भुजबळ साहेब, निषेध आम्हालाही करता येतो !
ज्या मा. अजितदादांनी मा. भुजबळ साहेबांना आतापर्यंत अनेकदा मंत्रीपदाची संधी दिली, भुजबळ कुटुंबीयांना अनेक वेळा अनेक माध्यमातून मदत केली. त्याच अजितदादांविरोधात भूमिका घेणाऱ्या समर्थकांना जशास तसे उत्तर आम्ही देखील देऊ शकतो!
एकाच कुटुंबाला किती संधी द्यायची? इतर नेत्यांना आणि तरुण आमदारांना संधी दिली तर काय चूक केलं दादांनी? प्रत्येक वेळेस भुजबळ साहेबांसोबत अजितदादा खंबीरपणे उभे राहिले आहेत. हे सगळं विसरून दादांविरोधात भुजबळ साहेबांचे समर्थक भूमिका मांडत असतील, तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे पाहिजे तिथे येऊन चोख उत्तर देण्यात येईल !
@AjitPawarSpeaks@NCPspeaks1_@TV9Marathi@abpmajhatv
@News18lokmat
@saamTVnews@LokshahiMarathi@lokmat@pudharionline@SakalMediaNews@mataonline@NDTVMarathi@zee24taasnews@LoksattaLive
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ पाऊल उचलणं, हे पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे.
पहाटेपासून राज्यभरातील पुरजन्य परिस्थितीचा आढावा मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून घेतल्यानंतर पुण्यात येऊन पुणे महानगरपालिकेतील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. शहरातील व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच त्या दृष्टीनं परिस्थिती हाताळण्यासाठीच्या आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन आपत्तीपूर्व उपाययोजनांची माहिती घेतली. सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचाव व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.
Held a meeting with police officials at the office of Commissioner of Police in Pune to review the flood situation in the area, and directed them to take necessary measures to safeguard our people.
पुण्यातील एकता नगर, सनसिटी या भागात प्रत्यक्ष भेट देऊन अतिवृष्टी आणि पुरजन्य परिस्थितीची पाहणी केली. तसंच त्या-त्या भागातील नागरिकांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना भेटून नागरिकांना तातडीची मदत करण्याचे निर्देश दिले.
मी पुणेकरांना सांगू इच्छितो, 'मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. राज्य शासनाच्या वतीने हवी ती मदत तातडीने पुरवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
Keeping a tab on the heavy rainfall situation in and around Pune, visited Ekta Nagar and Suncity areas, and interacted with locals.
Also instructed the concerned officials to provide all assistance to the citizens. We are monitoring the entire situation and I would like to assure everyone that the state govt is working around the clock to provide help in all aspects.
आमच्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते हीच आमची ताकद आहे! आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात पक्षाशी बांधिलकी जपणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. आगामी काळात पक्षाचा राष्ट्रवादी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या आमच्या निर्धारात त्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्म, पंथांच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यस्थापनेतील महत्त्वाचे स्थान आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशालगड परिसराला आज भेट दिली. तिथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या स्थानिक नागरिकांशी, प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून वस्तुस्थिती समजून घेतली. विशाळगड परिसरात घडलेली हिंसाचाराची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. त्याची पुनरावृत्ती टाळणे, स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आणि जातीय सलोखा कायम ठेवणे हे महायुती सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोणाचीही फूस आणि अफवांना बळी न पडता सर्वांनी एकता, बंधुता, जातीय सलोखा कायम राखावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यातून सुराज्य घडविण्याचा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं कोल्हापुरातील आणि राज्यातील तमाम नागरिकांना माझे आवाहन आहे.
पक्का वादा, फक्त अजितदादा !!!
मा. अजितदादांसोबत कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेल !
- दीपकभाऊ मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी पुणे
@AjitPawarSpeaks@SunilTatkare#ncp_pune
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रदेशाध्यक्ष
रायगड लोकसभा खासदार
मा. श्री. सुनिलजी तटकरे साहेब
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- शुभम अंकुश माताळे
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस
@SunilTatkare@iAditiTatkare@NCPSpeaks1
पुण्यात काँग्रेसकडून महायुतीचा प्रचार..!
मा. अजितदादांनी घोषित केलेली महायुती सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' संपुर्ण महिलावर्गाला आधार व सन्मान देणारी आहे. पण महायुती सरकारचं सगळंच वाईट म्हणणाऱ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही योजनाही वाईट अशी भूमिका घेतली. पण मात्र स्थानिक काँग्रेसवीरांनी ही योजना आमचीच, असा आव आणत आता बॅनरबाजी केलीय. पण आता प्रश्न पडतो काँग्रेसची भूमिका यांना माहित नाही की ते काँग्रेसमधील वरिष्ठांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवताहेत. असो आमच्या माता भगिनी खुश आहेत कारण योजना आमच्या 'महायुती सरकारनं आणलीय.!
@mahancpspeaks@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE
काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे.
हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे.
#MumbaiRains