MPSC कडून विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घोटाळा झाल्याचे आम्ही वारंवार सांगितले आहे. याबाबत आयोगातील उपसचिव असलेले अधिकारी दिलीप वाघे यांची भूमिका संशयास्पद असूनही अद्याप आयोगाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. उच्चपदस्थ अधिकारी अशा प्रकारे उमेदवारांशी चॅट करत असेल, तर हा गोपनीयतेचा भंग नाही का?
मास कॉपी, मैदानी चाचणीत घोळ, मेडिकल चाचणीत घोळ अशा प्रकारे आपल्या मर्जीतील उमेदवारांनाच फायदा पोहोचवण्यासाठी आयोगातील अधिकाऱ्यांपासून ते गृहविभागातील अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी मोठा भ्रष्टाचार करून विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत गैरप्रकार केले आहेत.
एकंदरीतच आयोग आतून-बाहेरून पूर्णतः पोखरला गेला आहे. आयोगाचा क्लीनअप करायचाच असेल, तर छ���टे मासे पकडून काहीही होणार नाही; त्यासाठी मोठा मासा पकडणे गरजेचे आहे आणि अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे शक्य नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
MPSC परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांसमोर पत्राद्वारे ठेवल्या आहेत.
सातत्याने होणारी पेपरफुटी ह्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीला सरकारकडून विद्यार्थ्यांना फक्त खोटी आश्वासने मिळत आहेत!
@AUThackeray#mpsc#mpscstudents
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?
MPSC अध्यक्ष भीमनवार यांच्या म्हणण्यानुसार औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या दोन महिने आधीच सेट झाला होता. मग ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेप��� नेमके कधी आणि कुणाच्या काळात सेट झाले, हा विद्यार्थ्यांचा रास्त सवाल आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ चे पेपर निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या वादग्रस्त कार्यकाळात सेट झाले असण्याची दाट शक्यता आहे. मग या पेपरच्या सुरक्षिततेची हमी आयोग कशी देणार?
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर सीलबंद अवस्थेत परीक्षा केंद्रावर पोहोचला, तरीही पेपरफुटीचे प्रक���ण समोर आले. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
मग आगामी राज्यसेवा परीक्षेचे पेपर खरंच सुरक्षित आहेत का? विद्यार्थ्यांच्या मनातील ही शंका दूर करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. घाईघाईने परीक्षा घेऊन हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याऐवजी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक आहे.
जुने पेपर रद्द करा, न्याया���यीन देखरेखीखाली नव्याने पेपर सेट करा आणि त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षा घ्या.
विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग आता बस्स झाले!
#MPSC #StopPaperLeak
गेल्या काही महिन्यांतील परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर,
शनिवार दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा #MPSC ला पुढे “ढकलावीच” लागेल. -@Dhananjay4INC@mpsc_office#Rajyaseva
पॅटर्न कोणता हा मुद्दाच या क्षणी मला गौण वाटतो. आयोग पारदर्शी नसेल तर पॅटर्न कोणताही असला तरी कॉपी बहाद्दरच पास होतील त्याच काय? आयोगाचे परीक्षार्थींच्या प्रति उत्तरदायित्व आधी अधोरेखित व्हायला हवं. मग बाकीच सर्व...
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा;
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करा!
MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि परीक्षा व्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे ��िद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोर्चातून पेपरफुटीच्या प्रश्नांची चौकशी, भरती प्रक्रियेला गती, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, ७० हजार पदांची भरती आणि MPSC अध्यक्षांचा राजीनामा अशा प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत.
वर्षानुवर्षे अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबला पाहिजे. विद्यार��थ्यांना विश्वासार्ह आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था मिळणे, रखडलेल्या भरती प्रक्रियेला गती मिळणे आणि त्यांच्या प्रश्नांवर वेळबद्ध निर्णय होणे गरजेचे आहे.
२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या मोर्चाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा ठाम पाठिंबा आहे!
#MPSC #अध्यक्षांनी_राजीनामा_द्यावा #पेपरफुटी #मोर्चा #२ऑक्टोंबर
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी MPSC विद्यार्थ्यांचा सत्याग्रह!
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा प्रक्रियेसाठी २ ऑक्टोबरला पुण्यात सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे.
परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि अस्वस्थता दूर करणे, परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करणे आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सत्याग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शांततामय, लोकशाही आवाज बुलंद करूया.
महाराष्ट्रातील सर्व MPSC विद्यार्थी, उमेदवार आणि विद्यार्थीहितासाठी लढणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
📅 २ ऑक्टोबर २०२६ - गांधी जयंती
⏰ सकाळी १० वाजता
📍 एस. एम. जोशी पूल, पुणे
सत्याच्या मार्गाने…
अहिंसेच्या मार्गाने…
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी!
@INCHarshsapka @vishwajeetkadam
#MPSC #MPSCविद्यार्थी #विद्यार्थीआंदोलन #सत्याग्रह #गांधीजयंती #Pune #MPSCStudents
चौकशी अजून चालू आहे-धागेदोरे अजून किती खोलवर आहेत आपल्याला अंदाज नाही. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 चौकशी झाल्या���ंतरच घ्यावी. या सर्व घटना प्रचंड मानसिक ताण वाढवणाऱ्या आहेत.पारदर्शक परीक्षा हा आमचा अधिकार आहे #mpsc
@CMOMaharashtra @mpsc_office
https://t.co/QUFChohi3t