॥ अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ॥
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासमवेत वारकऱ्यांसोबत चालत वारीचा भक्तिमय अनुभव घेतला.
वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माऊलींकडे "राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे घातले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील 2 वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे.
वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे. शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore
#Maharashtra #DevendraFadnavis #Wari #जयहरीविठ्ठल
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ६० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याची प्रभावी अंमलबजावणी होत असून, त्याचे प्रमाण ९९.४८% पर्यंत पोहोचले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
@Dev_Fadnavis#विधानसभा#पावसाळीअधिवेशन२०२६#MonsoonSession2026
"संचालक : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक"
सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार.. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध..
विजयप्रसंगी प्रसार माध्यमांसोबत साधलेला संवाद..
#chhatrapatisambhajinagar#victory#Bank
𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐡𝐚𝐬 𝐞𝐧𝐭𝐞𝐫𝐞𝐝 𝐚 𝐧𝐞𝐰 𝐞𝐫𝐚 𝐨𝐟 𝐚𝐯𝐢𝐚𝐭𝐢𝐨𝐧. ✈️
An IndiGo Airbus A320 has become the first commercial passenger aircraft in India to successfully land using GAGAN, the country's indigenous satellite-based navigation system.
𝐖𝐡𝐲 𝐭𝐡𝐢𝐬 𝐦𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐬:
* Developed by AAI and ISRO, GAGAN delivers safer, more precise landings.
* Reduces dependence on costly ground-based landing systems.
* Enables more efficient flight paths, cutting fuel use and costs.
* Improves connectivity to remote airports while reducing delays.
𝐀𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐦𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐟𝐨𝐫 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐢𝐧𝐧𝐨𝐯𝐚𝐭𝐢𝐨𝐧, 𝐬𝐚𝐟𝐞𝐫 𝐬𝐤𝐢𝐞𝐬, 𝐚𝐧𝐝 𝐭𝐡𝐞 𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 #𝐀𝐭𝐦𝐚𝐧𝐢𝐫𝐛𝐡𝐚𝐫𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭. 🇮🇳
📍 विधानभवन, मुंबई
आज विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, कार्यक्रम आणि विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. २२ जून २०२६ ते शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या विकासाशी निगडित विविध विषय, लोकहिताचे प्रश्न तसेच जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा विधिमंडळात प्रभावीपणे मांडल्या जाव्यात, या दृष्टीने अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे.
लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी विधायक चर्चा, धोरणात्मक निर्णय आणि जनहिताच्या विषयांवर सखोल विचारमंथन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने आगामी पावसाळी अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, माननीय संसदीय कार्यमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच विधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, डॉ. नीलमताई गोऱ्हे, विक्रम काळे, सतेज पाटील, ॲड. अनिल परब, प्रसाद लाड, अशोक उर्फ भाई जगताप, हेमंत पाटील उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) डॉ. विलास आठवले आणि सचिव (४) श्री. शिवदर्शन साठ्ये हे देखील उपस्थित होते.
#पावसाळीअधिवेशन२०२६ #MonsoonSession2026 #MaharashtraLegislature #ramshinde
भंडारा-गोंदिया आणि नागपूर विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीच्या प्रचार बैठकीस उपस्थित राहिलो. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच भाजपा-महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि डॉ. राजीव पोतदार यांच्या महाविजयाचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे यांच्यासह अनेक मान्यवर, भाजपा-महायुतीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#VidhanParishad2026 #BJP4Maharashtra
📍 छत्रपती संभाजीनगर
भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभाग संयोजक श्री. नितीन काळे यांनी माझ्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सदिच्छा भेट, संवाद आणि संघटन बळकटीसाठी कटिबद्धता!
महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
@girishdmahajan#GirishMahajan#BirthdayWish#AmitGorkhe#PCMC
आमदारकी किंवा महामंडळाचे अध्यक्षपद ही केवळ पदे नसून, ती माझ्या समाजाप्रती असलेली एक मोठी जबाबदारी आहे, असे मी मानतो. या जबाबदारीच्या काळात समाजाचे ६० ते ७० वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावता आले, याचा मला सार्थ अभिमान आहे.
माझ्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे निर्णय...
१) 'बार्टी'च्या धर्तीवर मातंग समाजासाठी 'आर्टी' संस्था सुरू केली. आनंद आहे की, याच संस्थेच्या माध्यमातून समाजातील नाशिकच्या एका कन्येने UPSC परीक्षेत यश संपादन केले.
२) ५९ जातींच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा प्रश्न मी विधीमंडळात अत्यंत जबाबदारीने मांडला. बदर समितीचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात हे वर्गीकरण पूर्णत्वास जाईल.
३) क्रांतिकारक स्मारके: पुण्यात लहुजी वस्ताद साळवे यांचे २६० कोटींचे भव्य स्मारक, मुंबईतील चिरागनगर येथे अण्णाभाऊ साठे यांचे २५० कोटींचे स्मारक, वाटेगाव येथे ५ एकर जागा मिळवून तिथेही ५० कोटींचे स्मारक साकारत आहे.
समाजाच्या आशीर्वादाने मिळालेल्या या पदाचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचवण्यासाठीच करत राहीन. अजून खूप कामे बाकी आहेत, आणि ती मी पूर्ण करणारच...
@Dev_Fadnavis
#AmitGorkhe #MatangSamaj #ARTI #AnnaBhauSathe #LahuJiVastadSalve
माझा परिवार, भाजपा परिवार!
भाजपाचा भगवा ध्वज म्हणजे राष्ट्रहिताची विचारधारा, राष्ट्रसेवेचा निर्धार आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे.
सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी प्रत्येक भाजपा परिवारातील सदस्याने आपल्या घरावर भाजपाचा ध्वज लावून स्थापना दिन उत्साहात साजरा करूया.
चला, राष्ट्रभक्तीचा भगवा अभिमानाने फडकवूया!
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#माझापरिवारभाजपापरिवार #BJPFoundationDay #BJP #BJPIndia #AmitGorkhe
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सहभागी झालो. या बैठकीस मा केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, मा केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते. देशातील 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील तयारी व उपाययोजनांची माहिती दिली. जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाची तयारी, केंद्र-राज्य समन्वय मजबूत ठेवणे आणि सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देणे, यावर बैठकीत महत्त्वपूर्ण दिशा ठरवण्यात आली. या बैठकीत सहभागी होत महाराष्ट्राच्यावतीने आमची भूमिका मांडली.
‘टीम इंडिया’च्या भावनेतून सातत्यपूर्ण समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि एकत्रित प्रतिसाद आवश्यक असल्याचे मा पंतप्रधान मोदीजी यांनी अधोरेखित केले.
या कठीण काळात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या सक्षम नेतृत्वाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. अनेक देशांमध्ये निर्बंध, आपत्कालीन स्थिती आणि आर्थिक ताण वाढत असताना भारतात सामान्य परिस्थिती राखण्यात यश आले आहे.
इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. इतर देशांमध्ये 20-30% दरवाढ होत असताना केंद्र सरकारने हा भार स्वतः उचलत नागरिकांवर बोजा वाढू दिला नाही, याबद्दल मा. पंतप्रधान मोदीजी यांचे विशेष आभार मानतो. ‘राष्ट्र प्रथम, भारतीय प्रथम’ या तत्त्वाचा यामध्ये प्रत्यय येतो.
गेल्या 11 वर्षांत ऊर्जा स्त्रोतांचे विकेंद्रीकरण, 27 ऐवजी 41 देशांतून आयात, सौर ऊर्जा आणि ई-बसेस यांसारख्या उपक्रमांमुळे देश अधिक सक्षम झाला आहे. एलपीजी पुरवठा सुरळीत असून आत्मनिर्भर भारत अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
राज्यात खतांची पुरेशी उपलब्धता असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आम्ही सातत्याने आढावा घेत आहोत. साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू असून अॅग्रीस्टॅकद्वारे पारदर्शकता वाढवत आहोत.
पीएनजी विस्तारासाठी गती देत असून ‘Ease of Doing Business’च्या माध्यमातून प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर देत आहोत. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करत राज्याच्या हितासाठी समन्वित व जबाबदार कृती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
@narendramodi@AmitShah@rajnathsingh
#Maharashtra
लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केले आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जे लोक लॉकडाऊनबाबत अफवा पसरवत आहेत, सोशल मीडियावर तशा पोस्ट करत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
#NoLockdown
भाजपा परिवारातील कार्यकर्ता हा आपल्या इनोव्हेटिव्ह कल्पनांमधून प्रचलित व्यवस्था आणखी सुलभ करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे भाजपाचे माजी आमदार आणि प्रवक्ते अतुल शाह!
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना अनेक चॅनल्सचे बूम्स माईक्स हाताळणे कठीण होते. हीच बाब लक्षात घेऊन अतुलजींनी आपल्या कल्पकतेतून 'चॅनेल बूम स्टँड'ची निर्मिती केली. आज त्यांच्या हस्ते हे स्टँड स्वीकारताना अत्यंत आनंद झाला.
अतुलजींनी यापूर्वी महाराष्ट्र विधान भवन आणि भाजपा प्रदेश कार्यालयातही असे स्टँड उपलब्ध करून दिले आहेत. एक सजग कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी म्हणून माध्यमांशी असणारा सुसंवाद अधिक सुटसुटीत आणि सुसह्य करण्याच्या त्यांच्या या इनोव्हेटिव्ह विचाराचे मनापासून कौतुक करतो.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रवक्ते पंकज मोदी आणि गोविंद येतयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
#Innovation #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP
Tron Education आयोजित Theme 2026 या प्रेरणादायी कार्यक्रमात पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा मान मिळाला. VFX, Animation आणि AI या आधुनिक व भविष्याभिमुख क्षेत्रांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधत, करिअरच्या नव्या व व्यापक संधींबद्दल मार्गदर्शन केले.
आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सन्माननीय सदस्यांचा निरोप समारंभ पार पडला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानपरिषद उपसभापती नीलमजी गोऱ्हे, मंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेतील इतर सहकारी आमदारांसोबत एकत्रित छायाचित्र घेतानाचे काही क्षण.
लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात जनसेवेसाठी योगदान देणाऱ्या सर्व निवृत्त सदस्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@mieknathshinde@Prof_RamShinde@neelamgorhe@DesaiShambhuraj@uddhavthackeray
#MLC #VidhanBhavan #AmitGorkhe #EknathShinde #RamShinde