एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal@satejp@DalviAaba@Dhananjay4INC
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा टीसीएस केंद्रांवरच घेण्याची मागणी राज्यभरातील विद्यार्थी करत आहेत.
परिणामी या परिक्षा ही TCS ION Digital केंद्रावर घेण्यासंदर्भात सरकारकडून IBPS संस्थेला निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#BMCExam | #IBPS | #StudentDemand | #MaharashtraGovernment |
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे.
जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणत्याही नियमावलीचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
@Dev_Fadnavis
2 फेब्रुवारी 2025 ला होणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेच्या संदर्भात सकाळपासूनच धक्कादायक माहिती कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे, त्यातच आता एक नवीन रेकॉर्डिंग ऐकायला मिळाली त्यात अजून एका विध्यार्थ्याला कॉल आल्याचे कळत आहे, त्या कॉल मध्ये खालील रेट सांगितले आहेत👇👇
👉गट ब पूर्व + मुख्य- 45 लाख
👉गट ब पूर्व + मुख्य- 35 लाख
सारे एकूण चक्कर आली राव, मा @mpsc_office ने लवकरात लवकर काय खरं आणि काय खोटं याचा खुलासा करावा अशी विनंती आहे.
तसेच लवकरात लवकर संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा अशी विनंती आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@supriya_sule@RRPSpeaks@MahebubShaikh20
मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. आमची पेपर देणाऱ्या सर्व मुलांना नम्र विनंती आहे की कोणी ही कोणाच्याही अमिषाला बळी पडू नका. आम्ही मुंबई पोलीस यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी उपाययोजना खूप चांगल्या केल्या आहेत. तुम्ही पकडले जाल आणि तुमचे आयुष्य खराब होईल. कोणालाही पैसे देऊ नका त्याचा उपयोग होणार नाहीये. काहींचे नावे आम्हाला समजली आहेत ती माहिती आम्ही मुंबई पोलीस यांना दिली आहे. त्यामुळं कोणीही रिस्क घेऊ नका. आमचा या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष आहे. अजून कोणाला कोणाविषयी शंका जरी असली तरी त्याचं नाव आम्हाला व्हॉट्स ॲप मॅसेज करून पाठवा.
राहुल कवठेकर ( 8668378583)
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@BJP4Maharashtra मनःपूर्वक आभार साहेब🙏.
DySP161 जागा रिक्त,कमीत कमी 61 DySP जागा येऊ शकतात जर HM साहेबांनी आदेश दिले तर.DyEduOfficer पदाच्या 347 रिक्त जागांपैकी 200 येऊ शकतात. नायब तहसीलदार 281 रिक्त पैकी 150, CO(A)44,CO(B)75 रिक्त अशी टोटल कमीत कमी 1000 जागांची जाहिरात करा साहेब.नम्र विनंती🙏
♦️ आमच्या सर्वांच्या विनंती ला मान देऊन.. तुम्ही दिलेल्या शब्दप्रमाणे राज्यसेवा आणी #Combine पूर्व 2024 जागावाढ साठी पाठपुरावा केला. त्या बद्दल सर्वांच्या वतीने धन्यवाद साहेब.. तुम्ही या विषयात हात घातला म्हणजे जागा नक्कीच वाढतील असा आम्हाला विश्वास आहे..🙏🙏🙏 @AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
सरकारची लाडकी खुर्ची स्थिर झाली असेल तर सरकारने लाडक्या भावा - बहिणींच्या रोजगाराचंही बघावं....
राज्यभरातील युवांकडून #Combine_2024 परीक्षेसाठी जागावाढीची मागणी केली जात आहे.
#PSI पदाच्या 2500+ जागा रिक्त असताना कम्बाईन 2024 परीक्षेमध्ये फक्त 216 जागांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, STI 207, ASO 54 तर SR पदाच्या शून्य जागा आहेत.
विद्यार्थ्यांनी RTI अंतर्गत माहिती मागविली असता हजारो जागा भरणे शक्य आहे. तरी सरकारने विद्यार्थ्यांना गृहीत न धरता विद्यार्थी हिताची भूमिका घ्यावी आणि पदांमध्ये भरघोस वाढ करावी, ही विनंती!
#Combine_जागावाढ_2024
@Dev_Fadnavis
#Combine_जागावाढ_2024
PSI ची 3000 पदे रिक्त पण जाहिरात मात्र 216 पदांसाठी, STI 500+ पदे रिक्त जाहिरात फक्त 209 पदांसाठी, SR 40+ जागा रिक्त जाहिरात 0 जागा.
Combine 2024 परीक्षेसाठी जास्तीत जास्त रिक्त जागांचे मागणीपत्र पाठवावे
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
मा @Dev_Fadnavis साहेब.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) च्या सद्यस्थितीत 2959 रिक्त जागा आहेत. संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2024 साठी 1000+ जागांचे मागणीपत्र MPSC ला पाठविण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.