मा.@mpsc_office मा.@bhimanwar लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणारी कौशल्य चाचणी ही केवळ 63% उमेदवारांसाठी आहे 37% उमेदवारांसाठी यातून सूट आहे... जी कौशल्य चाचणी सर्वांसाठी नाही ती चाचणी गुणवत्ता साठी वापरणे चुकीचे आहे.
2021 , 2022 मध्ये हा नियम लक्षात ठेवला परंतु 2023 पासून त्यात बदल होऊन 63% जनतेवर अन्याय झाला त्यामुळे कौशल्य चाचणी मधून साध्य काहीच होत नाही उलट नुकसान होत आहे.
100 % जागा न भरल्या जाता 70% जागा फक्त भरल्या जात आहेत 2023 च्या अनुभवातून, आता तर पुन्हा मेगा भरती होणार आहे अस आपण म्हणत आहात तर मग रोजगार मिळाला पाहिजे अशी परीक्षा योजना असावी .
कौशल्य चाचणी बाबत 2023 मधील हाल पाहता त्या वेळी आयोगातील वरिष्ठ लोकांना कळण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही 2024 आणि 2025 मध्ये त्यात बदल नाही झाला, परंतु आपण नवीन आहात आणि आपल्याकडे सुद्धा हा विषय मांडण्याचा प्रयत्न अपेक्षा चांगल्या निर्णयाची ...ज्यातून मिळेल समान संधी आणि रोजगार.....धन्यवाद 🙏
@MahaDGIPR@lokmat@SakalMediaNews@pudharionline@avchite_amol
नगर परिषद सेवा प्रवेश नियम मध्ये आरोग्य सहायक या पदासाठी 2 वर्षे अनुभवाची जाचक अटी मुळे अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार आहे. अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
कृपया सदरील अट रद्द करण्यात यावा
@mieknathshinde@RRPSpeaks@Dev_Fadnavis@Dhananjay4INC@AbhiPawarBJP
@supriya_sule MAHATRANSCO अंतर्गत LOWER DIVISION CLERK पदासाठी 06 जुलै 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत परीक्षा होणे अपेक्षित असताना मात्र अचानक फक्त इंग्रजी भाषेतच परीक्षा होणार असल्याची माहिती उमेदवारांना देण्यात आली आहे
@Mahatranscoltd@Dev_Fadnavis
महाट्रान्सकोच्या सहायक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी ६ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ३० जून रोजी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. मागील काही परीक्षांतील गोंधळाचा अनुभव लक्षात घेता परिक्षार्थींना 'टिसीएस आयऑन' ची केंद्रे मिळणे अपेक्षित आहे.परंतु या परिक्षेसाठी अनेकांना खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.शिवाय ती खुप लांबची देखील आहेत. तसेच याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठा शारिरीक व मानसिक ताण सहन करावा लागणार आहे. हे लक्षात घेता ही परिक्षा पुढे ढकलावी आणि त्यासाठी टिसीएस आयऑन ची परीक्षाकेंद्रेच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिक्षार्थी करीत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा विषय आहे. त्या कृपया आपण या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@RRPSpeaks राज्यसेवेतील गट अ आणि गट ब ची हजारो पदे रिक्त आहेत. राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये जागा वाढ करून ही जाहिरात आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात करण्यात यावी अशी विनंती. #राज्यसेवा२०२४जागावाढ
मुंबई महापालिका भरतीत #BMC अधिकाऱ्यांचे अजब तर्क.
उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी दहावीत आणि पदवीत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे अशी अट ठेऊन चाळणी लाण्यात आल्याचे अजब तर्कट BMC च्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
म्हणजे कमी अर्ज आले पाहिजे म्हणून कठीण अटी ठेऊन चाळणी लावण्यात आली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. BMC अधिकाऱ्यांना लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याचे काम करायचं नसेल तर खुर्ची खाली करा, शासनाने तुम्हाला #तुघलकी नियम बनवून आमच्या उरावर बसण्यासाठी नेमलेले नाही.
आपण क्रीम पोस्टिंग वर आहात म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी लिपिक पदासाठी अर्ज करणार नाही पण ज्या अटी MPSC किंवा इतर कुठेच नाहीत अशा अटी ठेऊन उमेदवारांचा हक्क हिरावून घेतला जात आहे.
उमेदवारांना आंदोलन करण्याची हौस नसते परंतु काही अधिकारी/नेते यांच्या चुकीच्या धोरणापुढे हतबल होऊन उमेदवारांना रस्त्यावर उतरावे लागते. BMC प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, उमेदवार रत्यावर उतरण्याआधी शुद्धिपत्रक काढून आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या.
@mybmc@mieknathshinde@DrSEShinde@AUThackeray@RajThackeray@Dev_Fadnavis@niranjandtweets@CMOMaharashtra@ssaunik@VijayWadettiwar@RRPSpeaks@PatilKailasB@AbhiPawarBJP@ShelarAshish@AdvYashomatiINC .
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
@mybmc
“कार्यकारी सहायक” पदासाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जाचक अट कशासाठी. ATKT वाले होऊ शकत नाहीत का ही परीक्षा पास❓
दहावी नापास झालेले IAS, IPS होऊ शकतात पण लिपिक नाही होऊ शकत. अजबच आहे.
@CMOMaharashtra
@AROM_GOM
@AjitPawarSpeaks@RRPSpeaks