पहाटेचा सिनेमा♥️
रजनीमामांच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ची अशी ॲाफीशियल फॅन क्लबची तिकीटं हाती मिळवण्यासाठी भाग्य लागतं👻
माटुंग्याचं अरोरा म्हणजे चेन्नईत गेल्यासारखंच वाटायचं बंद झालं ते कधीच
तरी हा सिनेमा कुठेही पाहता येईल पण ही vibe वर्षातनं एकदाच सणासारखी अनुभवायला मिळते तेही मुंबईतसुध्दा!!!
स्टार सिटी माटुंगा
सिनेमॅक्स सायन
आयमॅक्स वडाळ्याचं काहीतरी बिनसलेलं यंदा
पण पहाटे ४ ला बोरीवलीतनं निघायचं
इकडे जायचं त्यांची पूजा पहायची
ढोलवाल्यांसोबत नाचायचं
फटाके फोडायचे
ही अशी तिकीटं कुणालातरी वशील्यानं सांगितलेली असतात पण ती मिळतील की नाही याची धाकधूक असते पण दरवर्षी मिळतात कशी बशी♥️
नातवंडं त्यांच्या आजोबांना फक्तं ओळखतात...
पण आजोबा त्यांच्या नातवंडांना पुरते ओळखून असतात.
"आदि अनंत..."
ह्या दिवाळीला, मनोरंजनाचा फराळ आहे.
१२ नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात.
जन्माला आलेलं प्रत्येक कोवळं पोर, उभं राहायला शिकलं की चालू लागतं… आणि चालायला लागलं की धावण्याची स्वप्नं पाहू लागतं. सृष्टीचा नियमच तो!
कधीकाळी एक पिढी होती, जिचं तारुण्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलं. आंदोलनं केली, लाठ्या झेलल्या, तुरुंगवास भोगला… कारण त्या पिढीला पुढच्या पिढीच्या वाट्याला उज्ज्वल भविष्य यावं असं वाटत होतं.
मग एक पिढी आली, जिच्या हातात आंदोलनाचे झेंडे नव्हते, तर डॉक्टर, इंजिनीअर होण्याची स्वप्नं होती. आईबापांनीही पोटाला चिमटा काढून त्या स्वप्नांना पंख दिले.
आणि आता…?
ज्या पिढीच्या हातात पदव्या आहेत, डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनगटात कर्तृत्व आहे… तिच्याच हातात पुन्हा आंदोलनाचे फलक देण्याची वेळ येतेय का?
स्वातंत्र्यापूर्वीची पिढी भविष्य मिळवण्यासाठी लढली… आणि स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांनी नवी पिढी स्वतःचं भविष्य वाचवण्यासाठी लढणार?
विलक्षण प्रगती म्हणायची ही?
कालचा तरुण देश स्वतंत्र व्हावा म्हणून रस्त्यावर उतरला होता… आजचा तरुण स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून रस्त्यावर उतरणार?
इतिहासाची पुनरावृत्ती म्हणायची, की प्रगतीच्या नावाखाली आपण मारलेली उलटी उडी?
पोरांना धावायचं असतं…
आपण फक्त त्यांच्या पायाखालची जमीन
जपायला हवी♥️
मी ज्या क्षेत्रात काम करतो कालपर्यंत तिथल्या फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर आणि कॉपीरायटर यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार अशी चर्चा होती. आज तिथे व्हिडिओ एडिटरचा जीवही धोक्यात आहे
वर्षानुवर्षे मेहनतीने शिकलेलं कौशल्य एका रात्रीत अपुरं पडू लागणं, ही केवळ व्यावसायिक अडचण नाही तो माणसाच्या आत्मविश्वासाला बसणारा धक्का आहे.
हे बदल स्वीकारून नव्याने शिकावं लागेल. आपल्याच तंद्रीत राहून चालणार नाही. या वेगाला सामोरं जाण्यासाठी आपल्या सरकारी व्यवस्थेची तयारीही पुरेशी दिसत नाही. तरुणांना केवळ “कौशल्यं वाढवा” सांगून जबाबदारी संपत नाही. त्यासाठी परवडणारं प्रशिक्षण, रोजगाराच्या नव्या संधी आणि संक्रमणकाळात ठोस आधार हवा. उद्याची असुरक्षितता जेव्हा आजची घुसमट बनते, तेव्हा असंतोष रस्त्यावर उतरतो. आंदोलनं दडपण्यापेक्षा ती का उभी राहतात, हे समजून घेणारी संवेदनशीलता हवी.
सत्ताधाऱ्यांनी या असंतोषाच्या आगीत तेल ओतण्याऐवजी तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या स्वप्नांना बळ द्यावं. त्यातूनच तरुणांचा आत्मसन्मान आणि व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा उभा राहील.
नव्या पिढीला फक्त उद्याची भीती देऊ नका...उद्या घडवण्याची संधी द्या!
नागोठणे ब्रिज पुन्हा बांधण्याची वेळ आली, पण आता कासू ब्रिजबाबत तरी वेळीच सावध व्हा! 🚨@nhai_official@nhairo_mumbai
नागोठणे ब्रिजच्या संभाव्य धोक्याबाबत आम्ही संबंधित यंत्रणांना आधीच कल्पना दिली होती. मात्र, आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, नवीन बांधलेल्या ब्रिजवर पुन्हा नव्याने बांधकाम करण्याची वेळ येत आहे. @nitin_gadkari
अशीच वेळ कासू ब्रिजवर येऊ नये, यासाठी आज आम्ही तेथील परिस्थिती संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून देत आहोत.
आमचा उद्देश दोषारोप करणे नाही, तर वेळीच उपाययोजना करून भविष्यात होणारे नुकसान टाळणे हा आहे.
ब्रिजची अवस्था पूर्णपणे बिघडल्यानंतर पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा, आजच त्याची योग्य तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करा.@iitdelhi@MORTHIndia@irc_delhi@Shivendraraje11@CollectorRaigad
नागोठणे ब्रिजचा अनुभव लक्षात घ्या; कासू ब्रिजबाबत तरी वेळ निघून जाण्यापूर्वी योग्य ती पावले उचला!
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
#mumbaigoahighway #chaitanyaushalaxmanpatil #preventionisbetterthancure #road #safety
नव्हतं माहिती कामानिमित्ताने यांच्या घरी जाणं होईल. माझ्याकडे न बघता मटा पेपर वर निळ्या बॅालपेनने चित्र काढत होते बोलताना. काही नको म्हणताना अधिकार वाणीने दोडक्याची भाजी चपाती खायला दिली.
ते तात्पुरते जिथे रहात होते तिथं इतर कुणी नव्हतं त्यामुळं खाल्ल्यावर ताट तूलाच घासावं लागेल याची त्यांच्या शैलीत तंबी दिलेली आणि मी ते तसं केलंही.
अचानक भयानक अशी आठवण पदरात पडलेली🙏🏻
श्रद्धांजली!
हेदवीचा जन्म माझा बाजूचं गाव वेळणेश्वर एका संध्याकाळी नुकताच पोहोचत होतो तिथं स्टॅंड नाहीये बीचजवळ मंदिराच्या बाहेरच गाड्या लागतात २०/२५ वर्षाने एक हाक ऐकू आली पहिलीपर्यंत ज्या शाळेत होतो त्यावेळची ती हाक काळोखातल्या त्या काळ्या चेहऱ्यानं दात दाखवत मिठी मारली. माझ्या सोबत जे होते त्यांच्यासकट नारळाच्या खाली घेऊन गेला भंडारी उतरत होता त्याच्याकडची गाळून ताजी माडी पाजली त्यानं. जीभेपासून मेंदूपर्यंत तल्लख थक्क चवीची कीक गेली आजही आठवतेय…काटा अंगावर♥️ गडदे आडनाव फेमस त्या गावचं काटक राकट दर्यावर्दी काय नाय म्हणाल ते करण्यात पटाईत🫡 समाजाला सलाम!
Stay Hungry, Stay Foolish म्हणत तंत्रज्ञान, डिझाइन आणि इनोव्हेशनला आपल्या कल्पकतेने व सर्जनशीलतेने नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या प्रभावी उद्योगकर्ता स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन.
स्टीव्ह यांना कॅलिग्राफीची आवड होती, आणि याच आवडीमुळे आज Mac च्या फॉन्ट डिझाइनमध्ये पाहायला मिळतात..
स्टीव्ह जॉब्स हे केवळ एक उद्योजक नव्हते, तर ते एक नवनिर्माते, विचारवंत आणि जग बदलण्याची क्षमता असणारे व्यक्ती होते.
त्यांचा जीवनप्रवास हा जिद्द, ध्येय, आणि सतत नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास असलेल्या आपल्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे..
या सिनेमाला आज ८ वर्ष झाली
हे लग्नाचे visuals या सिनेमात नाहीयेत
हे ज्या मुलानं इतक्या प्रेमानं आज बनवून पोस्ट केलंय त्याचा सिनेमाशी एक प्रेक्षक म्हणून संबंध आहे फक्त ज्या मातीत रजनीकांतचा प्रेक्षक तयार होतो तिथं असा कंटेंटवर मनापासून प्रेम करणारा पण प्रेक्षक तयार होतच असतो हे वृध्दिंगत होवो कले कलेने प्रेम वाढो♥️
स्पीडब्रेकर गायब होण्याच्या मार्गावर आहे. दुरुस्त करावा. आणि जमल्यास मेट्रो पिलर वर असलेले बॅनर्स पण काढा...
लिंक व्ह्यू हॉटेल समोर, सायली हॉस्पिटलजवळ, लिंक रोड, बोरीवली (पश्चिम)
@mybmc@mybmcWardRC