मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मा. मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis जी, ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र आमची सर्वांचीच आपणास नम्र विनंती आहे की, MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास, पारदर्शकता आणि समान संधी यासाठी ऑफलाइन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सर्वांच्या वतीने या निर्णय बद्दल आपले खुप खुप आभार.. 🙏🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mpsc_office
अखेर जिंकलो.!
विठुरायाच्या आशीर्वादाने विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या पुकारलेल्या एल्गार लढ्याला अखेर आज यश आलं.
२०१९ मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी २०२५-२६ सालचं नियमित कर्ज भरण्याची अट या दोन्ही जाचक अटी अखेर सरकारने काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत केली.. याबाबत मुख्यमंत्री आणि सरकारचे मनापासून आभार!
हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे.!
राम कृष्ण हरि!
🛑 लिपिक टंकलेखक 2023
🔸 20 जाने 2023:- जाहिरात आली
🔸जवळपास अडीच वर्षे झाली, अद्याप अंतिम निकाल नाही.
🔸आता @mpsc_office ने 2 गोष्टींचा विचार करायला हवा.👇
1) हा विलंब योग्य आहे का?
2) पूर्व+मुख्य+कौशल्य चाचणी याऐवजी ➡️ एक चाळणी परीक्षा + कौशल्य चाचणी घेतली तर !
@Dev_Fadnavis
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा !
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
सरकारचे प्राधान्यक्रम कशाला ?
भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी
हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा अधिक महत्त्वाचे सरकारला वाटतात का ?
महाराष्ट्रातील #MPSC परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे!
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा,
#Combine परीक्षेसाठी जागावाढ व्हावी.
इतक्या मागण्या आहेत आणि हे विषय आयोग आणि सरकारच्या अखत्यारितील असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? की सरकारसाठी हे महत्वाचे नाही?
महायुती मधील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना साधं पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडायला वेळ नाही का? की ते महत्वाचं नाहीये? आपला निधी मिळाला की काम झालं असे आहे का?
सरकारच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
📍 राज्यसेवा तसेच Combine जागावाढ आंदोलन.
📍उद्या कलेक्टर ऑफिस पुणे येथे मुलांनी कायदेशीर परवानगी घेतली आहे त्यामुळे आता आता ही लढाई आता मुलांच्या हातात आहे की किती मोठ्या संख्येने जमा होतात ते.
📍शेवटी ही लढाई मुलांची आहे आणि मुलांनाच जास्तीत जास्त संख्येने पुढे होऊन लढावी लागणार आहे.
📍बाकी कोणी पुढारी आले किंवा नाही आले, कोणी पाठिंबा दिला किंवा नाही दिला, ही लढाई अतिशय उत्साहात आणि शरीरातील सर्व प्राण एकत्र करून लढावी लागणार आहे.
📍आंदोलनाला कलेक्टर ऑफिस लाच परवानगी देण्यामागे दुसरा हा पण उद्देश आहे की सदाशिव पेठेत जेवढी मुलं जमू शकतात तेवढ्या प्रमाणात कलेक्टर ऑफीस ला मुलं जाऊ शकणार नाही!(हा पोलीस प्रशासनाचा अंदाज असू शकतो)
📍उद्याचे आंदोलन हे ऐतिहासिक व्हावे यासाठी माझा जाहीर पाठिंबा असेलच तसेच ही लढाई मुलांच्या बाजूने जिंकू असा विश्वास पण आहेच.
भेटूया उद्या, कलेक्टर ऑफिस, पुणे याठिकाणी🙏
@PMCMCO@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@RRPSpeaks@PawarSpeaks@MahebubShaikh20@Jayant_R_Patil
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
सरकार आणि आयोगास ठणकावून सांगतो की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेणे ही तुमची जबाबदारी आहे, कृपा नव्हे! त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित निकालापासून किमान ४५ दिवसांचा वेळ द्यावाच लागेल. ही केवळ मागणी नाही तर विद्यार्थ्यांचा हक्क आहे. तसेच
कंबाईन परीक्षेच्या सर्व संवर्गाच्या जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे नोंद करा आणि जाहिरातीत कमाल पदसंख्या समाविष्ट करा.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीनुसार होणारी ही शेवटची मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यांच्या भविष्यासोबत खेळू नका..!!
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
महाराष्ट्राची तरुण पोरं रात्रंदिवस राज्यसेवेचा अभ्यास करत जीवनाशी संघर्ष करत आहेत. PSI सारख्या पोस्टसाठी जागा रिक्त असताना देखील सरकार जागा जाहीर करत नाही, त्यातल्या त्यात 2024 exam 2025 मधे होऊन सुद्धा तुटपुंज्या जागा. हे फक्त वेळेचं वाया जाणं नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.दुसरीकडे, पुण्यात शांततामय मागणीसाठी जमलेल्या MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे या राज्याच्या संवेदनशीलतेवर एक काळी छाया आहे. शिक्षण, संघर्ष, मेहनत करून प्रशासनात यायचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
राज्यसेवा 2024 चा निकाल दोन वेळा लागतो, सुधारित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे 45 दिवस वाया जातात, आणि तरीही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची साधी मागणी सरकार फेटाळते? हे फक्त तांत्रिक बाबी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Mpsc_Andolan
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
न्याय मिळेल का?
@Dev_Fadnavis साहेब, आपण नेहमीच विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिलात. आजही आम्ही तुमच्याकडून ठोस निर्णयाची आणि संवेदनशीलतेची अपेक्षा ठेवतो.
@MPSC_Office, कृपया या समस्येकडे फक्त ‘तांत्रिक बाब’ म्हणून न पाहता, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने पाहा. ही केवळ
जागांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये आंदोलन करणारे काही विद्यार्थी अटकेत आहेत. काय हा गुन्हा आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवावा?
प्रश्न असा आहे की, या देशाच्या भविष्याला घडवणाऱ्या, दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना
अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे.
मागण्या:
मुख्य परीक्षा नियमानुसार किमान ४५ दिवसांनी पुढे ढकला, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना योग्य वेळ मिळेल.
Combine परीक्षेतील जागा वाढवा, कारण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि @mpsc_office विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत!
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकला आणि Combine जागावाढ या दोन अत्यंत न्याय्य आणि तर्कसंगत मागण्यांसाठी MPSC चे हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि काही