आदरणीय देवेंद्रजी,
मुख्यमंत्री महाराष्ट्र,
विषय :- महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा गट ब आणि क 2024 साठी जागावाढ करून ज्यादाची मागणीपत्रके लोकसेवा आयोगाला पाठवण्याबाबत,
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
SR 100+
कर सहायक 1000+
लिपीक 10000+
या पदांची ज्यादाची मागणीपत्रके लोकसेवा आयोगाकडे पाठवून बळकट प्रशासकिय व्यवस्था आणि बेरोजगारांना नोकऱ्या आपले सरकार देईल अशी अपेक्षा आहे.
#mpsc (CO रिक्त जागा) तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे @mieknathshinde साहेबांनी 2022 मध्ये जागा वाढवल्या होत्या. आज साहेब आपल्याकडे नगरविकास खाते आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांची विनंती मान्य करून रिक्त जागा भराव्या🙏🏻
@CMOMaharashtra#uc#राज्यसेवा2024जागावाढ
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
@PratapSarnaik महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्री पदी आपली निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. आपल्या विभागातील ARTO ची बहुसंख्य रिक्त पदे, राज्यसेवा परीक्षा 2024 मधून भरण्याचां मार्ग आपल्या निर्देशाने सुकर कराल. @Mi_DilipLande@purveshsarnaik@CMOMaharashtra
#MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती.
MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde