राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत असतील तर राज्य योग्य दिशेने जात आहे. सत्ता आली कि विसर पडतो ते आज सिद्ध झालं.साहेब हा विडिओ राज्यपाल साहेबाना द्या आणी तुम्ही स्वतः राजीनामा द्या.
#cmykpy#महायुवाप्रशिक्षणार्थी
अहिल्यानागर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांना युवा प्रशिक्षणार्थी संघटनाच्यावतीने निवेदन देण्यात आले.निवेदन वाचून सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच निर्णय लावतो असे गाडीत बसताना सांगितले.👍
*#युवा प्रशिक्षणार्थी*
@mieknathshinde@CMOMaharashtra@BharatGogawale
अहिल्यानगर मध्ये उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांना युवा प्रशिक्षणार्थी संघटनाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक येळे, प्रवक्ते युवराज तरवडे, राहुरी तालुकाध्यक्ष राहुल कोकाटे, सचिव प्रल्हाद क्षीरसागर,शाहनवाज मनियार उपस्थित होते.
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांनी काल नागपुरात आंदोलन केल्यावर त्यांना बदडून काढण्यात आले, निवडणुकीत सरकारसाठी हे तरुण राबले त्याचे बक्षीस त्यांना देण्यात आले.
या तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांना सरकार रोजगार देणार का?*
काँग्रेस विधिमंडळ नेते यांचा सरकारला सवाल!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा सवाल उपस्थित केला.
निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली. यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं.
यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले.
नागपूर मध्ये जे आंदोलन स्थळी प्रशिक्षणार्थी होते त्यांना भरपूर अशा लाठीचार्ज मुळे इजा झालेले आहेत, आज आम्ही जीवाने तिथे मेलेलो असतो तरी शासनाला आमची काही कदर आली नसती, शासनाने कोणतीही दखल नाही घेतली,आम्हाला जीआर चे स्वप्न होते दाखवले होते, ती त्यांनी आमच्या शरीरावर घावाने दिले😥
विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडत मा.विजय वडेट्टीवार साहेब व मा.जयंत पाटील साहेब यांनी युवा प्रशिक्षणार्थी योजना संदर्भातील मागण्या ठामपणे मांडल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील १,७५,००० प्रशिक्षणार्थींच्या वतीने मनःपूर्वक आभार!#महा_युवा_प्रशिक्षणार्थी@Vijaywadettiwar@jayantpatilfc