आमची मागणी कोणाच्याही विरोधात नाही पण कृषी अभियंत्यांचे शिक्षण आणि कौशल्य लक्षात घेऊन त्यांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. मृद व जल संधारण विभागात कृषी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही
@CMOMaharashtra
आमची मागणी कोणाच्याही विरोधात नाही पण कृषी अभियंत्यांचे शिक्षण आणि कौशल्य लक्षात घेऊन त्यांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. मृद व जल संधारण विभागात कृषी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही
@CMOMaharashtra
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
#JusticeForAgrilEngg कृषी अभियांत्रिकी साठी स्वतंत्र संचलनालय स्थापन करावे यासाठी आज आंदोलनकर्त्यांनी @icarindia चे ADG Dr.R.K.Singh यांची भेट घेऊन मागणीपत्र दिले...ADG सरांनी सर्व समजावून घेऊन उच्चस्तरीय अधिकार्यांना व महाराष्ट्र शासनाला पत्राद्वारे कळविणार, असा शब्द दिला.
#JusticeForAgrilEngg राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बाबतीत निर्णय झाला पण मागच्या 30 दिवसांपासून आंदोलन करत असणाऱ्या कृषीअभियंत्याना कधी न्याय देणार ? #MPSC कडे न्याय फक्त आंदोलकांची संख्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरचं दिला जातो का?@CMOMaharashtra@mpsc_office
महाराष्ट्रात मागील 28 दिवसांपासून #कृषीअभियांत्रिकी चे विद्यार्थी काही मागण्या घेऊन आंदोलनासाठी बसलेले आहेत. हे विद्यार्थी शासनाकडे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे असलेल्या मागण्या सातत्याने मेलद्वारे,प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींना भेटून निवेदनाद्वारे सांगत आहेत.परंतू + #MPSC
महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलीत व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप