयांना या जागा विकल्या जातील. कॉपीची चौकशी करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होत असतील तर प्रकरणाची गांभीर्यता लक्षात येते.
कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक परीक्षा १००% पारदर्शक आणि कॉपीमुक्त झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
कोणत्याही निवडणूकीतला पराभव एकाएकी कधीच नसतो. बेरोजगार,शेतकरी,वंचित घटकांच्या वारंवार केलेल्या अवहेलनेचे उत्तर मतांच्या रूपाने नक्कीच मिळतं. कर्नाटक पराभव, महाराष्ट्र भाजपतील @BJP4Maharashtra नेत्यांना इशारा, मेगाभरतीच्या जाहिराती काढून बेरोजगारांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या
जलसंपदा विभाग मध्ये जुना स्थापत्य अभियांत्रिकी कोर्स ठेवण्यात यावा ही विनंती pwd,महानगरपालिका,ZP मध्ये चालतो तर WRD मध्ये का नाही WRD मध्ये सुद्धा लागू करावा ही विनंती @mieknathshinde@Dev_Fadnavis