अदाणी ग्रीन एनर्जी के प्रोजेक्ट की लागत 5,675 करोड़ से घटकर 56.75 करोड़ कैसे हो गई? इससे वन्यजीवों की सुरक्षा के लिए जमा होने वाली रकम भी 227 करोड़ से घटकर 2.27 करोड़ रह गई. क्या कंपनी को फायदा पहुंचाने के लिए नियमों को ताक पर रखा गया? देखिए पूरी खबर इंडियन एक्सप्रेस हिंदी पर.
Shailesh Lodha used a taxpayer-funded Udaipur Nagar Nigam stage not for poetry, but to run a hit job on Rahul Gandhi and Abhijeet Dipke.
The DESPERATION for political patronage has peaked.🤷♂️
Apparently, his daughter authored a book titled “54 Reasons Why Parents Suck and Phew!”
The internet says she lives in Singapore. Meanwhile, Mr. Lodha Ji has a problem with young Indians raising their voices and fighting for a better India.
@RahulGandhi@abhijeet_dipke
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आज नागपुरात आपण ‘अराजकता हटाव, लोकशाही बचाव मोर्चा’ काढत आहात, पण हा मोर्चा काढण्यापूर्वी आपण स्वतःच आत्मचिंतन करायला पाहिजे.
‘गोकुळ’मध्ये शेतकऱ्यांनी लोकशाहीमार्गाने स्पष्ट जनादेश देत भाजपला दूर केलं असताना देखील शासन नियुक्त सदस्य नेमून ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा मनसुबा म्हणजे अराजकता नाही का? लोकशाहीशी आणि संविधानाशी द्रोह नाही का? लोकशाहीच्या नावाखाली मोर्चा काढण्याचा आपणास नैतिक अधिकार आहे का? हे प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारावेत.
गोकुळच्या निकालादिवशी कोल्हापुरात असूनही विजयी मिरवणूक काढता न आल्याने इगो दुखावणं साहजिक आहे, परंतु इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? हा निर्णय म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ आहे. त्यामुळं वेळ आहे तोवर निर्णयात दुरुस्ती करा!
@Dev_Fadnavis@satejp
#Gokul #गोकुळ_वाचवा #कोल्हापूर
मुख्यमंत्री साहेबांचे नवे ‘मोपलवार’ - अनिलकुमार गायकवाड साहेब!
MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गायकवाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेकेदारांनी लाखो रुपये खर्च करून जाहिराती दिल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यासाठी अशा जाहिराती देता येतात का? ठेकेदार अशा जाहिराती का देत आहेत? याचा अर्थ काय? एकीकडं दुष्काळ आणि दुसरीकडं लाखोंच्या जाहिराती का?
cost escalation करून संपूर्ण राज्याची तिजोरी ओरबाडून खाल्ली जातेय, ही वस्तुस्थिती आहे, पण कुणीही काहीही बोलत नाही … हे असंच चालू राहिलं तर राज्य कंगाल होईल हे लक्षात असू द्या!
आता ह्यात कुणामध्येच मतभेद नाहीत की एल निनोचा परिणाम भीषण असणार आहे. मागच्याच आठवड्यात World Meteorological Organisation नी तसं जाहीरही केलं आहे. २०१५-१६ ला आपण ह्याचा थोडा अनुभव घेतला पण ह्यावेळची परिस्थिती त्याही पलिकडची आहे.
ह्या वर्षीचा हिवाळा जरा जास्त गरम आणि उन्हाळा लवकर सुरू होणं असं आपल्याला महाराष्ट्रात जाणवेल असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करताहेत. तसं झालं तर शहरात पाणी टंचाई आणि रब्बीचं पीक धोक्यात येऊ शकेल. निती आयोगाच्या रमेश चांद ह्यांनी तर शेतीतील उत्पन्नवाढ जवळजवळ शून्यावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (उत्पन्न नव्हे, उत्पन्नवाढ - farm sector growth)
महाराष्ट्रातील राज्यसरकारचा “थिंक टॅन्क” आहे Maharashtra Institution for Transformation (MITRA) त्यांच्याकडून विलक्षण तत्परतेची आणि धोरण कल्पकतेची (Policy Innovation or Imagination) अपेक्षा आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून केंद्राशी समन्वय साधून ग्रामीण (Viksit Bharat - Guarantee for Rojgar and Aajeevika Mission) सारख्या योजनेचा नीट उपयोग करून घेण्याची अपेक्षा आहे… आव्हान मोठं आहे. @CMOMaharashtra
#महाराष्ट्र #दुष्काळ
दुष्काळात सवलत देताना तरी समान न्याय द्यावा सर्वजातीय विद्यार्थ्यांना. जो मराठा त्याला दुष्काळाची झळ पोहोचत नाही आणि जो इतर जातीय असतो त्याला दुष्काळाची झळ बसते असं आहे का?
सरकारने जाहीर करूनसुद्धा जर कोणी दखल घेत नसेल तर सरकारने कायदेशीर कारवाई करावी या विद्यापीठावर. विद्यार्थ्यांनी सदर विद्यापीठाला पत्र पाठवली, संवाद साधला तरी लक्ष देईना कोणी.
@mieknathshinde@CMOMaharashtra
कृपया स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
₹15 crore a year for a news anchor, while the Army Chief earns ₹59 lakh, the AIIMS Delhi Chief ₹52 lakh, and a senior ISRO scientist ₹43 lakh.
Incredible priorities.
We live in a nation where a former extortionist is paid crores every month by the govt to peddle propaganda, while the Chief of the space programme gets pennies in the name of salary.
Why is no one outraged over this?
If Prasar Bharati can spend ₹15 crore a year on a DD News show featuring a star anchor, while the ISRO Chairman’s basic pay is about ₹27 lakh a year, shouldn’t we rethink our priorities? If India wants to conquer space and attract our finest scientific minds, our rewards must match our ambitions.
“Joh mila, woh hazam” — this is how a PM talks to the taxpayers whose money funds his government?
“Na khaunga, na khane dunga” se “jo mila, woh hazam” tak. The mask is off. The arrogance is on full display.
ABOLISH INCOME TAX. We are taxpayers, not your slaves #AbolishIncomeTax
सह्याद्रीच्या छातीत खंजीर खुपसून विकासाचा झेंडा फडकवायचा असेल, तर त्या विकासाची किंमत निसर्गाने का मोजायची?
भीमाशंकरच्या कुशीतला हिरवागार परिसर हा सह्याद्रीचा श्वास आहे, जैवविविधतेचं माहेरघर आहे आणि पुढच्या पिढ्यांकडून आपण घेतलेलं कर्ज आहे.
आज शेकडो एकर वनजमिनीवर प्रकल्पांची सावली पडतेय. कागदावर जंगल फक्त हेक्टर आणि एकर असतं; पण प्रत्यक्षात प्रत्येक झाडामागे कित्येक पावसाळे, असंख्य जीव आणि एक अख्खी परिसंस्था उभी असते.
वीज हवी, उद्योग हवेत, विकासही हवा…
पण विकासाच्या दिव्यांसाठी सह्याद्रीची हिरवी चिता पेटवावी लागणार असेल, तर त्या उजेडाचा अभिमान कसला?
डोंगर पोखरून, जंगलं ओरबाडून आणि निसर्गाचा श्वास गहाण ठेवून उभा राहणारा विकास म्हणजे प्रगती नव्हे.... ती भविष्याच्या ताटात वाढलेली आजच्या स्वार्थाची किंमत आहे.
निसर्गाच्या न्यायालयात फाईल बंद होत नाही...
तिथे प्रत्येक घावाचा हिशेब एक दिवस पूर, दुष्काळ, दरड आणि तापलेल्या पृथ्वीच्या भाषेत परत केला जातो!
#भीमाशंकर #सह्याद्री
कर्जत तालुक्यात (जि. रायगड) सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा भयानक विनाश सुरू आहे. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील घनदाट जंगलातील तब्बल ३२ हजारांहून अधिक झाडांची अक्षरशः कत्तल सुरु झालीय. कागदावर हा आकडा ३२ हजार दिसत असला तरी उद्या तो लाखापर्यंत जाईल आणि हे होत असताना जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तेथील हजारो-लाखो पक्षांचा आकांत कुणालाही ऐकू येत नाही, हे दुर्दैव आहे. एखाद्या कसायाप्रमाणे निर्घृणपणे पक्षांची घरटी, अंडी आणि अजून पंखही न फुटलेली घरट्यातील पिल्लं नष्ट केली जातायेत… सिंमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना जंगलातील पक्षांची ही आर्त किंकाळी ऐकू येणार आहे की नाही?
हा प्रकार केवळ वृक्षतोड नसून एका इकोसिस्टिमचा अंत आहे आणि हे याचे गंभीर परिणाम माणसाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. हे घनदाट जंगल महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूसह बिबटे, भेकर, उदमांजर, खेकडे आणि शेकडो दुर्मिळ पक्षांचं हक्काचं निवासस्थान आहे. पण या झाडांची कत्तल होत असल्याने आता ते पूर्णपणे बेघर होतायेत. मौल्यवान औषधी वनस्पती, दुर्मिळ कीटक आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेली सह्याद्रीची ही रांग या बेसुमार कत्तलीमुळे कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच भर म्हणून या प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये जे शक्तीशाली सुरुंगाचे स्फोट केले जातील त्यातून संपूर्ण डोंगराचा भाग कमकुवत होऊन भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याचाही धोका आहे.
कर्जतसारखा निसर्गरम्य परिसर जो मुंबई-पुण्याचं हवामान संतुलित राखण्यात मोठी भूमिका बजावतो, तिथली वनसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडणार असून स्थानिक आदिवासींचा जगण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. याला सर्वस्वी भांडवलदारांच्या हातचं बटीक बनून काम करणारं हे भाजप सरकार जबाबदार असून याच भांडवलदारांच्या फायद्यासाठी मुक्या पशू-पक्ष्यांचा बळी देऊन हा निसर्गाचा विनाश सुरुय. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून तोपर्यंत येथील संपूर्ण जंगल यांना नष्ट करायचंय आणि अशा प्रकारे जंगल नष्ट करुन होणारा विकास पंतप्रधान साहेबांना तरी मान्य असेल का? निसर्गाचा विनाश करून होणारा विकास हा विनाशकारी असून तो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. या प्रकल्पाला आणि संबंधित कंपनीला विरोध असण्याचं काहीच कारण नाही, परंतु त्यांनी जे स्थान निवडलंय ते पूर्णतः चुकीचं आणि पर्यावरणाच्या मुळावर उठणारं आहे. त्यामुळं जिथं पर्यावरणाचा नाश होणार नाही, अशा ठिकाणी हा प्रकल्प नेला तर त्याला कुणाचाच विरोध असणार नाही. तसा प्रयत्न सरकार का करत नाही.
त्याऐवजी या ‘झाडखाऊ’ सरकारने महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा विडाच उचलला की काय अशी शंका येते. एक जागरूक नागरिक म्हणून या पर्यावरणाच्या विनाशाविरोधात आपण सर्वांनीच एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. माध्यमांनीही पर्यावरणाचा आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन यावर आवाज उठवला पाहिजे. यामध्ये ‘शिवाई न्यूज’ यासारखी एक वात वादळातही मिणमिणतेय आणि या स्थानिक चॅनलचे पत्रकार यावर पोटतिडकीने निसर्गाचा होणारा हा विनाश ओरडून जगाला दाखवतायेत याचं निश्चितच कौतुक आहे. भविष्यात त्यांच्यावरही दबाव आणला जाऊ शकतो. तसंच ज्यांनी हा विनाश रोखायचा त्या सर्व संस्था देखील सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळं हे थांबवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे जनतेचा दबाव.. तो आपण सर्वजण मिळून निर्माण करु आणि आपलं पर्यावरण वाचवू…
यापासून आपण आज अलिप्त राहिलो तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
#SaveSahyadri #SaveForests #SaveEnvironment #सह्याद्री_वाचवा #जंगलतोड_थांबवा #पर्यावरण_वाचवा #SaveWildlife
काहीही झाले तरी भीमाशंकरचे जंगल वाचवायला पाहिजे. खूप झाला तुमचा विकास, तुमच्या विकासाची फळे भोगतोय महाराष्ट्र. सगळे अदानीच्या घशात घालून हे जातील पळून आणि सामान्य जनतेला मरावे लागेल. @Dev_Fadnavis झाडखाऊ मुख्यमंत्री आहे आणि @narendramodi भडखाऊ पंतप्रधान